Header Ads

Small Poem In Marathi | बेस्ट मराठी छोट्या कविता


नमस्कार मित्रांनो Small Poem In Marathi या पोस्टमध्ये तुम्हाला वाचायला मिळतील. या कविता छोट्या असण्या सोबतच मनोरंजक अशा आहेत . इथे तुम्हाला त्याच्या वेग- वेगळ्या विषयावरील छोट्या छोट्या कविता वाचायला मिळतील .

    Small Poem In Marathi
    Small Poem In Marathi


    1. श्रावण

    सुख वेचिन म्हणण्याआधी
    घन दुःखाचा गहिवरतो

    अन दुःख सावरू जाता
    कवडसा सुखाचा येतो

    या ऊन सावली संगे
    रमण्यात ही मौज म्हणूनी

    मी हसून हल्ली माझ्या
    जगण्याला श्रावण म्हणतो

                                    - गुरु ठाकूर

    – – – –⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘– – – –

    2. येतात उन्हे दाराशी

    येतात उन्हे दाराशी
    हिरमुसून जाती मागे

    खिडकीशी थबकून वारा
    तव गंधावाचून जातो

    नसतेच घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो
    जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो

                                                            - संदीप खरे

    – – – –⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘– – – –


    3. तुझ्या दारी

    पाश सारे तोडूनी
    आलो तुझ्या दारी

    मी मला झिडकारुनी
    आलो तुझ्या दारी

    अंबराचे दार तू
    तेव्हा खुले केले

    पंख जेव्हा कापूनी
    आलो तुझ्या दारी

    – – – –⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘– – – –

    4. असेन मी नसेन मी

    कुणास काय ठाऊक
    कसे कुठे उद्या असू ???
    निळ्या नभात रेखीली

    नको भावना पुसू
    तुझ्या मनीचं राहिले

    तुला कळेल गीत हे
    असेन मी नसेन मी

    फुलाफुलात येथल्या
    उद्या हसेल गीत हे

                          - शांता शेळके

    – – – –⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘– – – –

    5. आला केशराचा वारा....

    प्रभातीच्या केशराची
    कुणी उधळली रास

    आणि वाऱ्यावर रंगला
    असा केशरी उल्हास

    रंगा गंधाने माखून
     झाला सुखद शीतळ 

    आणि ठुमकत चालला
       शीळ घालीत मंजुळ !!!!!

                                  - इंदिरा संत

    – – – –⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘– – – –

    6. ||  ज्ञानेश्वरी जयंती  ||

    वाचावी ज्ञानेश्वरी
    डोळा पहावी पंढरी

    ज्ञान होय अज्ञानाशी
    ऐसावर या टिकसी

    ज्ञान होय मूढ
    अति मूर्ख त्या दगडा

    वाचील जो कोणी
    जनी त्यासी लोटांगणी

                                    - सुबोध गोखले

    – – – –⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘– – – –

    7. शब्दा वाचून कळले सारे

    शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले
    प्रथम तुला पाहियले आणिक

    घडू नये ते घडले
    अर्थ नवा गीतास मिळाला

    त्या दिवशी प्रथमच माझे
    सूर सांग अवघडले

    आठवते पुनवेच्या रात्री
    लक्ष दीप विरघळे गात्री

    मिठीत तुझ्या या विश्वाचे
    रहस्य मज उलगडले

                                            - मंगेश पाडगावकर , पु .ल . देशपांडे

    – – – –⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘– – – –

    8. एकटाच मी

    एकटाच मी अंधारासह
    करीत गोष्टी सुखदुःखाच्या

    गतस्मृतींच्या धगधगणाऱ्या
    शेकोटीवर गारठलेले
    माझे मन शेकत आहे

                    - सुरेश भट
        
    – – – –⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘– – – –

    9.डोळे

    डोळे भलतेच बोलके
    शब्दांआधी बोलू येती

    तिचे मोरनीचे मन
    अंग आषाढभरती

    काही बोलू नये तिशी
    नुसते डोळ्यांशी बुडावे

    आणि बेसावधपणी
    उभे आभाळ झेलावे

                            - ना धो मनोहर

    – – – –⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘– – – –

    10. असावं एक तरी असं

    असावं ..एक तरी असं
    मुक्कामाचं ठिकाण ...

    जिथे थोडा विसावा 
    घेता येईल ...

    भावनांना वाचा
    फुटेल अन

    जसेच्या तसे समोरच्याला
    उमजेल

                        - व .पु . काळे

    – – – –⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘– – – –

    11. तू

    स्वप्नात स्वप्न ....भासात भास

    सुवर्ण मृग .....अलगद फास
       नाटकात नाटक.... तळ्यात चंद्र

    वारा अपताल ....सातक मंद
        पायी पैजन .....भोवताल कुंपण

    तुझ्यात मी ....माझ्या तू
    ....अमर्याद एकटेपण ...!!!

                                   - स्पृहा जोशी

    – – – –⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘– – – –

    12. घाव

    घावांवर उसनी फुंकर कशाला??
    त्याचं कौतुक कुणाला आहे??

    निमुट वेदना सोसण्या इतकं
    माझं काळीज खंबीर आहे

    खंजीर धारदार कबूल
    परंतु तो तर केवळ निमित्त असतो

    खंजीर पेलणारा हात मात्र
    न बुजणारी जखम करतो
     
                               - सुधीर मोघे

    – – – –⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘– – – –

    13. मारवा

    उषेत तेव्हा ताम्र नभातून
    सुवर्ण किरणावली

    सांध्य घनातून झिरपत आता
    विश्रमभर सावली

    उषेत होते जागवणारे
    भूपालीचे स्वर

    मृदुल मारवा आज बांधतो
    मला विसावाघर

    – – – –⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘– – – –

    14. शहाणपण


    इथे वाटतं प्रत्येकाला
    आपणच फक्त शहाणे

    झाल्या जरी हातून चुका
    तरी करतात बहाने

    वाईट नसतं कोणालाही मनापासून चाहने
    मात्र वाईट असतं कोणालाही पाण्यामध्ये पाहणे

    हा जरुरी असतं प्रत्येकाने
    वाकूब ओळखून राहने

    नशिबी येत नाही तर
    प्रवाह पतित वहाने

    – – – –⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘– – – –




    हे पण वाचा 👇👇👇




    तर मित्रांनो तुम्हाला Small Poem In Marathi या कविता कशा वाटल्या ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा अणि अजुन कवितांसाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की दया .

    धन्यवाद !!!!!!!


    २ टिप्पण्या:

    Blogger द्वारे प्रायोजित.