Header Ads

दत्ता अवधूता तुम्ही कधी हो येणार Lyrics | Datta Avdhuta Tumhi Kadhi Ho Yenar



नमस्कार स्वागत आहे तुमचं True Marathi Lyrics वर !!!!!!!!! आज या पोस्टमध्ये आपण दत्ता अवधूता तुम्ही कधी हो येणार Lyrics बघणार आहोत.
_________________________

🌻दत्ता अवधूता तुम्ही कधी हो येणार Lyrics 🌻

दत्ता अवधूता तुम्ही कधी हो येणार
कधी हो येणार मला माहूरला नेणार || धृ ||

या बाई गुरूच्या मठात मी लावली तुळस
लावली तुळस मला गुरूचा उपवास
दत्ता अवधूता तुम्ही कधी हो येणार...|| १ ||

या बाई गुरूच्या मठात मी बाई लावला उंबर
लावला उंबर गुरु माझे हो दिगंबर
दत्ता अवधूता तुम्ही कधी हो येणार...|| ३ ||

या बाई गुरूच्या मठात मी लावला पिंपळ
लावला पिंपळ गुरु माझे हो चंचळ
दत्ता अवधूता तुम्ही कधी हो येणार...|| ३ ||

या बाई गुरूच्या मठात मी लावली जाई जुई
लावली जाई जुई माझ्या गुरुची पुण्याई
दत्ता अवधूता तुम्ही कधी हो येणार...|| ४ ||

या गुरूच्या मठात मी बाई बसले जाऊन
बसले जाऊन शुद्ध बुद्ध हरपून

§ § § § § §
_________________________



👀 ही भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇
_________________________

👧आज या पोस्टमध्ये आपण दत्ता अवधूता तुम्ही कधी हो येणार Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏!!!!!!

_________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.