Header Ads

संत जनाबाईचे अभंग | वाचा जनाबाईंच्या अभंगांचा संग्रह


स्वागत आहे तुमचं 
True Marathi Lyrics वर !!!!!!!!!!!! या पोस्ट मध्ये तुम्हाला जनाबाईचे अभंग वाचायला मिळतील. जनाबाईचे जास्तीत जास्त अभंग शेअर करण्याचा प्रयत्न मी इथे केला आहे . चला तर मग वळूया अभंगांकडे -

संत जनाबाईचे अभंग
संत जनाबाईचे अभंग

  🌸🌸   जनाबाईचे अभंग   🌸🌸


ये ग ये ग विठाबाई

येग येग विठाबाई 
माझे पंढरीचे आई || धृ ||

भीमा आणि चंद्रभागा 
तुझ्या चरणीच्या गंगा || १ ||

इतुक्या सहित त्या बा यावे
      माझ्या अंगनी नाचावे || २ ||

माझा रंग तुझे गुणी 
म्हणे नामयाची जनी || ३ ||

☘ ☘ ☘


आम्ही जावे कवण्या ठाया 

आम्ही जावे कवण्या ठाया | 
न बोलासी पंढरीया || १ ||

सरिता गेली सिंधुपाशी |
 जरी तो ठाव न दे तिसी || २ ||

जळ कोपले जळचारासी | 
माता न घे बालकासी || ३ ||

जानी म्हणे आले 
शरण री तवा धरिले से मौन्य || ४ ||

☘ ☘ ☘


संत भार पंढरीत

संत भार पंढरीत | 
कीर्तनाचा गजर होत || १ ||

तेथ असे देव उभा |
 जैसी समचरणांची शोभा ||२ ||

रंग भरे कीर्तनात |
 प्रेमे हरिदास नाचत || ३ ||

सखा वीराला ज्ञानेश्वर | 
 नामयाचा जो जिव्हार || ४ ||

ऐशा संत शरण जावे | 
 जानी म्हणे त्याला ध्यावे || ५ ||

☘ ☘ ☘


जनी बैसली न्हायला

जनी बैसली न्हायला | पाणी नाही विसनाला || १ ||
घागर घेऊनि पाण्या गेली | मागे मागे धाव घाली || २ ||
घागर घेऊनिया हाती | रंजन घागरी भरिल्या || ३ ||
राम चिंता ध्यानी मनी | म्हणे नामयाची जनी || ४ ||

☘ ☘ ☘


झाडलोट करी जनी

झाडलोट करी जनी | केर भारी चक्रपाणी || १ ||
पाटी घेऊनिया शिरी | नेऊनिया ताक दुरी || २ ||
ऐसा भक्तीसी भुलला | नीच कामे करू लागला || ३ ||
जनी म्हणे विठोबाला | काय उतराई होऊ तुला || ४ ||

☘ ☘ ☘


 पंढरीच्या राया

पंढरीच्या राया | माझी विनवणी पाया || १ ||
काय वर्णू हरीच्या गोष्टी | अनंत ब्रम्हांडे याच्या पोटी || २ ||
सेना न्हावी याचे घरी | अखंड राबे विठ्ठल हरी || ३ ||
राम चिंता ध्यानी मनी | म्हणे नामयाची जनी || ४ ||

☘ ☘ ☘


धन्य ते पंढरी

धन्य ते पंढरी धन्य पंढरीनाथ | तेणे हा पतित उद्धारीले || १ ||
धन्य नामदेव धन्य पंढरीनाथ | तयाने अनाथ उद्धारीले || २ ||
धन्य ज्ञानेश्वर धन्य त्याचा भाव | त्याचे पाय देव आहया भेटी || ३ ||
नामयाची जनी पळत पै झाला | भेटावया आला पांडुरंगा || ४ ||

☘ ☘ ☘


धरिला पंढरीचा चोर

धरिला पंढरीचा चोर | गळा बांधुनिया दोर || धृ ||
हृदय बंदीखाना केला | आंत विठ्ठल कोंडीला || १ ||
शब्दे केली जडाजुडी | विठ्ठल पायी घातली बेडी || २ ||
सोहं शब्दाचा मारा केला | विठ्ठल काकुळती आला || ३ ||
जनी म्हणे बा विठ्ठला | जीवे न सोडी मी तुजला || ४ ||

☘ ☘ ☘


आत्मस्वरूप स्थिती अभंग - १

सावळी ते मूर्ती हृदयी बिंबली |
देहो बुद्धी पालटली माझी साची || १ ||

धन्य माझी भक्ती धन्य माझा भाव |
हृदयी पंढरीराव राहतसे || २ ||

अशा तृष्णा कैशा मावळल्या दोन्ही |
चिंता विठ्ठल चरणी जडली ठेली || ३ ||

नामयाचे जनी विश्रांती पै झाली |
हृदयी राहिली विठ्ठल मूर्ती || ४ ||

☘ ☘ ☘


आत्मस्वरूप स्थिती अभंग - २

वामसव्य दोहींकडे | देव कृष्णाचे रुपडे || १ ||
आता झाले पाहू जरी | चहुंकडे दिसे हरी || २ ||
चराचरी जे से दिसे | ते ते वड्याची नासे || ३ ||
माझे नाठावे मी पण | तेथे कैंचे दुजेपण || ४ ||
सर्वांठायी पूर्ण कळा | दासी जानी पाहे डोळा || ५ ||

☘ ☘ ☘


आत्मस्वरूप स्थिती अभंग - ३

दळू कांडू खेळू | सर्व पाप ताप जाळू || १ ||
सर्व जीवांमध्ये वाहू | एक आम्ही होऊनि राहू || २ ||
जनी म्हणे ब्रम्हा होऊ | ऐसे सर्वांघटीं पाहू || ३ ||

☘ ☘ ☘


आत्मस्वरूप स्थिती अभंग - ४

चरण विठोबाचे देखिले | सही रिपु हारपले || १ ||
नाही नाही म्हणती आम्ही | सांगसी त्याला लागू कामी || २ ||
नाही जरी जाऊ देशी | जानी नामयाची दासी || ३ ||

☘ ☘ ☘


करुणा अभंग - १

पाय जोडुनी विटेवरी | कर ठेउनी कटावरी || १ ||
रूप सावळे सुंदर | कानी कुंडले मकराकार || २ ||
गळा माल वैजयंती | पुढे गोपाळ नाचती || ३ ||
गरुड सन्मुख उभा | म्हणे जानी धन्य शोभा || ४ ||

☘ ☘ ☘


करुणा अभंग - २

येगे माझे विठाबाई | कृपादृष्टीने तू पाही || १ ||
तुजविण न सुचे काही | आता मी वो करू काही || २ ||
माझा भाव तुझवरी | आता रक्षी नानापरी || ३ ||
येई सखये धावुनी | म्हणे नाम याची जनी || ४ ||

☘ ☘ ☘


15. करुणा अभंग - ३

हात निढळावरी ठेउनी | वाट पाहे चक्रपाणी || १ ||
धाव धाव पांडुरंगे | सखे जिवलगे अंतरंगे || २ ||
तुज वांचुनी दही दिशा | वाट पहाटे जगदीशा || ३ ||
हासे करू नको जनासी | म्हणे नामयाची दासी || ४ ||

☘ ☘ ☘


करुणा अभंग - ४

सखया घेतले पदरी | आता न टाकावे दुरी || १ ||
योरांची उचिते | हेचि काय सांगो तूते || २ ||
ब्राम्हीयाच्या ताता | सज्जना लक्षुमीच्या कांता || ३ ||
आपुली म्हणुवणी | आन गावी दासी जनी || ४ ||


करुणा अभंग - ५

गंगा सिंधुपाशी | त्याने अव्हेरिलें तिसी || १ ||
तरी ते सांगावे कनवला | ऐसे बोले बा विठ्ठला ||२ ||
जळू काय जळचरा | माता अव्हेरी लेकुरा || ३ ||
जनी म्हणे शरण आले | अव्हेरिता ब्रीद गेले || ४ ||

☘ ☘ ☘


नामसंकीर्तन माहात्म्य अभंग - १

गाता विठोबाची कीर्ती | महापातक जळती || १ ||
सर्व सुखाचा आगर | उभा असे विटेवर || २ ||
आठविता पाय त्याचे | मग तुम्हा भय कैचे || ३ ||
काय वाचे माने भाव | जानी म्हणे गावा देव || ४ ||

☘ ☘ ☘


 नामसंकीर्तन माहात्म्य अभंग - २

जन्म येऊनिया देख | करा देहाचे सार्थक || १ ||
वाचे नाम विठ्ठलाचे | तेणे सार्थक देहाचे || २ ||
ऐसा नामाचा महिमा | शेष वर्णिता झाली सीमा || ३ ||
नाम तारक त्रिभुवनी | म्हणे नामयाची जनी || ४ ||

☘ ☘ ☘


 नामसंकीर्तन माहात्म्य अभंग - ३

नाम फेकत चोखटे | नाम घेता न ये वीट || १ ||
जाड शिळा ज्या सागरी | आत्मा राम नामे तारी || २ ||
पुत्रभावे स्मरण केले | तथा बैकुंठासी नेले || ३ ||
नाम महिमा जानी जाणे | ध्याता विठ्ठलाची होणे || ४ ||

☘ ☘ ☘


नामसंकीर्तन माहात्म्य अभंग - ४

एक नाम अवघे सार | वरकड अवघे ते असार || १ ||
म्हणोनिया पराते करा | आधी विठ्ठल ते स्मरा || २ ||
जानी देवाधी देव | एक विठ्ठल पंढरीराव || ३ ||

☘ ☘ ☘


 नामसंकीर्तन माहात्म्य अभंग - ५

काय हे करावे | धनवंतादी अवघे || १ ||
तुझे नाम नाही जेथे | नको माझी आस तेथे || २ ||
तुजविण बोल न मानी | करी ऐसे म्हणे जनी || ३ ||

☘ ☘ ☘


नाम विठोबाचे घ्यावे

नाम विठोबाचे घ्यावे | मग पाऊल टाकावे || १ ||
नाम तारक हे थोर | नामे तारिले अपार || २ ||
अजामेळ उद्धारीला | चोखामेळा मुक्तीस नेला || ३ ||
नाम दलांनी कांडणी | म्हणे नामयाची जनी || ४ ||

☘ ☘ ☘


24. ज्याचा सखा हरी

ज्याचा सखा हरी | त्यावर विश्व् कृपा करी || १ ||
उणे पडो नेदी त्याचे | वारे सोसी आघाताचे || २ ||
त्या वीण क्षणभरी | कांदा आपण नव्हे दुरी || ३ ||
अंगा आपुले ओढोनि | त्याला राखतो निर्वाणी || ४ ||
ऐसा अंकित भक्तांसी | म्हणे नामयाची दासी || ५ ||

☘ ☘ ☘


25. जनी उकीलते वेणी

जनी उकीलते वेणी | तुळशीचे बनी || १ ||
हाती घेऊनिया लोणी | डोई चोळी चक्रपाणी || २ ||
माझे जनीला नाही कोणी | म्हणुनी देव घाली पाणी ||३ ||
जनी सांगे सर्व लोका | न्हाऊ घाली माझा पिता || ४ ||

☘ ☘ ☘


26. आळविता धाव घाली

आळविता धाव घाली | एसी प्रेमाची भुकेली || १ ||
ते हे यशोदेच्या बाळा | बरवी पाहतसे डोळा || २ ||
विटेवरी उभा नीट | केली पुंडलिके धीट || ३ ||
स्वानंदाचे लेणे ल्याली पाहून दासी जनी घाली || ४ ||

☘ ☘ ☘


27. जनी म्हणे पांडुरंगा

जनी म्हणे पांडुरंगा | माझ्या जीविंच्या जिवलगा |
विनविते सांगा | महिमा साधुसंतांचा || १ ||

कैसी वसविली पंढरी | काय महिमा भीमातीरी |
पुंडलिकाच्या द्वारी | का उभा राहिलासी || २ ||

कैसा आला हा गोविंद | कैसा झाला हा गोविंद |
कैसा झाला वेणू नाद | येऊनि नारद का राहिला || ३ ||

कृपा करा नारायणा | सांगा अंतरीच्या खुणा |
येऊ दे करुणा | दासी जनी विनवीतसे || ४ ||

☘ ☘ ☘


देहाचा पाळत विठोबाचे भेटी

देहाचा पाळत विठोबाचे भेटी | जळ लावणा गाढी पडोन ठेली || १ ||
धान्य माय बाप नामदेव माझा | तेणे पंढरीराजा दाखविले || २ ||
रात्रंदिवस भाव विठ्ठलाचे पायी | चित्त ठायींचे ठायी मावळले || ३ ||
नामयाचे जनी आनंद पै झाला | भेटावया आला पांडुरंगा || ४ ||

☘ ☘ ☘


 पूर्वी काय तप नेने

पूर्वी काय तप नेने पै हो केले |
निधान जोडीला पंढरीचे || १ ||

येऊनिया देव दळू लागे अंगे |
रखुमाईच्या संग दूर केला || २ ||

तैसाचि पै संगे येऊनि बाहेरी |
वेचोनिया भारी शेणी अंगे || ३ ||

ओझे झाले म्हणुनी पाठी पितांबरी |
घेऊनिया घरी आणीतसे || ४ ||

ऐसे जेथे काम करी चक्रपाणी |
तेथे कैची जनी नामयाची ||५ ||

☘ ☘ ☘


एकटी तू गाणे गासी

एकटी तू गाणे गासी | दुजा शब्द उमाटे पाशी || १ ||
कोण गे तुझ्या बरोबरी | गाणे गाती पितांबरी || २ ||
पांडुरंग माझा पिता | रखुमाई झाली माता || ३ ||
ऐशियाच्या घरी आले | जनी म्हणे धान्य झाले || ४ ||

☘ ☘ ☘


जनी डोईने गांजली

जनी डोईने गांजली | विठाबाई धावी ननली || १ ||
देव होते बुचडा सोडी | उवा मारितसे तांतडी || २ ||
केश विंचरून मोकळे केले | जनी म्हणे निर्मल झाले || ३ ||

☘ ☘ ☘








हे नक्की वाचा👇👇👇




तर आज आपण जनाबाईचे अभंग बघितले. तुम्हाला हि पोस्ट कशी वाटली ते मला कंमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अन्य भक्ती संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट द्यायला विसरू नका .

पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!!!







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.