Mahila Din Kavita In Marathi | जागतिक महिला दिन विशेष कविता
हॅलो फ्रेंड्स , कसे आहात तुम्ही सगळे !!!!!!!! जर तुम्ही महिलांवर आधारित कवितांच्या शोधात असाल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात. या पोस्ट मध्ये तुम्हाला स्त्रियांवर आधारित 8 कविता वाचायला मिळतील. इथे आपण Mahila Din Kavita In Marathi बघणार आहोत. मित्रांनो महिलांचा आदर , सम्मान करण्यासाठी आपण हा दिवस साजरा करतो. पण स्त्रियांना सम्मान हा वर्षभर च दिला गेला पाहिजे. तरच मला वाटत खऱ्या अर्थाने आपण महिला दिनाला अर्थ असेल. चला तर मग वळूया कवितांकडे -
Mahila Din Kavita In Marathi
👸👸👸 〰〰〰〰👧👧👧 〰〰〰〰💃💃💃 〰〰〰〰👵👵👵
१ . जन्म एक भूमिका अनेक
रूप एकच आहे तुझं
भूमिका मात्र अनेक आहेत
सोनेरी पावलांनी येणार,
लक्ष्मीचं तू रूप आहे ......
आई बाबांसाठी फुलांमधील
कोमलसी तू कळी आहे .....
भावाच्या राखीतली रेशमाची
सुंदर तू दोरी आहे ......
अर्धांगिनीच्या रूपात
हळवीसी तू प्रीत आहे .....
सहन करून अतोनात कष्ट
जगण्याची तू एक रीत आहे ......
आईच्या रूपात ममतेची
तू एक मूर्ती आहे .....
लेकरांसाठी तुझ्या तूच
तर त्यांची सृष्टी आहे .....
अबला नाही तू तर
एक रणरागिणी आहे ....
नावानेच धुळकी भरवणारी
तूच तर झासीची राणी आहे .....
शिक्षणाची ज्योत पेटवणारी
तूच सावित्रीबाई आहे .....
शिवबांना घडवणारी
तूच तर जिजाबाई आहेस ....
ऊर्जेचा स्रोत तू ,
आदिशक्तीचे रूप आहेस ....
अन्यायी अत्याचारींसाठी
मा कालीचे तू रूप आहेस ....
रूप एकच आहे तुझं,
भूमिका मात्र अनेक आहेत ....
सोनेरी पावलांनी येणार,
लक्ष्मीचं तू रूप आहे ......
सोनेरी पावलांनी येणार,
लक्ष्मीचं तू रूप आहे ......
- पुरुषोत्तम उमेश सराग
२ . स्त्री शक्ती तू
प्रेमाची अन त्यागाची
सुंदर दिव्य मूर्ती तू ....
कर्तबगारीने इतिहास सजला,
देते सदैव स्फूर्ती तू ...
माया ममता तुझी सावली,
जन्म देणारी आई तू .....
सुख दुखत होशी सोबती,
कधी बहीण कधी सखी तू .....
कधी सोशिक कधी कणखर,
लेक सावित्रीची शोभे तू .....
जिजाऊंची वारस अन,
हिरकणीची धाडस तू ....
तू अचाट शूर्याची गाथा,
पराक्रमाची कहाणी तू .....
प्राणपणाने लढणारी झाशीची
रणरागिणी तू ....
जगी होई सम्मान तुझा
कार्यातून दिसतेस तू ....
घर स्वर्गाहून सुंदर ते,
ज्या घरात हसतेस तू ....
- सविता काळे
३ . मी स्त्री आहे याचा मला अभिमान आहे
फुलांनी मला कोमलपण दिले,
तार्यांनी मला सुंदर तेज दिले ,,,,,
भूमीने दिली मला सृजनशक्ती,
आकाशाने पुरवली माया मोठी
पर्वताने तर मला कणखर केले ,
पवित्र नद्यांनी डोळ्यात तीर्थ भरले ,,,,,,
उगवणारा लाल सूर्य
माझ्या ललाटावर आहे ,
मी स्त्री आहे याचा
मला अभिमान आहे ....
मी आईची मुलगी
अवखळ हरिणीसारखी ,
मी बाबांची लाडकी
त्यांच्या जिवासारखी
मी आजीची नातं
दुधाच्या सायीसारखी ,
मी भावाची बहीण
पाठच्या सावलीसारखी ,
मी परक्याचे धन
म्हणून सांभाळतात मला ,
यांच्या निर्मळ प्रेमाने
दाटून येतो गळा ,
अशी आपुलकीची नाती
माझी श्रीमंती आहे ,
मी स्त्री आहे याचा
मला अभिमान आहे .....
उंबरठ्याच्या माप ओलांडून
नव्या घरी आले ,
आणि माझे नदीपन ,
समुद्राला मिळाले ,
मी पतीची सखी झाले ,
सुख दुःख एक केले
चार हातांनी घरकुल
कसे शोभिवंत केले
मी बाळाची आई
माझा पदर झाला ओला
संसाराचा मळा तर
असा बहरून आला
मी सुवासिनी , मी सुहासिनी ,
घर मंदिर आहे
मी स्त्री आहे याचा
मला अभिमान आहे .....
उन्हे सोसून चांदणे फुलवते ,
सर्वांवर धरते छाया ,
देवांनीही हट्ट धरावा
अशी पुरवते माया
मी विश्व् रथाचे गतिमान
चाक आहे .....
मी स्त्री आहे याचा
मला अभिमान आहे .....
मी स्त्री आहे याचा
मला अभिमान आहे .....
- सुनेत्रा देसाई
४ . स्त्री म्हणजे कोणालाही न कळणारी
स्त्री म्हणजे कोणालाही
न कळणारी .....
कधी अबोल तर
कधी बडबडणारी
स्त्री म्हणजे कोणालाही
न कळणारी ......
कधी बापाची लाडकी राजस लेक ,
माहेरी काहीच काम न करणारी
उंबरठा ओलांडताच सासरचा ,
अचानक जबाबदारीने वागणारी
स्त्री म्हणजे कोणालाही
न कळणारी .....
माहेरी उगाचच लटके रुसून बसणारी
सासरी बोचरे शब्द बाणही पचवणारी
आई बाबांशी बोलताना मात्र
हास्यामागे अश्रूंचा सागर लपवणारी
स्त्री म्हणजे कोणालाही न कळणारी .....
आजारी असली तरी
काम करणारी
संसारात तीव्र चटक्यांकडे
दुर्लक्ष करणारी
नाती सासरची
सारी संभाळणारी
तरीही सासरच्यांचा
परकीच असणारी
स्त्री म्हणजे
कोणालाही न कळणारी ......
तिलाही हवी असते अशी साथ
तिचे दुःख
समजून घेणारी
तनामनांच्या खोल जखमांवर
मायेने हळुवार
फुंकर घालणारी
पण तिची व्यथा
कोणालाही न कळणारी .......
- सविता काळे
५ . तू जिजाऊ तू सावित्री
तू जिजाऊ तू सावित्री ,
अहिल्याची तू लेक आहे
तू कल्पना तू सुनीता ,
आकाशात तुझी झेप आहे
तू उषा तू सायना ,
तू मेरी तूच मल्लेश्वरी आहे
घे अस्मानी उंच भरारी ,
प्रेरणेचे तू महारूप आहे
घर स्वर्ग बनावी तू ,
अन्नपूर्णा उंच आहे
तुटक्या झोपडीस महाल करी ,
हरहुन्नारीचे तू प्रतीक आहे
अब्रू राखण्या ना कृष्ण आहे ,
दंड देण्यास ना शिवबा आहे
उठ उठ घे तलवार हाती ,
सहनशीलता अन शूर्याचे तू रूप आहे
जरी दिसशी नाजूक सुकुमार तू ,
इथे कमजोर कोण आहे
तूच सकाळची दिशादर्शनी ,
अन विश्वाची तू आस आहेस
-राजूभैया मोहोड
६ . घे ग तू भरारी
सरली काळरात्र
झाली पहाट नवी कोरी ,
उठ उठ नारी आता
घे ग तू भरारी ,,,,,,,
गाय दावणीची तू
होती एके काळी !!!!
भोगण आणि सोसणं
फक्त तुझ्या भाळी ....
चार भिंती आत तुझी
सदा रात्र काळी ....
बंदिवान जन्माची
तीनही त्रिकाळी
साऊ माऊलीची एक
दे जागा उभारी
उठ उठ नारी आता
घे ग तू भरारी ,,,,,,,
देही तुझ्या रुजणं
हे निसर्गाचं दान
वसुंधरा रूप तुझं
सरितेच वाहनं
ज्ञान अमृतच गोड
तुझ्या ठायी चांदणं
तूच घरी तूच दारी
तूच तू शिवारी
उठ उठ नारी आता
घे ग तू भरारी ,,,,,,,
रणांगणी झुजणारी
झाशीची तू राणी
तूच दुर्गा माता नि
तूच दुर्गा भवानी
सत्वशील संस्काराचे
पाजिलेस पाणी
तेजाने लखलखती
तूच शुभ्र चांदणी
तू नव्हती अबला ,
कधी तू खरी करारी
उठ उठ नारी आता
घे ग तू भरारी ,,,,,,,
तुझ्या हाती शोभते ग
पाळण्याची दोरी
उद्धाराचे चक्र तुझे
सदा फिरे भूवरी
गरुड पंख आता तुझे
उघड खरोखरी
झेपावि एकदा तू
उंच उंच अंबरी
तुझ्यापरी नाही कोणी
तूच एक भारी !!!!!!!
सरली काळरात्र झाली
पहाट नवी कोरी ,
उठ उठ नारी आता
घे ग तू भरारी ,,,,,,,
- एकनाथ मुळे
७ . स्त्री
कधी मुलगी , कधी बहीण ,
कधी पत्नी कधी आई ,
अशा अनेक भूमिका
मी निभावते .........
पण या भूमिका निभावताना
कधी कधी
मी स्वतःला मात्र गमावते
कधी आत्या , कधी मामा ,
कधी दादा ,असे अनेक
नातेवाईक मी कमावते ......
पण या नात्यांच्या
जाळ्यात कधी कधी
मी स्वतःला मात्र हरवते ......
कधी आई , कधी बाबा ,
पती कधी मुलगा ,
साऱ्यांच्या इच्छेमध्ये
माझे मन रामवते
पण या सर्वच्या इच्छांमद्ये
कधी कधी
मी स्वतःची स्वप्न विसरते
कधी मुलगी कधी
बहीण पत्नी , कधी आई ,
अशा अनेक भूमिका
मी निभावते
पण या भूमिका निभावताना
कधी कधी
मी स्वतःला मात्र गमावते .....
स्वतःला मात्र गमावते .....
८ . त्या विशवशक्तीचे नाव आहे नारी
जिच्या उदरातून जन्म घेते
दुनिया सारी
त्या विशवशक्तीचे नाव आहे
नारी !!!!!
तीच आहे
सृजनाची निर्मिती ....
तिच्यामुळे तेवतात
दिव्यातील वाती ....
चहूकडे प्रकाश देऊन
जगतास ती उद्धरी
त्या विशवशक्तीचे नाव आहे
नारी ,,,,,,,,,,
ज्योतिबांची क्रांतीज्योती
सावित्री ,
त्यागाची प्रतीक ती शिवबाची
जिजाई
भीमरावांनी सावली
ती रमाई ,
रणांगणावर लढते जशी
राणी लक्ष्मी !!!
त्या विशवशक्तीचे नाव आहे
नारी ,,,,,,,,,,
शक्तीपीठ ती नवदुर्गांचे ,
भक्तीची उर्जास्थान ,
तिच्यामुळे आम्हा जगण्याचे
आत्मभान
ती विठूची रुक्मिणी ती
आषाढीची वारी
त्या विशवशक्तीचे नाव आहे
नारी
जिच्या उदरातून जन्म घेते
दुनिया सारी !!!!!!!!
हे पण नक्की वाचा 👇👇👇
तर मित्रांनो आपण आज Mahila Din Kavita In Marathi बघितल्या . तुम्हाला हि पोस्ट कशी वाटली ते मला कंमेंट मध्ये नक्की सांगा आणि अन्य मराठी लिरिक्स संबंधित पोस्ट वाचण्यासाठी ला True Marathi Lyrics पुन्हा भेट नक्की द्या .
हि पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!!!!!
Nice
उत्तर द्याहटवा