Header Ads

दत्ता अवधूता तुझे रे मला वेड लागले Lyrics | Datta Bhajan Marathi

 


नमस्कार या पोस्टमध्ये आपण दत्ता अवधूता तुझे रे मला वेड लागले Lyrics बघणार आहोत.
____________________________

दत्ता अवधूता तुझे रे मला वेड लागले Lyrics

दत्ता अवधूता तुझे रे मला वेड हे लागले
वेड हे लागले...
श्रीपाद वल्लभा
तुझ्या दर्शना नयन आसावले
नयन आसावले....|| धृ ||


रूप तुझे छान सगुण निर्गुण
दत्ता तुझे गुण गातो
अनुसयाचा साक्षात्कार
त्रैमूर्ती तू सगुण साकार
तुझ्या पायी दत्ता म्हणे माझे देवाना दावले
हे..दत्ता अवधूता तुझे रे मला वेड हे लागले .. || १ ||


पावन गाणगापुरी प्रीती संगमावरी
दत्ता तुझे सुंदर ध्यान
ब्रह्मा विष्णू आणि महेश
स्वामी तयाचा तू परमेष
भावपुष्पमाला गुरु चरणाशी..
दत्ता हो वाहिले
श्रीपाद वल्लभ तुझ्या दर्शना नयन असावले.. || २ ||


तुझं कृपासिंधू तूच दिनबंधू
चराचरी तू अनंता
गुरुचरित्राची अमृतधारा
भवसागरी लावी किनारा
तुझ्याच कृपेने जीवन माझे
देवा सुखावले...
हो...दत्ता अवधूता तुझे रे मला वेड हे लागले ..|| ३ ||


हो.. श्रीपाद वल्लभा
तुझ्या दर्शना नयन आसावले
नयन आसावले....||
☘ ☘ ☘ ☘ ☘
____________________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇
____________________________

👀आज या पोस्टमध्ये आपण दत्ता अवधूता तुझे रे मला वेड लागले Lyrics बघणार आहोत.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 💛💛💛!!!!!!
____________________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.