Header Ads

किती शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची Lyrics | Kiti Shobhun Disate Murti Ganapati Bappachi



नमस्कार या पोस्टमध्ये आपण किती शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची Lyrics बघणार आहोत‌.
_________________________

किती शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची Lyrics

माळ गळ्यात फुलांची आणि माणिक मोत्याची
किती शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची || धृ ||

भाद्रपद महिन्याला येतो घरात वर्षान
बसवून पाटावर तुला आणला हर्षान 
तोरण बांधिले घराला शोभा वाढवी मालाची
किती शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची || १||

मान पहिला पूजनाचा शुभ दिनी शुभ कार्याला
लाडू आणि मोदक देऊन आवडीने खायला
ज्योत पेटवू दिव्या समयीच्या मातीची
किती शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची || २ ||

असा लाडका देव माझा त्याचा वाटे आम्हा हेवा
नको मागणं काही आता द्या सुखाचा मज ठेवा
राजेश अर्पितो सुमने सचिनच्या काव्याची
किती शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची || ३ ||

* * * * * * * * *
_________________________

✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇👇
_________________________

आज या पोस्टमध्ये आपण किती शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💛💛💛!!!!!!!!
_________________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.