लगोरी खेळाची माहिती मराठी | Lagori Khealachi Mahiti
भारतीय संस्कृतीत अनेक पारंपरिक खेळ पिढ्यान् पिढ्या खेळले गेले आहेत. त्यातला एक सर्वात रोमांचक, थरारक आणि मनोरंजक खेळ म्हणजे लगोरी. महाराष्ट्रात "लगोरी" या नावाने प्रसिद्ध असणारा हा खेळ भारतातील इतर भागांत "सातगोट्या", "पिट्ठू", "लिंगोरचा खेळ" किंवा "येडू" या नावाने ओळखला जातो. या खेळाचे वैशिष्ट्य म्हणजे हा खेळ खेळण्यासाठी लागणारी साधी साधने. आज या पोस्टमध्ये आपण लगोरी खेळाची माहिती बघणार आहोत.
आज मोबाईल गेम्स आणि संगणकावरच्या खेळांमुळे पारंपरिक खेळ बाजूला पडले आहेत, पण लगोरीसारखे खेळ शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासासाठी उपयुक्त आहेत.
____________________________________________
⛹लगोरी खेळाची माहिती⛹
- लगोरी खेळाची अचूक उत्पत्ती सांगणे कठीण आहे. पण हा खेळ शतकानुशतके भारतात खेळल्या जाणाऱ्या खेळांपैकी महत्त्वाचा खेळ आहे.जुन्या पिढ्यांना हा खेळ त्यांच्या बालपणातील सोनेरी आठवणीत नेतो.
- अंगणात किंवा मोकळ्या मैदानी जागेत हा खेळ मुल-मुली एकत्र खेळत असत. गावातील दुपारी, उन्हाळी सुट्टी किंवा सणासुदीच्या काळात लगोरीचा गोंगाट ऐकू येत असे.
- हा खेळ भारतीय ग्रामीण जीवनातील सहकार, उत्साह आणि निरागसतेचे प्रतीक मानला जातो. आजही काही गावांमध्ये लगोरी स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि त्यामुळे अजूनही या खेळाचे अस्तित्व टिकून आहे.
____________________________________________
खेळासाठी लागणारी साधने
लगोरी खेळासाठी फारसे साहित्य लागत नाही. यासाठी लागते ती केवळ सात गोट्या आणि एक चेंडू.1) सात दगडाचे तुकडे
हे साधारण सपाट, वेगवेगळ्या आकाराचे दगड असतात. सात दगडांची रचना करणे सोपे व्हावे यासाठी खालची गोटी मोठी आणि वरची लहान असते. गोट्यांची निवड करताना त्या न रुळणाऱ्या आणि स्थिर राहतील अशा असाव्यात.
2) चेंडू
साधारण रबराचा किंवा टेनिससारखा चेंडू वापरला जातो. फार कठीण चेंडू वापरल्यास दुखापत होऊ शकते. ही दोन्ही साधने सहज उपलब्ध होत असल्यामुळे लगोरी हा खेळ मुलांमध्ये लोकप्रिय होता.
* खेळाडूंची संख्या
लगोरी हा दोन गटांत खेळला जातो. प्रत्येक गटात किमान ४ ते ७ खेळाडू असणे सोयीचे असते. खेळाडूंची संख्या वाढली की खेळ अधिक मनोरंजक होतो.
________________________________
खेळाची पद्धत
✔ लगोरी खेळाची पद्धत थोडक्यात अशी आहे👇👇- सुरुवातीला सात दगड एकावर एक रचून ठेवतात.
- एका गटातील खेळाडू चेंडू मारून त्या गोट्या पाडतो.
- एका गटातील खेळाडू चेंडू मारून त्या गोट्या पाडतो.
- दगड पडल्यानंतर त्या गोट्या पुन्हा रचण्याचा प्रयत्न तो गट करतो.
- याच वेळी विरोधी गटातील खेळाडू चेंडूने त्यांना मारण्याचा प्रयत्न करतात.
- जर याच वेळी विरोधी गटातील खेळाडू चेंडूने त्यांना मारण्याचा प्रयत्न करतात.
- जर दगड नीट रचून झाले, तर गुण दगड पाडणाऱ्या गटाला मिळतात.
- पण जर विरोधी गटाने चेंडूने खेळाडूंना मारले, तर ते गुण विरोधी गटाला मिळतात.
- ही धावपळ, चपळाई आणि रणनीतीमुळे खेळ अत्यंत रंगतदार होतो.
________________________________
खेळाचे नियम
खेळताना काही नियम पाळावे लागतात. ते असे –➤ चेंडूने मारताना कमरेखालीच मारायचे असते.
➤ गोट्या रचताना त्या पूर्वीप्रमाणे नीट रचल्या गेल्या पाहिजेत.
➤ खेळाडूंनी चेंडू जस्त वेळ हातात धरून ठेवायचा नसतो.
➤ जाणूनबुजून इजा करणे, धक्काबुक्की करणे टाळावे.
➤ मैदानात सर्व खेळाडूंनी ठरलेल्या मर्यादेतच राहावे.
हे नियम पाळल्यास खेळ अधिक मजेदार व शिस्तबद्ध होतो.
_________________________________
लगोरी खेळातील थरार आणि मजा
लगोरीची खरी मजा म्हणजे गोट्या रचताना विरोधी गटाला चकवणे आणि चेंडूच्या मारातून सुटून जाणे. गोट्या पडल्यानंतर खेळाडू पळत सुटतात आणि दुसरे त्यांचा पाठलाग करतात. या खेळातील हशा, टाळ्या, धावपळ, कौशल्य यामुळे वातावरण रंगतदार होते. प्रत्येक खेळाडूला वेग, चपळाई आणि धाडस दाखवावे लागते.शारीरिक फायदे
➤ लगोरी हा खेळ मुलांच्या शरीराच्या विकासासाठी उपयुक्त आहे.➤ सतत धावपळीमुळे शारीरिक तंदुरुस्ती राहते.
➤ उड्या मारणे, वाकणे, चेंडू चुकवणे यामुळे स्नायूंमध्ये लवचिकता येते.
➤ डोळे आणि हात यांचा समन्वय साधण्याची क्षमता वाढते.
➤ शरीरात सहनशक्ती आणि ताकद वाढते.
मानसिक फायदे
हा खेळ मुलांच्या मानसिक विकासातही हातभार लावतो.➤ गोट्या रचण्यासाठी लक्ष, एकाग्रता आणि संयम लागतो.
➤ विरोधी गटाला चकवण्यासाठी बुद्धी, युक्ती आणि रणनीतीची गरज भासते.
➤ सतत जिंकणे-हार मानणे यामुळे मुलांची मानसिक परिपक्वता वाढते.
➤ निर्णय क्षमता आणि वेगाने कृती करण्याची कला विकसित होते.
सामाजिक फायदे
लगोरी हा संघात खेळला जातो. त्यामुळे सामाजिक जीवनातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळतात.➤ संघभावना, सहकार्य आणि टीमवर्क वाढते.
➤ मित्रमैत्रिणींमध्ये संवाद आणि बंध अधिक घट्ट होतात.
➤ नियमांचे पालन करण्याची आणि प्रामाणिकपणे खेळण्याची सवय लागते.
➤ परस्पर आदर आणि मैत्री वाढते.
________________________________
खेळाचे नियम
खेळताना काही नियम पाळावे लागतात. ते असे –
- चेंडूने मारताना कमरेखालीच मारायचे असते.
- गोट्या रचताना त्या पूर्वीप्रमाणे नीट रचल्या गेल्या पाहिजेत.
- खेळाडूंनी चेंडू जास्त वेळ हातात धरून ठेवायचा नसतो.
- जाणूनबुजून इजा करणे, धक्काबुक्की करणे टाळावे.
- मैदानात सर्व खेळाडूंनी ठरलेल्या मर्यादेतच राहावे.
- हे नियम पाळल्यास खेळ अधिक मजेदार व शिस्तबद्ध होतो.
________________________________
आजच्या काळातील स्थिती
पूर्वी गावोगावी लगोरी खेळ अत्यंत लोकप्रिय होता. पण आजच्या काळात शहरीकरण, मोकळ्या जागांची कमतरता आणि मोबाईल गेम्समुळे हा खेळ मागे पडत आहे. मुलांना मैदानात खेळण्याऐवजी मोबाईल, टीव्ही, संगणकाची सवय लागली आहे. त्यामुळे पारंपरिक खेळांचा वारसा जपला गेला नाही तर तो विस्मृतीत जाईल.काही शाळांमध्ये, क्रीडा महोत्सवांमध्ये किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांत लगोरीसारखे खेळ पुन्हा खेळवले जातात. या प्रयत्नांमुळे मुलांना या खेळाची ओळख होते. शालेय अभ्यासक्रमात किंवा स्थानिक स्पर्धांमध्ये लगोरीला स्थान मिळाले तर हा खेळ पुन्हा लोकप्रिय होऊ शकतो.
________________________________
समारोप
लगोरी हा फक्त एक खेळ नाही तर तो आपल्या संस्कृतीचा वारसा आहे. त्यातून मुलांच्या शारीरिक तंदुरुस्तीबरोबर मानसिक व सामाजिक विकास होतो. हा खेळ मुलांना एकत्र आणतो, आनंद देतो आणि संघ भावना शिकवतो.आजच्या पिढीने मोबाईल गेम्सपेक्षा पारंपरिक खेळांना प्राधान्य दिले पाहिजे. मोकळ्या मैदानात, खुल्या हवेत खेळण्याचा आनंद वेगळाच असतो. म्हणूनच, "लगोरी" हा खेळ वाचवणे म्हणजे आपल्या परंपरेचे, संस्कृतीचे आणि आरोग्याचे रक्षण करणे होय. मित्रांनो आज या पोस्टमध्ये आपण लगोरी खेळाची माहिती मराठी मधून बघितली. ही पोस्ट शेवटपर्यंत वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!
Post a Comment