Vitthal Bhajan Lyrics | वाचा विठ्ठलाच्या भजनांचे लिरिक्स
1. देव भावाचा भुकेला
देव भावाचा भुकेला
वैकुंठ सोडोनिया आला
पुंडलिके उभा केला
रूप सुंदर सावळा
धरियेले कर कटी
सर्वांगी चंदनाची उटी
माळ गळा वैजंती
दासी जणी ध्यात चित्ती
2. आभाळीचा चांद माझ्या
आभाळीचा चांद माझ्या आज अंगणात
पंढरीचा राया दळी जनीच्या घरात
किती करी काम देवा घेई रे विसावा ,
देवा हेच एक एवढे रे मन किती घ्यावा
घनश्याम विठ्ठल रे पंढरीच्या नाथा
देवा धावुनिया भक्तांपाठी वृथा शिन वाया
जरा थांबू दे रे देवा कोमल हे हात तुझे
पंढरीचा राया दळी जनीच्या घरात
किती माझ्यासंगे गाउनिया गाणी ,
देवा भागलास आता तू रे चक्रपाणी
किती पितांबर शोभे गळा वैजंतीमाळा
असा हरी गरीबाच्या झोपडीत झोपी गेला
सावलीच गोजिरी हि मूर्ती सदा नयनात
पंढरीचा राया दळी जनीच्या घरात
- शांताबाई जोशी
3. विठू माझा लेकुरवाळा
विठू माझा लेकुरवाळा
सांगे गोपाळांचा मेळा
निवृत्ती हा खांद्यावरी
सोपानाचा हात धरी
पुढे चाले ज्ञानेश्वर
मागे मुक्ताबाई सुंदर
गोरा कुंभार मांडीवरी
चोख जीव बरोबरी
बंका कडेवरी
नामा करांगुली धरी
जणी म्हणे गोपाळा
करी भक्तांचा सोहळा
- पी. सावळाराम
4. कोटी कोटी रूपे तुझी
कोटी कोटी रूपे तुझी, कोटी कोटी चंद्र - सूर्य - तारे
कुठे कुठे शोधू तुला, तुझे अनंत देव्हारे
बीज अंकुरे ज्या ठायी , तिथे तुझा वास
तुझा स्पर्श आणून देतो फुलाला सुवास
चराचरा रंगविषयी , रंग तुझा कोणता रे ?
कधी दाह ग्रीष्माचा तू , कधी मेघ ओला
जणी निर्जनीही तुझा पाय रोवलेला
तुझी खून नाही ऐसा गाव तरी कोणता रे ?
खरे रूप देवा तुझे कोणते कळेना
तूच विटेवरी तूच वैकुंठीचा राणा
तुला आळवाया घ्यावा शब्द तरी कोणता रे ?
- यशवंत देव
5. छुन्नूक छुन्नूक टाळ वाजवी
छुन्नूक छुन्नूक टाळ वाजवी पाटामधलं पाणी
रानपाखरासंग गातो तुझी विठ्ठला , गाणी
मोत्यांच्या कणसात डोलते तुझे देखणे रूप
निळं सावळं धुकं भोवती कुणी फिरविला धूप
पंख उभारून ऊस उभा हा , मोर जसा डोलतो
मुलं नि कांडा कोथिंबिरीतून विठू बघा नाचतो
घाम गळिता रोप सुखावे , विठू तुझी करणी
मातीमधला अबीरबुक्का रोज लावितो भाळी
तुझं नाव मी घेता देवा , पान वाजवी टाळी
विठ्ठल अवघा झाला मळा, ओठी अभंगवाणी
- श्रीकांत नरुले
6. आळविते मी तुला विठ्ठला
आळविते मी तुला विठ्ठला
देहमानाला व्यापून उरला
तव चरणांचा लळा
रोज पहाटे नयनांपुढती
तुझी प्रगटते श्यामल मूर्ती
मनभावांच्या निर्मळ ज्योती घेते आरतीला
उपासनेची उटी लाविते
शुभनामांची माळ गुंफिते
निर्मोहचा रेखून देते टिळक तुझ्या भाळा
प्रेमघना रे कधी तू येशील
मम जीवन वन फुलवून जाशील
रात्रंदिन मी हा मधुमंगल ध्यास मनी धरिला
- संजीवनी मराठे
7. कर्म करिता ते निष्काम
कर्म करिता ते निष्काम , मुखी राहो विठ्ठल नाम
देह चांदणी देव्हारा, आत आत्म्याशी निवारा
मन नसावे मळीण , ते तो आत्म्याचे आसन
देह ईश्वराचे धाम , मुखी राहो विठ्ठल नाम
घाम श्रमाचा गाळावा , देह निगेने पाळावा
नको इंद्रियाचे लाड , कामक्रोधांचे पवाड
पाला नीतीचे नियम , मुखी राहो विठ्ठल नाम
स्वये तरी दुसऱ्या तारी , तरीच होइगा संसारी
देह सेवेचे साधन , देह वाचायचे धन
श्रमी लाभतो विश्राम , मुख राहो विठ्ठल नाम
ग. दि. माडगूळकर
8. देव माझा विठू सावळा
देव माझा विठू सावळा
माळ त्याची माझिया गळा
विठू राहे पंढरपुरी , वैकुंठच हे भूवरी
भिमेच्याकाठी डुले भक्तीचा मळा
साजिरे रूप सुंदर , किती झळके पितांबर
कंठात तुळशीचे हार , कस्तुरी टिळा
भजनात विठू डोलतो , कीर्तनी विठू नाचतो
रंगून जाई भक्तांचा पाहुनी लळा
-सुधांशु
9. पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग
पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग
बोलतो पाषाणातही तोचि पांडुरंग
पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग
संसाराचे सार सांगे सुगरणीचा खोपा
निसर्गाशी नाते जपता मार्ग होई सोपा
मानवास कर्म शिकावी मुंग्यांची रांग .....
क्षण क्षण वाचविला जो तोचि पांडुरंग
बोलतो पाषाणही तोचि पांडुरंग
पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग ...
आव मोठा भाव खोटा जनात मनात
दुजाभाव कशासाठी तुझ्यात माझ्यात
जनतेला घेऊनिया जातो संग .. संग ...
माणसात माणूस दिसत तोचि पांडुरंग
बोलतो पाषाणही तोचि पांडुरंग
पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग ...
देवाजीची दौलत सारी आपणही त्यात
विकासात कर्म आपुले प्रकाशाची रात
करोनिया जनसेवा जाहलो अभंग
नीतीवंत नीतीवंत तोचि पांडुरंग
बोलतो पाषाणही तोचि पांडुरंग
पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग ...
10. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल
बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल
करावा विठ्ठल जीवभाव
बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल
करावा विठ्ठल जीवभाव
येणे सोसे मन झाले हावभरी
येणे सोसे मन झाले हावभरी
परत माघारी येत नाही
बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल
करावा विठ्ठल जीवभाव
बंधनांपासून उकलली गाठी
बंधनांपासून उकलली गाठी
देता आली मिठी सावकाश
बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल
करावा विठ्ठल जीवभाव
तुका म्हणे देह भरीला विठ्ठल
तुका म्हणे देह भरीला विठ्ठल
काम क्रोधे केले घर रिते
बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल
करावा विठ्ठल जीवभाव
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
11. सावळया विठ्ठला तुझ्या
सावळया विठ्ठला तुझ्या दारी आले
विसरुनी गेले देहभान
गोजिरे हे रूप पाहुनिया डोळा
दाताला उमाळा अंतरी माझ्या
तुकयाचा भाव पाहुनी निःसंग
तारिले अभंग तूच देवा
स्वीयकारी हि सेवा आता माझी
कृपाकटाक्षाचे पाजावी अमृत
ठेव शिरी हात पांडुरंग
-रा. ना. पवार
12. देखिले तुमचे चरण
देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन |
कासया त्यजीन प्राण आपुलगे माये || १ ||
असें धनी वरी आपुले माहेरी |
मग तो श्रीहरी गीती गाईनगे माये || २ ||
सकळही गोत माझे पंढरीसी जाण |
बाप रखुमा देवी वरा विठ्ठलाची आन || ३ ||
13. विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती
विठ्ठल सोयरा सज्जन सांगती
विठ्ठल हा चित्त्ती बैसलासे
विठ्ठल हे अंग व्यापिले काया
विठ्ठल हि छाया माझी मज
बैसला विठ्ठल जिव्हे चिया माथा
नवदे अन्यथा आन तुझे
सकळ इंद्रिय मन हे प्रधान
तेही करी ध्यान विठोबाचे
तुका म्हणे याहो विठ्ठलासी आता
नये विसंवता माझी मज
विठ्ठल हा चित्त्ती बैसलासे
14. आधी रचली पंढरी
आधी रचली पंढरी |
मग वैकुंठ नगरी || १ ||
जेव्हा नव्हते चराचर |
तेव्हा होते पंढरपूर || २ ||
जर्व्ह नव्हती गोदा गंगा |
तेव्हा होती चंद्रभागा || ३ ||
चंद्रभागेचे तटी |
धान्य पंढरी गोमटी || ४ ||
नासिलीया भूमंडळ |
उरे पंढरी मंडळ || ५ ||
असे सुदर्शनवारी |
म्हणुनी अविनाशी पंढरी || ६ ||
नामा म्हणे बा श्रीहरी |
आम्ही नाचू पंढरपुरी || ७ ||
हे पण वाचा 👇👇👇
तर मित्रानो आज आपण Vitthal Bhajan Lyrics बघितला. अधिक मराठी लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.
हि पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!!
Post a Comment