Bap Kavita In Marathi | बाप कविता | बाबावर कविता मराठी
नमस्कार मित्रांनो Bap Kavita In Marathi या पोस्टमध्ये तुम्हाला वाचायला मिळतील. आई वर खुप कविता लिहिल्या अणि वाचल्या जातात. पण बाबांच हव तस महत्त्व आपन देत नहीं तर या कवितांच्या माध्यमातून बापाच आयुष्यातील स्थान जानून घेऊ . चला तर मग वळूया कवितांकडे -
हे पण वाचा 👇👇👇
तर मित्रांनो तुम्हाला Bap Kavita In Marathi या कविता कशा वाटल्या ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा अणि अजुन कवितांसाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की दया .
धन्यवाद !!!!!!!
1. बाप मराठी कविता
आईचं गुणगान खूप झाले,
बिचाऱ्या बापाने काय केले.
बिकट प्रसंगी बापच सदा सोडवी,
आपण फक्त गातो आईचीच गोडवी
आईकडे असतील अश्रूंचे पाट,
तर बाप म्हणजे संयमाचा घाट
आठवते जेवण करणारी प्रेमळ आई
त्या शिदोरीची सोय ही बापच पाही,
देवकी – यशोदेचं प्रेम मनात साठवा,
टोपलीतून बाळास नेणारा वासुदेवही आठवा
रामासाठी कौशल्येची झाली असेल कसरत,
पुत्र वियोगाने मरण पावला बाप दशरथ
काटकसर करुन मुलास देतो पॉकेटमनी,
आपण मात्र वापरी शर्ट-पँट जुनी मुलीला हवे ब्युटीपार्लर,
नवी साडी, घरी बाप आटपतो बिन साबणाची दाढी
वयात आल्यावर मुले आपल्याच विश्वात मग्न,
बापाला दिसे मुलांचे शिक्षण, पोरीचे लग्न.
मुलाच्या नोकरीसाठी जिना चढून लागते धाप,
आठवा मुलीच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बाप,
जीवनभर मुलांच्या पाठी बापाच्या सदिच्छा.
त्यांनी समजून घ्यावं हीच माफक इच्छा.
—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—
2. बाबा मराठी कविता
आपले चिमुकले हाथ धरून जे
आपल्याला चालायला शिकवतात… ….
ते बाबा असतात
आपण काही चांगले केल्यावर .
जे अभिमानाने सगळ्याना सांगतात… .
ते बाबा असतात.
माझ्या लेकराला काही कमी
पडू नये या साठी जे घाम गाळतात….
…..ते बाबा असतात.
आयुष्याच्या रस्त्यावर चालताना
जे आपल्याला चुकताना सावरतात..
ते बाबा असतात.
आपल्या लेकराच्या सुखा
साठी जे आपला देह ही
अर्पण करतात….. ….ते बाबा असतात
—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—
3. बापावर मराठी कविता
लेकरांसाठी तो झटत असतो, संसारासाठी तो पेटत असतो
शेतामध्ये तो राबत असतो, परंतु एवढं सारं करून सुद्धा
त्यात त्याचा कुठलाच स्वार्थ नसतो…
कारण तो बाप असतो…
—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—
4. बाबा म्हणजे काय ? मराठी कविता
बाबा म्हणजे…
स्तंभ, प्रत्येक वादळात काही न बोलता खंबीर पणे उभा राहणारा,
ढाल, आपल्या परिवारावर आलेलं प्रत्येक संकटाला एकटा सामोर जाणारा,
ती व्यक्ती जो आपल्या परिवाराला खुश ठेवण्यासाठी काहीही करू शकते,
आपल्या मुलांच्या लग्नासाठी चपला झिवणारा,
डोळ्यातील अश्रू हळूच पुसून चेहऱ्यावर हास्य आणणारा,
स्वतःसाठी कधी एकही रुपया खर्च न करता पण
आपल्या मुलांसाठी पाहिजे ते घेऊन येणारा ..
पण या वादाला कधी दिसनका कारण
आयुष्यात सगळं काही मिळेल पण या बाबाला कधी विसरू नका कारण
त्याची जागा दुसरं कोणीच नाही घेऊ शकत ..
—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—
5. माझे बाबा मराठी कविता
विसरू नको रे आई बापाला, वेड्या मनाची वेडी माया
होईन मी मोठी शिकून शिकून, मारीन भरारी पाखरू होऊन
शाळेतून आल्यावर काम करणार, तुझ्याविना मला जन्माशी कोण घालणार
सांग ना ग आई मला कोण जपणार, होईल ग मी जेव्हा राजाची राणी
गाळू नको तुझ्या डोळ्यातलं पाणी, तुझ्याविना जन्माशी मला कोण घालणार
जाईन मी दूर दूर माझी आई रडणार….
जाईन मी दूर दूर माझे बाबा रडणार…
—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—
तर मित्रांनो तुम्हाला Bap Kavita In Marathi या कविता कशा वाटल्या ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा अणि अजुन कवितांसाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की दया .
धन्यवाद !!!!!!!
Post a Comment