गुरुदत्ता मी दर्शनाला पायी चालत येईन Lyrics | Gurudata Mi Darshanala Payi Chalat Yein
नमस्कार या पोस्टमध्ये आपण गुरुदत्ता मी दर्शनाला पायी चालत येईन Lyrics बघणार आहोत.
______________________
गुरुदत्ता मी दर्शनाला पायी चालत येईन Lyrics
तुला खांद्यावर घेईन
तुला मिरवीत नेईन
गुरुदत्ता मी दर्शनाला
पायी चालत येईन || धृ ||
ही ओढ तुझी वेडी अशी भोळी भाबडी
नरसोबाची वाडी तुझी माय पुढे ओढी
दत्ता तयाचे त्रिरूप मी काळजात ठेवीन
गुरुदत्ता मी दर्शनाला
पायी चालत येईन || १ ||
तुझे गाणगापूर येता सुख पावले हो चित्ता
चाल चालूनीया दमता हात ठेवी दत्त माथा
दत्त देईल हूरूप धन्य होईल जीवन
गुरुदत्ता मी दर्शनाला
पायी चालत येईन || २ ||
दत्तवाडी एक तारा असा सोबती तोच खरा
जन्ममरणाचा चूकवी फेरा माझे नमन त्या ईश्वरा
मन विसावे लोक दत्त पायी वाही ऋण
गुरुदत्ता मी दर्शनाला
पायी चालत येईन || ३||
* * * * * * *
______________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
______________________
👀आज या पोस्टमध्ये आपण गुरुदत्ता मी दर्शनाला पायी चालत येईन Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💜💜💜 !!!!!
______________________
Post a Comment