Header Ads

मोठ्या महादेवा धावून याहो दुखात Lyrics | Shiv Shankarache Bhajan



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण मोठ्या महादेवा धावून याहो दुखात Lyrics बघणार आहोत.
___________________________

🌹मोठ्या महादेवा धावून याहो दुखात Lyrics🌹

मोठ्या महादेवा धावून या हो दुःखात
औंदाच वरीस जाऊदे माझं सुखात || धृ ||

यात्रेला येईन वर्षाकाठी
कावड तुझी घेऊन पाठी
न्हाऊ घालीन तुला मी दह्या दुधात
औंदाच वरीस जाऊदे माझं सुखात || १ ||

मुंगीचा शंभू केला उद्धार
मुंगी घाट झाला अमर
रूप हे शंभू तुझे चराचरात
औंदाच वरीस जाऊदे माझं सुखात || २ ||

गेल्या आल्याचा तु रे वाली
केलीस त्यांची तू रखवाली
भक्तांचा उद्धार करशी एका क्षणात
औंदाच वरीस जाऊदे माझं सुखात || ४||

मोठ्या महादेवा धावून या हो दुःखात
औंदाच वरीस जाऊदे माझं सुखात ||

§ § § § § § §
___________________________



✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
___________________________

👀आज या पोस्टमध्ये आपण मोठ्या महादेवा धावून याहो दुखात Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💛💛💛 !!!!!!!!!
___________________________




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.