Header Ads

Kase Visru Song Lyrics | Pranil Hatiskar | कसे विसरू

मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हाला Kase Visru Song Lyrics वाचायला मिळतील. या गाण्याचे बोल प्राणिल हतीसकर यांनी लिहिले आहेत. तर गाणं हे केवल वाळंज यांनी गायलेलं आहे .आणि विवेक सांगळे आणि अंकिता वालावकर यांनी यामध्ये अभिनय केला आहे. चला तर मग बघूया कसे विसरू या गाण्याचे बोल -


सॉन्ग - कसे विसरू
लिरिक्स & म्युझिक - प्रणिल हातीसकर
सिंगर - केवल वाळंज
म्युझिक अरेंजर - विवेक म्हामुणकर
म्युझिक ऑन - प्रणिल आर्टस्


Kase Visru Song Lyrics | Marathi


( कसे विसरू क्षण ते हळवे तुझी सोबत ती स्वप्नांची एकत्र बांधलेली पंगत कस विसरू... सांग ना कसे विसरू .....)

कसे विसरू .....
कसे विसरू क्षण ते वाटे हवे ......
कसे विसरू क्षण ते वाटे तुझ्यासवे ....
तुझी आस हि मना छळते का उरी .....
तू थांब ना आता नको हि वाटे दुरी ....
कसे विसरू ..... कसे विसरू ......

जेव्हा काहीच नव्हतं ..... तेव्हा फक्त तू होतीस ......
पण परिसस्पर्श करून तू वादळासारखी निघून गेलीस ......
कसं विसरू सांग ..... कसे विसरू .....

हा हा तुझी साथ तुझी संगत ...
जेवायला फिरायला दोघांची पंगत .....
स्वप्ननांना एक दिशा नव्हती कुठली दुसरी नशा
तू आणि मी ,,, मी आणि तू
बाकी दुनिया उडन छू
नजरेचा डाव असा छळतो का वनवास जसा


(प्रेम ......... खूप मेहनत लागते हे स्वप्न साकार व्हायला ... स्वप्नच असत ते काही क्षण जागलेलं आणि काही क्षणात कोलमडलेलं )

तुझ्यासाठी केला होता खटाटोप सारा
कुठून हा आला सोसाट्याचा वारा
तुझ्यासाठी केला होता खटाटोप सारा
कुठून हा आला सोसाट्याचा वारा

कळले नाही मला
कळले नाही तुला
का अंधारला खेळ स्वप्नातला ......
खेळ स्वप्नातला ....

हो कसे विसरू क्षण ते वाटे हवे
कसे विसरू क्षण ते होते तुझ्यासवे
तुझी आस हि मला , छळते का उरी
तू थांब ना आता .... नको हि वाटे दुरी

कसे विसरू .......
कसे विसरू .......
कसे विसरू ........



(आठवण त्यांची येते ज्यांना आपण विसरतो . पण सालं तुला विसरताच येत नाही सांग ना कसं विसरू ... कसे विसरू ....)





हे पण वाचा 👇👇👇



तर मित्रानो आपण Kase Visru Song Lyrics बघितले. यामध्ये काही मिस्टेक असेल तर मला नक्की सांगा.आणि अन्य मराठी गाण्यांच्या लिरिक्स संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .

धन्यवाद 🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.