Header Ads

संत तुकाराम महाराजांचे अभंग | Tukaram Maharaj Abhang Marathi



स्वागत आहे तुमचं True Marathi Lyrics वर !!!!!!!!!!!! या पोस्ट मध्ये तुम्हाला तुकाराम महाराजांचे अभंग वाचायला मिळतील. संत तुकाराम महाराजांचे जास्तीत जास्त अभंग शेअर करण्याचा प्रयत्न मी इथे केला आहे . चला तर मग वळूया अभंगांकडे -


तुकाराम महाराजांचे अभंग
तुकाराम महाराजांचे अभंग

1. नमन माझे गुरुराया

नमन माझे गुरुराया |
 महाराजा दत्तात्रया     || धृ ||

तुझी अवधूत मूर्ती |
माझ्या जिवीची विश्रांती     || १ ||

माझ्या जीवीचे साकडे | 
 कोण नीवरील कोडे कोडे   || २ ||

माझ्या अनुसूया सुता |
 तुका म्हणे पाव आता    || ३ ||


2. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल

बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल | 
 करावा विठ्ठल जिवाभावे  || धृ ||

येणे सोसे मन झाले हावभरी | 
 परत माघारी घेत नाही    || १ ||

बंधनांपासून उकलल्या गाठी | 
 देता आले मिठी सावकाश  || २ ||

तुका म्हणे देह भरीला विठ्ठले | कामक्रोध केले घर रिते    || ३ ||


3. नाम घेता उठाउठी

नाम घेता उठाउठी,
 होय संसाराची तुटी|| धृ ||
एस लाभ बांधा गाठी , 
 विठ्ठल पायी मिठी || १ ||
नामपरते साधन नाही , 
जे तू करिसी आणिक काही|| २ ||
हाकरोनो सांगे तुका ,
नाम घेता राहो नका || ३ ||


4. चंदनाचे हात पायही चंदन

चंदनाचे हात पायही चंदन | परिसा नाही हीन कोणी अंग     || १ ||
दीपा नाही पाठी पोटी अंधकार | सर्वांगे साकर अवघी गोड     || २ ||
तुका म्हणे तैसा सज्जनापासून | पाहता अवगुण मिळेची ना     || ३ ||


5. घेई घेई माझे वाचे

घेई घेई माझे वाचे | गोड नाम विठोबाचे   || धृ ||
डोळे तुम्ही घ्या रे सुख | पहा विठोबाचे मुख   || १ ||
तुम्ही आइका रे कान | माझ्या विठोबाचे गुण   || २ ||
मन तेथे धाव घेई | राही विठोबाचे पायी     || ३ ||
तुका म्हणे जिवा | नको सोडू या केशवा   || ४ ||


6. श्री गणेशा शारदा

श्री गणेशा शारदा , करिशी गाथना आम्ही वारांगने रामे ऐसा ....... || धृ ||
येथे आम्ही मानवाने वर्नावेते काय , स्वर्गीचे सुरवर बंदिती पाय ........ || १ ||
जायच्या गायनाने तटस्य शंकर , तयापरी पार नाही तुझे ........ || २ ||
तुका म्हणे आम्ही किंकारते किती इंद्राची मस्ती नागविती ......... || ३ ||


7. ओम कार प्रधान रूप गणेशाचे

ओम कार प्रधान रूप गणेशाचे , हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ......... || धृ ||
आकार तो ब्रम्हा उकार तो विष्णू , मकार महेश जानियेला ......... || १ ||
ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न , तो हा गजानन माय बाप .......... || २ ||
तुका म्हणे एसी आहे वेदवाणी, पाहावी पुराणी व्यासाचिया ...... || ३ ||


8. ये हंसावरती बसून

ये हंसावरती बसून , शारदे मयूरावरती बसून  || धृ ||
नेसून शुभ्र पातळ | गेला घालून मुक्ताफळ
किती कंबरपट्टा कसून
शारदे मयूरावरती बसून   || १ ||

हाती घेऊनिया वीणा | करी मंजुळ गायना
ये सभेमध्ये बसून
शारदे मयूरावरती बसून      || २ ||

तुका म्हणे ब्रम्हा नंदिनी | मम् हृदयी विराजूनी ,
दे अंत जीत बसून
शारदे मयूरावरती बसून      || ३ ||


9. ऐसे कैसे झाले भोंदू

ऐसे कैसे झाले भोंदू | कर्म करोनि म्हणती साधू     || १ ||
अंगाला लावुनिया राख | डोळे झांकुनिया करिती पाप     || २ ||
दावुनी वैराग्याची कळा | भोगी विषयांचा सोहळा     || ३ ||
तुका म्हणे सांगो किती | जालो तयांची संगती     || ४ ||


10. वेढा वेढा रे पंढरी

वेढा वेढा रे पंढरी | मोर्चेवला भीमातीरी       || धृ ||
चला चला संतजन | करू देवासी भांडण      || १ ||
लुटा लुटा पंढरपूर | धरा रखुमाईच्या वर     || २ ||
तुका म्हणे चला चला | घाव निशाणी घातका      || ३ ||


11. जण विजन झाले आम्हा

जण विजन झाले आम्हा ,
 विठ्ठल नामाप्रमाणे      || धृ ||
पाहे तिकडे मायबाप ,
 विठ्ठल आहे रखुमाई    || १ ||
वन पटतं एक भाव , 
अवघा ठाव सरता झाला    || २ ||
आठव नाही सुख दुःखा ,
 नाचे तुका कौतुके    || ३ ||


12. विठ्ठल पाहून आला

विठ्ठल पाहून आला माझ्या घरा ,
लिंब लोन करा सावळ्याला    || धृ ||

दूरच्या भेटीला बहू आवडीचा ,
जीवन सरिता नारायण    || १ ||

सर्व माझे गोत्र मिळाले पंढरी ,
मी माझ्या माहेरी धान्य झालो   || २ ||

तुका म्हणे माझा आला सखा हरी ,
संकट निवारी पांडुरंग   || ३ ||


13. पांडुरंगा पांडुरंगा

पांडुरंगा पांडुरंगा मी पतंग, तुझ्या हाती धागा   || धृ ||
पंचतत्वाचा केला पतंग , धागा लाविला निळा रंग  || १ ||
साही शास्त्रांचा सुटला वारा , चारी वेदांचा आधार त्याला  || २ ||
तुका म्हणे मी झालो पतंग , धागा आवरा हो पांडुरंगा  || ३ ||


14. आम्ही वैकुंठासी

आम्ही वैकुंठासी |   आलो या ची कारणासी |
बोलिले जे ऋषी |   साच भावे वार्तावया        || १ ||
झाडू संतांचे मारग |    आदराने भरले जग |
उच्छिष्टाचा भाग |   शेष उरले ते सेवू   || धृ ||

अर्थे लोपली पुराणे |    नाश केला शब्दज्ञाने |
विषयलोभी मन |    साधने बुडविली    || २ ||
झाडू संतांचे मारग |    आदराने भरले जग |
उच्छिष्टाचा भाग |    शेष उरले ते सेवू    || धृ ||

पिटू भक्तीचा डांगोरा |    काळिकाळासी दरारा |
तुका म्हणे करा |    जयजयकार आनंदे    || ३ ||
झाडू संतांचे मारग |   आदराने भरले जग |
उच्छिष्टाचा भाग |    शेष उरले ते सेवू    || धृ ||


15. आम्ही हरीचे सवंगडे

आम्ही हरीचे सवंगडे |   जुने ठायींचे वेडे बागडे |
हाती धरुनी कडे |   पाठी सवे वागविलो    || १ ||
म्हणोनि भिन्न भेद नाही |   देवा आम्हा एक देही |
नाहीजा लोकाही |  एकाएक वेगळे  || धृ ||

निद्रा करिता होतो पायी |  सवेंचि लंका घेतली तई |
वानरे गोवळ गाई |   सावे चारीत फिरतसो     || २ ||
म्हणोनि भिन्न भेद नाही |   देवा आम्हा एक देही |
नाहीजा लोकाही |   एकाएक वेगळे   || धृ ||

आम्हा नामाचे चिंतन   |   राम कृष्ण नारायण |
तुका म्हणे क्षण |   खाता जेविता न विसंभो    || ३ ||
म्हणोनि भिन्न भेद नाही |   देवा आम्हा एक देही |
नाहीजा लोकाही |   एकाएक वेगळे    || धृ ||


16. मागे बहुता जन्मी

मागे बहुता जन्मी |   हेचि करीत आलो आम्ही |
भवता पश्रमी दुःखे पीडिली निववू त्या     || १ ||
गरजा हरीचे पवाडे |  मिळो वैष्णव बागडे |
पाझर रोकडे |   काढू पाषाणामध्ये   || धृ ||

भाव शुद्ध नामावळी |    हर्षे नाचो पिटू टाळी |
घालू पाय तळी |    कळिकाळ त्या बळे     || २ ||
गरजा हरीचे पवाडे |     मिळो वैष्णव बागडे |
पाझर रोकडे |    काढू पाषाणामध्ये      || धृ ||

कामक्रोध बंदखानी |    तुका म्हणे दिले दोन्ही |
इंद्रियाचे धनी |   आम्ही जालो गोसावी   || ३ ||
गरजा हरीचे पवाडे |   मिळो वैष्णव बागडे |
पाझर रोकडे |    काढू पाषाणामध्ये   || धृ ||


17. कोटी जन्म पुण्य साधन साधिलें

कोटी जन्म पुण्य साधन साधिलें
कोटी जन्म पुण्य साधन साधिलें |
तेणे हाती आले हरीदास्य    || १ ||
रात्रीनं दिवस ध्यान हरीचे भजन |
काय वाचा मन भगवंती      || धृ ||

एकवीस कुळे जेणे उद्धारिली |
हे तो न कळे खोली भाग्यमंदा   || २ ||
रात्रीनं दिवस ध्यान हरीचे भजन |
काय वाचा मन भगवंती    || धृ ||

तुका म्हणे त्याची पायधुळी मिळे |
भावभय पळे वंदिताची   || ४ ||
रात्रीनं दिवस ध्यान हरीचे भजन |
काय वाचा मन भगवंती       || धृ ||


18. विष्णुमय जग वैष्णवांची धर्म

विष्णुमय जग वैष्णवांची धर्म | भेदभाव भ्रम अमंगळ || १ ||
अइका जी तुम्ही भक्त भागवत | कराल ते हिट सत्य करा || २ ||
कोणाही जीवाचा न घडो मत्सर | वर्म सर्वेश्वर पूजनाचे || ३ ||
तुका म्हणे एका देहाचे अवयव | सुख दुःख जीन भोग पाहे || ४ ||


19. नाचत पंढरीच्या जाऊ रे खेळिया

नाचत पंढरीये जाऊ रे खेळिया | विठ्ठल रखुमाई पाहू रे || धृ ||
आनंद तेथीचा मुकियासी वाचा | बहिर एकटी कानी रे |
आंधळ्यासी डोळे पांगळ्यासी पाय | तुका म्हणे वृद्ध होती तारुन्य ||
नाचत पंढरीये जाऊ रे खेळिया | विठ्ठल रखुमाई पाहू रे || धृ ||


20. ब्रह्मज्ञान जरी एके दिवशी कळे

ब्रह्मज्ञान जरी एके दिवशी कळे | 
 तात्काळ गळे हा अभिमान || १ ||
अभिमान लागे शुकाचिये पाठी | 
 व्यासे उपराटी दृष्टी केली || २ ||
जनक भेटीसी पाठविला तेणे | 
 अभिमान नाणे खोटे केले || ३ ||
खोटे करुनिया लाविला अभ्यासी |
 मेरू शिखरासी शुक गेला || ४ ||
जाउनिया तेणे साधिली समाधी | 
 तुका म्हणे तधी होतो आम्ही || ५ ||


21. सुख वाटे तुझे वर्णिता पवाडे

सुख वाटे तुझे वर्णिता पवाडे | 
 प्रेम मिठी पडे वदनासी || १ ||
व्याले दोन्ही पक्षी एका वृक्षावरी |
 आला दुराचारी पारधी तो || २ ||
वृक्षाचीया माथा सोडिला ससाणा
 | धनुष्यासी बाणा लाविले || ३ ||
तये काळी पक्षी तुज पक्षी आठविती | 
 धावे गा श्रीपती मायबापा || ४ ||
उडोनिया जात ससाणा मारील | 
 बैसता विंधील पारधी तो || ५ ||
ऐकोनियां धावा तया पक्षीयांचा | 
 धरिला सर्पाचा वेश वेगी || ६ ||
डंखोनि पारखी भूमीसी पाडिला | 
 बाण तो लागला संन्यासी || ७ ||
ऐसा तू कृपाळू आपुलिया दासा | 
 होसील कोवासा संकटीचा || ८ ||
तुका म्हणे तुझी कीर्ती त्रिभुवना | 
 वेदाचिये वाणी वर्ण वेणा ||९ ||


22. कर कटावरी तुळशीच्या माळा

कर कटावरी तुळशीच्या माळा | 
 ऐसे रूप डोळा दावील हरी || १ ||
ठेविले चरण दोन्ही विटेवरी | 
 ऐसे रूप हरी डावी डोळा || २ ||
किती पितांबर कास मिरवली | 
 दाखवी वाहिली एसी मूर्ती || ३ ||
गरुड पारावरी उभा राहिलासी | 
 आठवे मानसी तोचि रूप || ४ ||


23. आनंदाचे डोही आनंद तरंग

आनंदाचे डोही आनंद तरंग | 
 आनंदाचे अंग आनंदाचे || १ ||
काय सांगो जाळे काही चिया बाही |
 पुढे चाली नाही आवडीने || २ ||
गर्भाचे आवडी मातेचा डोहळा | 
 तेथील जिव्हाळा तेथे बिंबे || ३ ||


24. काय या संतांचे मानू उपकार

काय या संतांचे मानू उपकार | मज निरंतर जागविती || १ ||
काय द्यावे यांसी व्हावे उतराई | ठेवीत हा पायी जीव थोडा || २ ||
सहज बोलणे हिट उपदेश | करुनि सायास शिकविती || ३ ||
तुका म्हणे वत्स धेर वेचे चित्ती | तैसे मज येथे सांभाळिती || ४ ||


25. आम्ही जातो आपुल्या गावा

आम्ही जातो आपुल्या गावा | 
 राम राम आमचा घ्यावा || १ ||
तुमची आमची हेचि भेटी |
 येथुनिया जन्मतुटी || २ ||
आता असो द्यावी द्या | 
 तुमच्या लागतसे पाया || ३ ||
येत निजधामीं कोणी |
 विठ्ठल विठ्ठल बोला वाणी || ४ ||
रामकृष्ण मुखी बोला | 
 तुका जातो वैकुंठाला || ५ ||


26. अमृताची फळे अमृताची वेली

अमृताची फळे अमृताची वेली |  
   तेचि पुढे चाली बीजाची हि || १ ||
ऐसिया सांग देई नारायणा |      
   बोलावा वचना जयांचिया || २ ||
उत्तम सेवन सीतळ कंठासी |  
   पुष्टी कांती तैसी दिसे वरी || ३ ||
तुका म्हणे तैसे होई जैत संगे |   
 वास लागे अंगे चंदनाचा || ४ ||


27. गरुडाचे वाटिके कासे पितांबर

गरुडाचे वारिके कसे पितांबर | 
 सावळे मनोहर कैदेखेन || १ ||
वरवया बरवंटा घन मेघ सावळा | 
 वैजंती माळा गळा शोभे || २ ||
मुकुट माथा कोटी सूर्याचा झळाळ | 
 कौस्तुभ निर्मल शोभे कंठी || ३ ||
श्रवणी कुंडले नक्षत्रे शोभती | 
 रत्नप्रभा दीप्ती दंतावणी || ४ ||
ओतीव श्रीमुख सुखाचे सकळ | 
 वामांगी वेल्हाळ रखुमादेवी || ५ ||
उद्धव अक्रूर उभे दोन्ही कडे | 
वर्णिले पवाडे सनकादिक || ६ ||
तुका म्हणे नव्हे आणिकांसारखा | 
 तोचि माझा सखा पांडुरंग || ७ ||


28. चला पंढरीसी जाऊ

चला पंढरीसी जाऊ |   रखुमादेवी वरा पाहू    || १ ||
डोळे निवतील कान |   मना तेथे समाधान   || २ ||
संता महंता होतील भेटी |  आनंदे नाचों वाळवंटी || ३ ||
ते तीर्थांचे माहेर |   सर्व सुखाचें भंडार || ४ ||
जजसनं नाही रे आणिक |   तुका म्हणे माझी भाक || ५ ||


29. जैसी गंगा वाहे

जैसी गंगा वाहे तैसे त्याचे मन | 
 भगवंत जण त्याचे जवळी || १ ||
त्याचे जवळी देव भक्तिभावे उभा | 
 स्वानंदाचा गाभा तया दिसे || २ ||
तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण | 
 अनुभवी खूण जाणती हे || ३ ||
जाणती हे खूण स्वात्म अनुभावी |
 तुका म्हणे पदवी ज्याची त्याला || ४ ||


30. कैसे करू ध्यान

कैसे करू ध्यान कैसा पाहो तुज |  
  वर्म डावी मज याचकासी || १ ||
कैसी भक्ती करू सांग तुझी सेवा |
 कोण्या भवावे देवा आतुडसी || २ ||
कैसी कीर्ती वानू कैसा लक्षा आणू | 
 जणू हा कणव कैसा तुज || ३ ||
कैसा गाऊ गीती कैसा ध्याऊ चित्ती | 
 कैसी स्थिती माती डावी मज || ४ ||
तुका म्हणे जैसे दास केले देवा | 
तैसे हे अनुभवा आणि मज || ५ ||


31. करिता विचार सापडले मर्म

करिता विचार सापडले मर्म | 
   समूळ निश्रम परिहारांचे || १ ||
मज घेऊनिया आपणांसी द्यावे | 
 सती जीवे जीवे नारायणा || २ ||
उरी नाही मग पडदा का आला |
 स्वमुखें ची भला करिता वाद || ३ ||
तुका म्हणे माझे खरे देणे घेणे | 
 तुम्ही साक्षी जाणे अंतरीचे || ४ ||



32. काय तुझे उपकार पांडुरंगा

काय तुझे उपकार पांडुरंगा |   
संगीमीया जगामाजी आता || १ ||
जातं हे माझे करोनि संचित |
 दिले अवचित आणुनिया || २ ||
घडलीय दोषांचे न घाली भरी | 
 आली यास थोरी कृपा देवा || ३ ||
नव्हते ठाउके आइकिलें नाही |
 न मागता पाही दान दिले || ४ ||
तुका म्हणे याच्या उपकारासाठी |
 नाही माझ्या गाठी काही एक || ५ ||





हे नक्की वाचा👇👇👇


तर आज आपण तुकाराम महाराजांचे अभंग बघितले. तुम्हाला हि पोस्ट कशी वाटली ते मला कंमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अन्य भक्ती संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट द्यायला विसरू नका .

पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.