Header Ads

Datta Bhajan Marathi Lyrics | श्री दत्तांची भजने लिरिक्स मराठी मध्ये

नमस्कार मित्रांनो ,आज आपण या पोस्ट मध्ये Datta Bhajan Marathi Lyrics बघणार आहोत .

दत्तदिगंबर दैवत माझे

दत्तदिगंबर दैवत माझे
हृदयी माझ्या नित्य विराजे

अनसूयेचे सत्व आगळे
तीन्ही देवहि झाली बाळे

त्रैमूर्ती अवतार मनोहर,
दीनोद्धारक त्रिभुवनि गाजे


तीन शिरे, कर सहा शोभती
हास्य मधुर शुभ वदनावरती


जटाजूट शिरि, पायि खडावा,
भस्मविलेपीत कांती साजे


पाहुनि प्रेमळ सुंदर मूर्ती
आनंदाचे आसू झरती


सारे सात्विक भाव उमलती,
हळुहळु सरते मीपण माझे

मला हे दत्तगुरु दिसले 

ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले
मला हे दत्तगुरु दिसले


माय उभी ही गाय होऊनी, पुढे वासरू पाहे वळुनी
कृतज्ञतेचे श्वान विचारी, पायावर झुकले


चरण शुभंकर फिरता तुमचे, मंदिर बनले उभ्या घराचे
घुमटा मधुनी हृदयपाखरू स्वानंदे फिरले


तुम्हीच केली सारी किमया, कृतार्थ झाली माझी काया
तुमच्या हाती माझ्याभवती औदुंबर वसले

शांत हो श्रीगुरुदत्ता 

शांत हो श्रीगुरुदत्ता मम चित्ता शमवी आता
शांत हो श्रीगुरुदत्ता मम चित्ता शमवी आता


तूं केवळ माता जनिता सर्वथा तूं हितकर्ता
तूं आप्तस्वजन भ्राता सर्वथा तूचि त्राता


भयकर्ता तूं भयहर्ता दंडधर्ता तूं परिपाता
तुजवाचुनि न दुजी वार्ता तूं आर्ता आश्रय दत्ता


मम चित्ता शमवी आता
शांत हो श्रीगुरुदत्ता मम चित्ता शमवी आता


अपराधास्तव गुरुनाथा जरि दंडा धरिसी यथार्था
तरि आम्ही गाउनि गाथा तव चरणीं नमवूं माथा


तूं तथापि दंडिसी देवा कोणाचा मग करूं धावा
सोडविता दुसरा तेव्हां कोण दत्ता आम्हां त्राता


मम चित्ता शमवी आतां
शांत हो श्रीगुरुदत्ता मम चित्ता शमवी आतां


तूं नटसा होउनि कोपी दंडितांहि आम्ही पापी
पुनरपिही चुकत तथापि आम्हांवरि नच संतापी


गच्छतः स्खलनं क्वापि असें मानुनि नच हो कोपी
निजकृपालेशा ओपी आम्हांवरि तूं भगवंता


मम चित्ता शमवी आतां
शांत हो श्रीगुरुदत्ता मम चित्ता शमवी आता


तव पदरीं असता ताता आडमार्गीं पाऊल पडता
सांभाळुनि मार्गावरता आणिता न दूजा त्राता


निजबिरुदा आणुनि चित्ता तूं पतीतपावन दत्ता
वळे आतां आम्हांवरता करुणाघन तूं गुरुनाथा


मम चित्ता शमवी आता
शांत हो श्रीगुरुदत्ता मम चित्ता शमवी आता


सहकुटुंब सहपरिवार दास आम्ही हें घरदार
तव पदी अर्पुं असार संसाराहित हा भार


परिहरिसी करुणासिंधो तूं दीनानाथ सुबंधो
आम्हां अघलेश न बाधो वासुदेव प्रार्थित दत्ता


मम चित्ता शमवी आता
शांत हो श्रीगुरुदत्ता मम चित्ता शमवी आतां


शांत हो श्रीगुरुदत्ता मम चित्ता शमवी आता
शांत हो श्रीगुरुदत्ता मम चित्ता शमवी आता


मित्रानो आज आपण या पोस्ट मध्ये Datta Bhajan Marathi Lyrics बघितले . अशाच भक्तिमय पोस्ट साठी True Marathi Lyrics या साइट ला जरूर भेट दया .



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.