Romantic Marathi Premachya Kavita | मराठी प्रेमाच्या कविता
नमस्कार मित्रांनो , प्रेम हा विषय च खुप सुन्दर नाजुक आणि खोल आहे . या प्रेममध्ये खुप काही सामावलेल आहे . वयात आल्यावर पहिल्या किंवा खऱ्या प्रेमाचा अनुभव मला वाटत सर्वानीच घेतलेला असेल . पण असे म्हणतात की ,आपले कुणावरही असलेल प्रेम हे व्यक्त करणे तितकेच महत्वाचे असते . ते आपण कविता वगेरेच्या माध्यमातून विकट करू शकता . म्हणूनच या पोस्ट मध्ये आपण Romantic Marathi Premachya Kavita बघणार आहोत . या तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या तय खास व्यक्तीला शेयर करून आपले प्रेम व्यक्त करू शकता . किंवा स्वताच या कविता वचन आपले जून दिवस पुन्हा जगु शकता . चला तर मग वाळूया मराठी प्रेमाच्या कवितांकडे -
1. आदर्श प्रेम
प्रेम कुणावरही करावे
त्या सांगावे का ?
स्वतःला वाहून द्यावे
त्याला वाहून न्यावे का ?
कुणाचे चाहते बनावे
परंतु गाऊन ते ऐकवावे का ?
मनाचे खेळ सारे
त्याला भ्रमात घ्यावे का ?
सुगंध फुलांचा घ्यावा
तोडून त्यास रुसवावे का ?
शुभेच्छांची फुल द्यावी
अधिकार आपले ठसवावे का ?
क्षणात त्यागाच्या वाढते प्रेम
त्याच स्वार्थ वसावा का ?
वाहून हृदय हृदय मिळावे
भाव व्यर्थ असावा का ?
- पं हरिवंश राय बच्चन
( भावनुवाच आनंद माने )
– – – –⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘– – – –
2. फक्त तुझ्यासाठी
आयुष्य असेच सरले धावत आठवणींच्या पाठी
सबंध आयुष्य वाट पाहिली मी फक्त तुझ्यासाठी
तुझ्या येण्याची वाट पाहत शब्द गोठले आज ओठी
हृदयात दुःखाचे भास कवळले मी फक्त तुझ्यासाठी
जगलो असा की मी जगणे राहून गेले पाठी
डोळ्यातले अश्रू हृदयात कोंडले मी फक्त तुझ्यासाठी
हर घडी तुझ्या प्रेमाची मनात ठेवली आस मोठी
त्या आशेवर जगत राहिलो मी फक्त तुझ्यासाठी
तुझ्या समोर चुकते मन हे मनही आहे फार हट्टी
याच हट्टावर आयुष्य बेतले मी फक्त तुझ्यासाठी
नशीबाशी झगडत झगडत न तोडता प्रेमाच्या गाठी
त्या गाठींना संभाळून ठेवले मी फक्त तुझ्यासाठी
एक एक क्षण तुझ्या प्रेमाचा आज माझ्या डोळ्यात दाटी
त्या क्षणांना उराशी करता आले मी फक्त तुझ्यासाठी
अंधार विझत गुजर यावा भान विसरून चुडावी मिठी
यात स्वप्नांना आयुष्य समजलो मी फक्त तुझ्यासाठी
तुझीच वाट पाहत जुळले हृदय प्रेमाकाठी
भिन्न देशांना झुरत राहिलो मी फक्त तुझ्यासाठी
- कमलेश गुंजाळ
– – – –⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘– – – –
3. अबोल प्रेम
माझं पहिलं प्रेम अबोलच राहिलं
तिच्या डोळ्यात ते नकळत पाहिलं
जेव्हा ती बोलायची मी हरवून जायचो
जेव्हा ती जायची मी व्याकुळ व्हायचो
आधी दुरून मग चोरून
नंतर खुल्लम खुल्ला
मी तिला पाहिलं माझं
पहिलं प्रेम अबोलच राहिलं
तिचे धर जणू गुलाब पाकळी
गळ्यावर रुळे बट मोकळी
नाक सुंदर मोहक चाफेकळी
शोभे चंद्रकोर कपाळी
तिच्या गोड हसण्याने मज वेड लावलं
माझं पहिलं प्रेम अबोलच राहिलं
तिच्या डोळ्यात ते नकळत पाहिलं
- म. श. भारशंकर
–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–
4. "प्रेम " कविता
रात्री जागून विचार करणं प्रेम नसत
स्वप्नात तिच्या संगे जगण प्रेम असत
हातात हात धरून चांगला प्रेम नसतं
ती नसताना तिचं असणं प्रेम असतं
गुलाबाचे फुल देणं प्रेम नसतं
पाकळी समान तिला जपणं प्रेम असतं
तुला हसावं ना प्रेम नसत
तिच्या सुखात आपलं हसणं प्रेम असतं
तिला नेहमी सावरणं प्रेम नसतं
तिच्यासंगे कधी रडणे प्रेम असतं
- अवधूत माळी
–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–
5. प्रेम कर भिल्लासारख
पुरे झाले चंद्र सूर्य पुऱ्या झाल्या तारा
पुरे झाले नदी नाले पुरे झाला वारा
मोरासारखा छाती काढून उभा राहा
जाळ्यासारखा नजरेत नजर बांधून पहा
सांग तिला तुझ्या मिठीत
स्वर्ग आहे सारा
शेवाळलेले शब्द आणिक
यमक छंद करतील काय ?
डांबरी सडकेवर श्रावण
इंद्रधनु बांधतील काय ?
उन्हाळ्यातल्या ढगांसारखा हवेत राहशील फिरत
जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लग्न चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय ?
म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ
प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ
प्रेम म्हणजे वनवा होऊन जाळत जाण
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं
प्रेम कर भिल्लासारख बाणावरती खोचलेलं
मातीमध्येच उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं
शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस
बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस
उधळून दे तुफान सगळं
काळजामध्ये साचलेलं
प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं
- कुसुमाग्रज
–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–
6. तुझ्या आठवणीत मी
तुझ्यात इतके गुंतले मी
सावरण्याची इच्छाच नाही
क्षणाक्षणाला तुझ्याच आठवणी
अस्तित्वाची माझ्या मलाच जाण नाही
रोजच तुझ्यात गुंफते मी
का पण काही कळत नाही
समजवणारे तर समजावून थकले
मलाच बहुतेक ते कळून घ्यायचे नाही
तू तर तसा खुशीत असशील
मी माझी आनंदी आहे
दररोज मनात सलते सारखी
ती कमी फक्त तुझी आहे
कोवळ्या वयात पहिलं प्रेम माझं
भविष्य त्याला ठाऊक नाही
कळतय मला हे सारं
तरी का होते ही घाई
घाई तर मुळीच मी करणार नाही
आयुष्याचा हा पोर खेळ नाही
भविष्य तर तुझ्या सोबतच हवय
भले मग त्यासाठी शेवटपर्यंत वाट पाहीन
- अपेक्षा वाघे
–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–
7. प्रेम
प्रेमाच्या भाषा अनेक नाव एक
प्रत्येकाच्या मनात बसत याचं गाव एक
हृदयातून वाहतो याचा भाव एक
लहानांपासून मोठ्यांपर्यंत याची धाव एक
प्रेयसी पासून मैत्रीपर्यंत याच्या भाषा अनेक
हे खरं मिळावं जगात याची अशा एक
सर्वांच्या हृदयात दिसते ही दिशा एक
खोट्या प्रेमात मिळते याची निराशा एक
प्रेमाच्या असतात भावना अनेक
विश्वास वाटे याची कामना एक
डोळ्यातून हृदयात उतरतो हा जिना एक
काळ कुठलाही असो याचा जमाना एक
देवाने दिलेले हे वरदान एक
खऱ्या मनात याचं दान एक
तुटलेल्या हृदयात याच रान एक
सर्व लोक याचा मान एक
प्रेमाच्या भाषा अनेक नाव एक
प्रत्येकाच्या मनात बसतो याच गाव एक
यालाच प्रेम म्हणायचं असतं
उगाचच्या रुसव्यांना
तू मला मनवण्याला
प्रेम म्हणायचं असत
एकमेका आठवण्याला
आणि आठवणी जपण्याला
प्रेम म्हणायचं असतं
थोडसं झुरण्याला
स्वतःचं न उरण्याला
प्रेम म्हणायचं असतं
भविष्याची स्वप्न रंगवत
आज आनंदात जगण्याला
प्रेम म्हणायचं असतं
कितीही रागावलं तरी
एकमेका सावरण्याला
प्रेम म्हणायचं असतं
शब्दातून बरसण्याला
स्पर्शाने धुंद होण्याला
प्रेम म्हणायचं असतं
तुझं माझं असं न राहता
आपलं म्हणून जगण्याला
प्रेम म्हणायचं असतं
प्रेमाला प्रेम म्हणत
फक्त प्रेम करण्याला
प्रेम म्हणायचं असतं
–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–
8. प्रेमात पडलं की असंच होणार ...
दिवस रात्र डोळ्यासमोर तोच चेहरा दिसणार
स्वप्नात सुद्धा आपल्या तेच व्यापून उरणार
येता जाता उठता बसता फक्त तिचीच आठवण होणार
तुमचं काय माझं काय
प्रेमात पडलं की असं होणार .......
डोळ्यात तिच्या आपल्याला स्वप्न नवी दिसणार
तिच्या हास्यातून आपल्यासाठी चांदणे सांडणार
ऐश्वर्याचा चेहरासुद्धा मग तिच्यापुढे फिका वाटणार
तुमचं काय माझं काय
प्रेमात पडलं की असंच होणार .......
तिच्या फोनची आपण दिवसभर वाट पाहणार
मित्रांसमोर मात्र बेफिकिरी दाखवणार
न राहून शेवटी आपणच फोन लावणार
तुमचं काय माझं काय
प्रेमात पडलं की असंच होणार ......
–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–
9. पहिले प्रेम
मावळत्या सूर्या सवे उधळीत प्रेम बसली ती सांजवेळी
भारावलेल्या डोळ्यातील स्वप्न घेऊन माझ्या जवळी
हात माझा हाती घेत ओघळले अश्रू तुझे
थेंबा थेंबात एकच नाव मलाच दिसले माझे
सांज भिजून रात झाली आली रात राणी
डोळ्यातील स्वप्नात जखडलो आम्ही दोघे अडाणी
घाबरलेल्या मनास माझ्या ठेवीले प्रज्वलित श्वासांनी
होकार देत नजरेतून सावरले मलाच तिच्या आसवांनी
होता नव्हता विचार संपला जणू जिंकलं जग सार
नजरेतून होकार मिळता चिंता पळाली पार
थरथरलेल्या मनातून पडला गळून शब्दांचा नकाब
तना मनाच्या व्याकुळतेला मिळाला प्रेमाचा जाब
जन्म मरणाच्या या फेरीला मिळाली नवी साथ
रात चांदण्यास देत साक्षी आयुष्यभरचा धरला हात
- कमलेश गुंजाळ
–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–
You May Also Like:
- Small Poem In Marathi
- Aaji Kavita In Marathi
- Kusumagraj Poems In Marathi
- Bap Kavita In Marathi
- Marathi Pavsachi Kavita
तर मित्रानो आज आपण सुन्दर अश्या Romantic Marathi Premachya Kavita बघितल्या . तुम्हाला या कविता कश्या वाटल्या ते मला नक्की कळवा आणि मराठी पोस्ट साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की दया .
पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Post a Comment