Bayko Marathi Kavita | बायकोसाठी मराठी कविता
नमस्कार मित्रानो. बायकोची किंमत नवऱ्याला ती घरात असते तो पर्यंत कळत नाही. पण ती घरात नसते तेव्हा तिच्याशिवाय कुणाचाही पान हलत नाही . मित्रानो तुम्ही बायको वर आधारित कवितांच्या शोधात असाल तर तुम्ही एकदम बरोबर जागी आलेले आहेत. या पोस्ट मध्ये मी Bayko Marathi Kavita बायकोवर कविता शेअर करत आहे . सिरीयस कवितांसोबत मी काही मजेशीर funny कविता पण शेअर केली आहे . मला आशा आहे कि तुम्हाला या कविता नक्की आवडतील .
![]() |
Bayko Marathi Kavita |
बायकोच कुणाच्याही आयुष्यात काय महत्व असत .... याचे सुंदर चित्रण या कवितेमधू
न शब्दांच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे .... चला तर मग बघूया प्रिय बायको हि कविता -
प्रिय बायको - 1
प्रेमाचा स्पर्श तू , 💕💕चेहऱ्यावरील हर्ष तू
संघर्षात परामर्श तू
जीवाचा जिव्हाळा तू, 👩👩 मायेचा ओलावा तू
काळजीत विसावा तू
दुखत संवेदना तू, 👫 संघर्षातील प्रेरणा तू
नात्यातील चेतना तू
सदोदित हवी तू ,👦👧 सदोदित नवी तू
संसारातील पालवी तू
नवचैतन्याचा श्वास तू ,😚😚 बंधनात विश्वास तू
सोबतीचा प्रवास तू
– – – –⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘– – – –
नवरा बायकोच्या नात्याचे सुंदर चित्रण या कवितेमध्ये विविध उपमा देऊन केलेलं आहे . तुम्हला पण हि कविता वाचताना खूप मजा येईल. थोडी मोठी आहे पण बायकोच्या प्रेमळ , वेळप्रसंगी कणखर अशा वेगवेगळ्या रूपाचं सुंदर वर्णन या कवितेमध्ये तुम्हाला बघायला मिळेल .
बायको कविता - 2
बायकोच्या मनात काय आहे ते
कुठल्याच नवऱ्याला कधी कळलंय का
पण नवऱ्याच्या मनात काय आहे
ते प्रत्येक बायकोला मात्र काळत ... अगदी बरोबर !!!!!
बायको म्हणजे नवऱ्याची Personal Diary च असते
कधी काय हवं, काय नको, कुणाचा वाढदिवस, कुणाच लग्न
सगळं तिच्या डोक्यात Save केलेलं असत ....
ते सुद्धा Reminder सकट
चोरांची प्रत्येक चाल जशी पोलिसांना कळते
तशी नवऱ्याची बायकोला ......
तिच्याकडे सर्व पुरावे असतात पण जोपर्यंत
नवरा काही बोलत नाही तोपर्यंत बायको मात्र गप्प असते
एकदा का सापडलात तर मात्र तुमची काही खैर नसते
हवामान खात्यापेक्षा बायका दोन पावल पुढे असतात
नवऱ्याच्या चेहऱ्यावरूनच तिला भूतकाळ,
भविष्यकाळ, वर्तमान सगळ्यांची कल्पना येते
हो ... आणि येणाऱ्या प्रसंगासाठी बाई अगोदरच सज्ज असते
कधी प्रेमाने नवऱ्याला गोंजारायच आणि कधी दम द्यायचा
कधी अश्रूंच ब्रम्हास्त्र काढायचं ... जसा अभिमन्यू आईच्या पोटी
चक्रव्ह्यू भेदायचा शिकला तशी ती हि शिकली असते ...
पण बायकोच ती ....
म्हणून प्रत्येक नवरा संसाराचा गाडा ओढत असतो
बायको म्हणजे संसाररूपी शरीराचं हृदयच असते
ती जोपर्यंत असते तोपर्यंत संसार संसार असतो
जवळ असली कि वसंत फुलतो
दूर असली कि शिषिर बसतो
वेळप्रसंगी नवऱ्याला फुलाप्रमाणे जपते
आणि समईतल्या वातीसारखी नवऱ्यासाठी जळते .....
संकटामध्ये कधी दुर्गा होते तर
कधी मुलांसाठी सरस्वती ,
घरच्यांसाठी कधी अन्नपूर्णा होते ,
कधी लक्ष्मी होऊन तीळ तीळ पैसे जमवते ....
शेवटी यमलाही परत फिरायला
भाग पडणारी बायकोच असते ....
– – – –⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘– – – –
मित्रानो बायकोवर जश्या प्रकारे प्रेमळ , इमोशनल कविता असतात तशाच काही मजेशीर , कॉमेडी कविता पण बघायला मिळतात. तशीच एक मजेशीर कविता आपण खाली बघणार आहोत. यामध्ये कवीने बायको कशी परिपूर्ण हवी याबद्दल पूर्ण पाढाच लिहिला चला बघूया अशी आपली बायको असावी हि कविता -
अशी आपली बायको असावी - 3
अशी आपली बायको असावी - हजार जाणित उठून दिसावी
थोडीसुद्धा तिला मात्र त्याची मिजाज नसावी
अशी आपली बायको असावी - भक्कम पगाराची कायम नोकरीची असावी
मी म्हणेन तेव्हा मात्र ती मला घरीच दिसावी
अशी आपली बायको असावी - चतुर, शहाणी, अभिमानी असावी
माझ्यापुढे मात्र तिची मान खाली असावी
अशी आपली बायको असावी - सभेत धीट , कामाला वाघ असावी
माझ्यासमोर घरी दारी मात्र ती गरीब गाय असावी
अशी आपली बायको असावी - बोले तैसी चालणारी असावी
माझ्या जुन्या वचनांची मात्र तिला कधी आठवण नसावी
अशी आपली बायको असावी - प्रसन्न सदा हसतमुख असावी
माझ्या आक्रस्ताळीपणावर मात्र तिच्या भाळी आठी नसावी
अशी आपली बायको असावी - शांत गंभीर पोक्त असावी
माझ्या बालिशपणाविषयी मात्र तिची काही प्रतिक्रिया नसावी
अशी आपली बायको असावी - व्यवहारी काटकसरी असावी
माझ्या उधळपट्टीवर मात्र तिची कधी टीका नसावी
अशी आपली बायको असावी - एक आदर्श गृहिणी असावी
माझ्या ढिसाळपणाबद्दल मात्र तिची काही तक्रार नसावी
अशी आपली बायको असावी - सुसंस्कृत माताअसावी
माझ्या बेबंद वागण्याची मात्र मुलाबाळांवर सावली नसावी
अशी आपली बायको असावी - माझ्या पलीकडेतिची दृष्टी नसावी
मी खिडकी बाहेर बघण्याला मात्र तिची काही हरकत नसावी
– – – –⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘– – – –
खाली आपण बायको वर छोटीशी पण बायको कशी असावी हे सांगणारी कविता बघणार आहोत. हि कविता रवींद्र मोरे यांनी लिहिली आहे .
कविता बायकोसाठी - 4
उन्हात सावली असणारी, चारचौघात लाजणारी ती
डोळ्यांनी बोलणारी, पाहून गॉड हसणारी .... ती
न बोलता ..... माझ्या मांडले समजणारी ......ती
इवल्याश्या मनात खूप सारे प्रेम ठेवणारी ... ती
दुखावल्यास चटकन डोळे ओले करणारी ...ती
स्वतःला त्रास झाला तरी सुख देणारी ... ती
चुकी नसली तरी समजून घेणारी .... ती
काही होताच ... धावून येणारी .... ती
परिस्थितीला सामोरी जाऊन मुहतोड जाब देणारी ... ती
माझ्यासारख्या दगडाला देव मानणारी .... ती
– – – –⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘– – – –
बायकोची सगळ्यांबद्दलची काळजी आणि प्रेम असते आणि स्वतःला विसरून फॅमिली ची काळजी ती कशी घेते याचे या वर्णन खालील कवितेमध्ये केलेलं आहे . या कवितेच्या कवीचे नाव मला कळू शकले नाही तुम्हला जर माहिती असेल तर कंमेंट मध्ये सांगा .
ती बायको असते - 5
तिनं फक्त काळजी करायची
आपली कोणी काळजी करेल याची
अपेक्षा नाही ठेवायची
तिनं आजारपणात सगळ्यांना जपायचं
आपण मात्र आजारी पडायच्या
आधीच औषध घ्यायचं ......
तिनं सगळ्यांना समजून घ्यायचं
हे करतांना
आपल्यालाही मन आहे
हे विसरून जायचं
तिनं फक्त तडजोड करायची
आणि बाकीच्यांनी त्याला
त्यागाचं गोंडस नाव द्यायचं
कारण ती आई असते , ती बायको असते ,
प्रत्येक नात्यासाठी ती वेगळी असते
कारण ती फक्त स्त्री असते ....
फक्त स्त्री असते .....
– – – –⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘– – – –
बायको म्हणजे - 6
बायको म्हणजे .... बायको म्हणजे ..... बायको असते
कधी मंद दिव्याची वात, तर कधी
पेटलेली धगधगती मशाल असते
ती जेव्हा घरात असते
माझं तिच्याशी अजिबात पटत नाही
पण ती जेव्हा घरात नसते
मला घरात जरासुद्धा करमत नाही
मोलकरीण, धोबी, दूधवाला, पेपरवाला इतकेच काय
नाठाळ शेजाऱ्यालाही ती व्यवस्थित हाताळू शकते
घरात कुणाची वस्तू कुठे आहे , बँकबुक,
लोकरच्या चाव्या, हातरुमाल कोठे आहे
कुणाचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस कधी आहे
साऱ्या नोंदी तिच्या मेंदूत पक्क्या असतात ...
आला गेला पै पाहुणा सर्वांचच ती
मनापासून स्वागत करत असते
कोण अचरट, कोण हावरट, कोण बावळट,
कोण भला, प्रत्येकाची नवीन ओळख
तीच करून देत असते
मुलांचा अभ्यास, गृहपाठ, पालकसभा
तीच attend करीत असते
विविध कर्जे, कशाकशाची हफ्ते, सणवार,
लग्नकार्य, देणीघेणी अनेक आघाड्यावर
एकाच वेळी ती लढा देत असते
सासू -सासरे, आई- वडील दीर -जाऊ
नंदा -वहिनी सर्वांबरोबर ती समभावाने वागत असते
सर्वांशी फोड बोलून चांगुलपणा मी घेतो
नको तिथं नको तेवढं खरं बोलून वाईटपणा ती घेते
मी वाहन चालवत असतो शेजारी ती बसलेली असते
ह्या डावीकडे, घ्या उजवीकडे सतत मला सांगत असते
म्हैस आली सांभाळा, त्या बाईकडे काय बघत बसलाय
टाका गियर व्हा पुढे .... सतत सूचना देत असते
घराच्या दारावर नेमप्लेट माझी असते पण
घराच्या आत तिचीच अनिर्बंध सत्ता असते
तिच्याच इशाऱ्यावर अख्ख घरदार नाचत असत
फूटक माझं नशीब , चांगली स्थळ सोडून तुमच्या घरी आली
केवळ मी म्हणून सोसलं सार ... आजवर इथे ऐकून राहिले
तुमची काय माझी काय प्रत्येकाची बायको हेच सांगत असते
खरं सांगतो मित्रानो , बायको म्हणजे वळलं तर सूत
नाही तर मानगुटीवर बसलेलं भूत असत
साहेब काय कारकून काय सगळ्यांची तीच गत असते
कुठल्याश्या ऑफिसात, कुठल्याश्या कोपऱ्यात
खरटीघाशी मी करीत असतो
पण आपला नवरा मोठा साहेब असं जगाला
सांगून ती माझी अब्रू झाकीत असते
दोन्ही हाताने मी माझेच पैसे उधळीत असतो
ती मात्र काटेकोरपणे हिशोब सगळं ठेवीत असते
खर्चासाठी १००० रुपये घेऊन ८०० रुपये खर्च करते
आणि हिशोब मात्र १२०० रुपयांचा देते
महिनाअखेरीस पेट्रोल साठी
जेव्हा मी रद्दी विकायला काढतो
तेव्हा ५०० रुपयाची नोट हळूच
हातावर काढून ठेवत असते
वारंवार राग असला तरी तिच्या मनात
रातराणीसारखी दडलेली एक प्रीत असते
जेव्हा मी कविता रचत असतो,
तेव्हा ती कविता जगत असते
कधी श्रवणसरींसारखी ती प्रसन्नपणे बरसत असते
तर कधी ग्रीष्मातल्या उन्हासारखी प्रसन्न पणे तळपत असते
तीच बरसन काय, तीच तळपण काय
सर्वांच्या सुखासाठीच ती
हे सार करीत असते
घरातील प्रत्येक व्यक्ती मजेत आणि आनंदात जगत असतो
कारण अवघ्या घरदारासाठी ती कणाकणाने झिजत असते
बायको म्हणजे ... बायको म्हणजे .... बायको असते
कधी समईत तेवणारी मंद वात तर,
कधी पेटलेली मशाल असते ........
– – – –⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘– – – –
हे पण वाचा :
- Husband Quotes In Marathi
- Romantic Marathi Premachya Kavita
- पावसावर आधारित मराठी कविता संग्रह
- बाबावर कविता मराठी
- कुसुमाग्रज कविता संग्रह
- Bayko Marathi Kavita
तर मित्रानो , आज या पोस्ट मध्ये आपण Bayko Marathi Kavita बघितल्या . तुम्हाला या कविता कश्या वाटल्या ते मला सांगा मला ते जाणून घ्यायला खूप आवडेल . आणि मित्रानो ज्या कवितांच्या कवीचे नाव समजू शकले नाही त्यांचा उल्लेख मी इथे केलेला नाही तुम्हाला माहित असल्यास मला नक्की सांगा आणि तुम्ही कविता करत असल्यास त्या सुद्धा कंमेंट मध्ये सहारे करू शकता तुमच्या नावसकट त्या मी इथे ऍड करेल .
धन्यवाद !!!!!!!!!!!!
Post a Comment