Header Ads

Sai Baba Bhajan Lyrics Marathi | साई बाबांची भजने (मराठी)


नमस्कार , या पोस्ट मध्ये तुम्हाला Sai Baba Bhajan Lyrics Marathi मधून वाचायला मिळतील . इथे आपण साई बाबांची दहा पेक्षा जास्त भजने बघणार आहोत. तुम्ही पण साई बाबांची भजने गाऊ इच्छित असाल तर हि भजने तुमच्या मोबाईल किंवा पीसी मध्ये सेव्ह करून ठेवा . चला तर मग बघूया साई बाबांची भजने -


Sai Baba Bhajan Lyrics | Marathi


 1. गाडी घुंगराची आली 

मला न्यावयला श्री साईनाथांची
गाडी घुंगराची आली गाडी घुंगराची    || धृ ||

श्रद्धा सबुरी या गाडीची चाक
साई म्हणती सबका मालिक एक
आठवण झाली मला शिर्डी माहेराची
गाडी घुंगराची आली गाडी घुंगराची     || १ ||

गाडीत बसून मी शिर्डीस आलो
जीवनात माझ्या धन्य मी झालो
नवसाला पावली समाधी साईंची
गाडी घुंगराची आली गाडी घुंगराची    || २ ||

अशी माझ्या साईंची गाडी सुरेख
बैसताच जाती दुःखे अनेक
उदी लावता मी कपाळी धुनीची
गाडी घुंगराची आली गाडी घुंगराची    || ३ ||

काय सांगू माझ्या माहेराचा थाट
चांदीचे पाट आणि सोन्याचे ताट
शिर्डी पंढरी ही नगरी सोन्याची
गाडी घुंगराची आली गाडी घुंगराची     || ४ ||

घुंगराच्या गाडीचे साई गाई गाणं
जगामध्ये झाले संत महान
दूर दूर किर्ती ह्या साईबाबांची
गाडी घुंगराची आली गाडी घुंगराची     || ५ ||

–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘––⁘–⁘–⁘–⁘–

2. बसून कसा राहीला दगडावरी


बसून कसा राहीला दगडावरी
बसून कसा राहीला
शीरडीचा साई कोणी पाहिला
बसून कसा राहीला दगडावरी

लिंबाखाली प्रगट झाला
साईरूपी भगवान तो आला
भगवा झेंडा साईने तिथे रोविला

चला चला शीरडीला जावू
डोळे भरुनी साईला पाहू
साई चरणी देह माझा सारा वाहिला

मन माझे आनंदी नाचे
साई साई बोल माझे वाचे
भक्ती मार्ग आम्हाला त्यांनी दाविला

–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘––⁘–⁘–⁘–⁘–

3. जो तो बोलू लागला साईबाबा

शिर्डीमध्ये पहा धमाल
साक्षात्काराने केली कमाल
पाण्यावरती दिवे पेटतील
दीनदुबळ्यांना ज्योती मिळतील
जो तो बोलू लागला साईबाबा     || धृ ||

हा तर माझा भोलेनाथ
हाच जगाचा साईनाथ
हाच माझा साईराम
हाच माझा साईश्याम      || १ ||

शिर्डीत आली प्लेगची साथ
बाबांनी केली त्यावरी मात
द्वारकामाईत जाऊ चला
अगणित उडी पाहू चला     || २ ||

गानू म्हणे हो साई बाबा
धाव तू पाव माझे ग आई
चल चल चल शिर्डी जाऊ
साई मुख डोळा पाहू      || ३ ||

–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘––⁘–⁘–⁘–⁘–

4. तुला खांद्यावर घेईन

तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन
साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन     || धृ ||

पायी चालत नेले या श्रद्धा सबुरी वाल्याने
साई तुझ्या दर्शनाची मला लागली तहान
साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन     || १ ||

वाट असे ती वळणाची आले पायाला ते फोड
तुझ्या कृपेच्या छायेत, फोड वाटती रे गोड
साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन     || २ ||

माझी बाप आणि आई तुच विठ्ठल रखुमाई
तुझ्या शिर्डी नगरात पंढरी ती मी पाहीन
साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन     || ३ ||

पायी चालत येईन सुख दु:ख मी सांगीन
साई बाबा माझी सारी ती दु:ख निवारील
साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन     || ४ ||

–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘––⁘–⁘–⁘–⁘–

5. साई बाबा आला

साई बाबा आला , साई बाबा आला
बनूनी भिकारी चमत्कार केला चमत्कार केला ।
साईबाबा आला, साईबाबा आला      || धृ ||

संकटात जेजे मागती निवारा |
दुखी माणसांना त्या देउनी सहारा |
निमिषांत त्यांचा कायाकल्प केला     || १ ||

स्वत: मागोनिया दारोदारी भिक्षा ।
करी अनाथांची साई, जीवापरी रक्षा ।
लागे दुबळ्यांच्या सेवा चाकरीला        || 2  ||

नराचाच अंती होतो नारायण ।
तुझ्या दर्शनाची साई, लागली तहान ।
अनंताचा दास अनंतात गेला          || 3 ||

बनूनी भिकारी चमत्कार केला चमत्कार केला ।
साईबाबा आला, साईबाबा आला   || 4 ||


6. तू येरबा साई बाबा

तू येरबा साईबाबा, तू येरबा साईबाबा
ओव्या गाऊ कौतुके तू येरबा साईबाबा     || धृ ||

विट्ठलाला तुळस गणपतीला दूर्वा
अन शंकराच्या पिंडीवर बेल शोभे हिरवा
तू येरबा साईबाबा.......    || १ ||

आईबापाला तहान लागली बाळ गेला पाण्याला
अन दशरथाने बाण मारला श्रावण बाळाला
तू येरबा साईबाबा.......   || २ ||

चंद्रभागेला पुर आला पाणी लागलं ओढायला
अन रुक्मिणी बोले धाव विट्ठला पुंडलिक मासा बुडाळा
तु येरबा साई बाबा.......   || ३ ||

प्रभुरामाचा भक्त तू अंजनीच्या सुता
अन हनुमंता उघड छाती दाखव राम सीता
तू येरबा साई बाबा.......   || ४ ||

वृंदावनी कृष्णान वाजवली बासरी
अन कृष्णाला पाहुनी बघा राधा झाली बावरी
तू येरबा साई बाबा......   || ५ ||

–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘––⁘–⁘–⁘–⁘–

7. साईनाथ माझ्या स्वप्नात आला

साईनाथ माझ्या स्वप्नात आला
मला म्हणाला तू ये शिर्डीला     || धृ ||

साई तो बाबा तो
मशिद झाली द्वारकामाई
हिंदू मुस्लिम पुजती इसाई
जाती भेद ना आवड त्याला
म्हणाला तू ये शिर्डीला     || १ ||

किती वर्णाव्या साईंच्या लिला
पाण्याने त्यांनी दिवा पेटविला
आनंदाला उधाण आलं दिवाळीला     || २ ||

दासगणू जैसा बाळश्रावण
तुमच्या चरणी झाला लीन
दर्शन घेण्या आतुर झाला     || ३ ||

–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘––⁘–⁘–⁘–⁘–

8. मी उघडताच खिडकी

मी उघडताच खिडकी साई दर्शन मज व्हावे
माझ्या घरा ....... माझ्या घरा .......
माझ्या घरासमोर साईनाथ तुझे मंदिर असावे     || धृ ||

तुझी आरती होताना साई शब्द यावा कानी
मी डोळे मिटताना तुझी मूर्ती यावी
ध्यानी साई भजन म्हणताना , तू भजनाला यावे
मी उघडताच खिडकी साई दर्शन मज व्हावे     || १ ||

तू येत जाताना मज दिसावा बाबा
तुझ्या जवळ तीर्थ सारी आहे काशी बाबा
मी दास तुझा साई तू मालक बनाने
मी उघडताच खिडकी साई दर्शन मज व्हावे    || २ ||

जो तुज जवळी आला तो साई तुझा झाला
जीवनामध्ये त्याच्या ना काही कमी त्याला
तुझ्या पालखीत फकिराला तु शिर्डीला न्यावे
मी उघडताच खिडकी साई दर्शन मज व्हावे    || ३ ||

–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘––⁘–⁘–⁘–⁘–

9. पायी शिर्डीला येतो साईनाथ

पायी शिर्डीला येतो साईनाथ
पायी शिर्डीला येतो साईनाथ
तुम्ही दर्शन दयावे आता
तुम्ही दर्शन दयावे आता
तुम्ही दर्शन दयावे आता

पायी शिर्डीला येतो साईनाथ
पायी शिर्डीला येतो साईनाथ

तुम्ही दर्शन दयावे आता
तुम्ही दर्शन दयावे आता
तुम्ही दर्शन दयावे आता

तुमच्या नादान मी पाहिली
तुमच्या नादान मी पाहिली
पाहिली तुमची शिर्डी

तुमच्या नादान मी पाहिली
पाहिली तुमची शिर्डी

हो पायी शिर्डीला, पायी शिर्डीला,
पायी शिर्डीला येतो साईनाथा
तुम्ही दर्शन दयावे आता
तुम्ही दर्शन दयावे आता
तुम्ही दर्शन दयावे आता

दीपावली तुमची शिर्डी
सुरू झाली भक्तांची वारी
दीपावली तुमची शिर्डी
सुरू झाली भक्तांची वारी
दीपावली तुमची शिर्डी
सुरू झाली भक्तांची वारी

हो पायी शिर्डीला, पायी शिर्डीला,
पायी शिर्डीला येतो साईनाथा
तुम्ही दर्शन दयावे आता
तुम्ही दर्शन दयावे आता
तुम्ही दर्शन दयावे आता

तुका म्हणे भक्ती साधी भोळी
आहे जन्म मरणाची वारी
तुका म्हणे भक्ती साधी भोळी
आहे जन्म मरणाची वारी
तुका म्हणे भक्ती साधी भोळी
आहे जन्म मरणाची वारी
हो
पायी शिर्डीला येतो साईनाथा
तुम्ही दर्शन दयावे आता
तुम्ही दर्शन दयावे आता
तुम्ही दर्शन दयावे आता

||  सद्गुरू साईनाथ महाराज की जय   ||

–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘––⁘–⁘–⁘–⁘–

10. शिर्डी माझे पंढरपूर

शिर्डी माझे पंढरपूर    |
साई बाबा रामावर      || १ ||

शुद्ध भक्ती चंद्रभागा  |
भाव पुंडलिक जागा    || २ ||

या हो या हो अवघे जन   |
करा बाबांशी वंदन   || ३ ||

गानू म्हणे बाबा साई   |
धाव पाव माझे आई   || ४ ||

–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘––⁘–⁘–⁘–⁘–

11. पदयात्रेच्या सारा क्षीण गेला

थुई थुई नाचे मन मोर , शिर्डी दिसतीय समोर
मानकरी उभे स्वागताला पदयात्रेच्या सारा क्षीण गेला
पदयात्रेच्या सारा क्षीण गेला     || धृ ||

साई दर्शनाचा एकच ध्यास
दहा डासांचा सरला प्रवास
उन्हा तान्हा चा मी सोसला त्रास
मंगल दिन हा आजचा खास
झाला झाला आनंद हा झाला
पदयात्रेच्या सारा क्षीण गेला      || १ ||

साई बाबा सामोरी आता जाईन
डोळे भरुनी त्यांना मी पाहीन
व्यथा मनीच्या तिथे मी गाईन
सुखाचा वर मी त्यांना मागीन
झाला झाला आनंद हा झाला
पदयात्रेच्या सारा क्षीण गेला     || २ ||

वर्षभराची आता हरेल चिंता
सांगितले मी ते साईनाथा
निरोप दे म्हणेन मजला आता
श्रवणबाळा सांगे गाईन तुझी गाथा
झाला झाला आनंद हा झाला
पदयात्रेच्या सारा क्षीण गेला     || ३ ||

–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘––⁘–⁘–⁘–⁘–

12. मानावा तू विसरू नको शिर्डी

||  अरे मानव तू या जन्मी ......
येऊनि काय केले ....
अरे शिर्डीच्या या साईबाबांचे
नाम मुखी कधी ना घेतले  ||

मानावा तू विसरू नको , शिर्डीच्या या साईला
गर्वाने तू फुगवु नको , आपल्या या छातीला
तुझ्या परी भले भले , मिळाले या मातीला
सद्गुरुला सद्गुरुला विसरू नको सद्गुरुला    || धृ ||

सख्या बापाला तू रे , होऊ नको रे बेईमान ,
प्रेमा फासा पडल्यावर होशील तू हैराण ,
दुसऱ्यांच्या मुखातून घास तू रे ओढसील ,
खड्डा दुसऱ्यासाठी रे पण त्यात तू रे पडशील ,
बायका पोर मुलं बाळ गणगोत रडतील ,
पापी कृत्य केल्याने नर्कामध्ये बुडशील ,
दोन्ही भुजा वरती , दोन्ही चित्रगुप्त पाहणार ,
अरे मानवाचा जन्म वेड्या पुन्हा नाही येणार

शिर्डी त्या आ ............
शिर्डी ला त्या जाऊन वेड्या , शरण जा तू साईला
भक्तीने जा उद्धारूनी , तू मिटव तुझ्या भ्रातीला ,
तुझ्या परी भले भले , मिळाले या मातीला
सद्गुरुला सद्गुरुला विसरू नको सद्गुरुला     || १ ||


बालपण सारे तुझे खेळण्यात घालविले ,
तरुणपण हे जीवन वासनेत चालविले ,
दारू गांजा बाईने वरती येईना संसार ,
अहंकारी डोक्यानी फिरवू नको घरदार ,
बापाची कमी होती जगण्याला आजवर ,
आई बाप गेल्यावर तू रे काय खाणार ,
शहाणा असुनीया सोंग घेऊ नको वेड्याचे
झोपेमध्ये स्वप्न पाहू नको बंगल्या गाड्यांचे

निर्जीव होता आ ........
निर्जीव होता काय कुणी जाळतील सरणाला
रडतील थोडे दिवस कुणी
येणार नाही साथीला
तुझ्या परी भले भले , मिळाले या मातीला
सद्गुरुला सद्गुरुला विसरू नको सद्गुरुला    || २ ||

संकटात घे नाव , धाव घे तू शिर्डीला ,
आई बापाचे प्रेम साई देईल तुला ,
सोड सर्व हि नाती , वारी कर शिर्डीची
जप करून सईचा प्राप्ती कर देवाची ,
तुझ्या परी आले रे , साईंचे ते झाले रे ,
साई साई करता ते उद्धारूनी गेले रे ,
शिर्डीच्या या साईंची , बघ कशी लीला न्यारी ,
नाही नाही म्हणताना , येशील तू हि दरबारी ,

घेऊन जा पालखी आ .............
घेऊन जा पालखी खांद्यावरी जा तू साईवारीला ,
नको करू वेडेपणा जा तू साई भेटीला ,
तुझ्या परी भले भले , मिळाले या मातीला
सद्गुरुला सद्गुरुला विसरू नको सद्गुरुला    || ३ ||

–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘––⁘–⁘–⁘–⁘–


हे पण वाचा 👇👇👇



तर आज या पोस्ट मध्ये आपण Sai Baba Bhajan Lyrics Marathi मध्ये बघितले . तुम्हाला अजून कोणती भजने किंवा अन्य लिरिक्स पाहिजे असतील ते कंमेंट मध्ये नक्की सांगा . आणि अन्य भक्ती संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट द्याया विसरू नका .


हि पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!!!!!!





1 टिप्पणी:

Blogger द्वारे प्रायोजित.