Header Ads

मजेदार हास्य कविता ( मराठी ) | Funny Marathi Kavita


हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही ?? या पोस्ट मध्ये आपण मजेदार हास्य कविता बघणार आहोत. आजच्या स्ट्रेसफुल वातावरणामध्ये अशा हलकं फुलकं कॉमेडी वाचून मनाला थोडं रिलॅक्स फील होत. त्यासाठीच तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे काही मजेदार कविता. चला तर मग बघूया कोणत्या आहेत त्या ------

    मजेदार हास्य कविता ( मराठी )
    मजेदार हास्य कविता ( मराठी )


    1. गोरी बायको कशासाठी ?

    गोरी बायको कशासाठी ? 💃💃
    लोकांनी पाहण्यासाठी, आपल्यावर जळण्यासाठी
    त्यांना जळताना पाहून आपण खुश होण्यासाठी 😁😁

    गोरी बायको कशासाठी ?💃💃
    समारंभी मिरवण्यासाठी, गर्दीत सांभाळण्यासाठी
    सांभाळताना तिला तसे, गर्दीत हिरो ठरण्यासाठी 😎😎

    गोरी बायको कशासाठी ?💃💃
    गोरी पोर होण्यासाठी, कष्ट त्यांच्या लग्नाचे
    आपोआप टाळण्यासाठी 😀😀

    गोरी बायको कशासाठी ?💃💃
    कुना विसरून जाण्यासाठी, तुझ्याहून सुंदर गोरी
    असे काही जिरवण्यासाठी 😏😏

    —⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—

    2. आमच्यासाठी हल्ली ...

    रोज आरश्यासमोर आपला 
    अमूल्य वेळ खर्च करावा 😐😐
    चोपडून पावडर तोंडाला नुसतीच 
    चेहरा आपला साजेशा करावा

    डिओ मारून अंगावर भसाभस 😀😀
    हिरोगिरी करत घराबाहेर पडावं
    दिसत सुंदर रूपवान मुलगी 👧👧
    तिला नजरेनं नुसतंच छेडावं

    कधी तिकडून आला पॉजिटीव्ह रिप्लाय✅
    आपण स्वप्नांच्या दुनियेत उडावं✨✨

    दोन शब्द प्रेमाचे बोलण्यासाठी तिच्यासोबत💞
    रोज तिच्या नजरेआड च आपण पडावं👦👧

    गाठून रस्त्यात तिला एकटी 💃
    आपली मनातलं बोलून द्यावं
    मी ऑलरेडी एंगेज आहे एकूण👫

    साल मानाचं खच्चीकरण होऊन जावं😩😫
    जिला पाहावं विचारून तिला , ती कुठे ना

    कुठे तरी " पटलेली " असते
    मी " एंगेज आहे " शब्द एकूण👫
    प्रेमाची पतंग कटलेली असते

    म्हणून बडबडतो स्वतःशी एक 😏
    कि प्रेमाच्या खेळात कधीच का मुरलो नाही 😐😐

    कारण आमच्यासाठी हल्ली 
    आता मुलीच उरल्या नाहीत👧
    आमच्यासाठी हल्ली 
    आता मुलीच उरल्या नाहीत👧

    —⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—

    3. मेकअप करून


    मेकअप करून गाडीमधून 
    एक श्रीमती चालली होती  💃

    हात एकीकडे काढून ती 👋👋
    दुसरीकडे गाडी वळवत होती 

    विलक्षण ते दृश्य पाहून
    एक शिपाई समोर आला 👮

    उलट हात दाखविला म्हणून
    म्हणाला आता भरतो खटला📋

    श्रीमती ती म्हणाली त्याला
    हात कुठे दाखवीत आहे ?❔❔😐

    नखांना लावलेला ओला रंग💅💅
    जाता जाता वाळवीत आहे

    ऐकून वाक्य पाहून नखरा💃😃
    शिपाई ती हतबद्ध झाला

    तोंडामध्ये बोट घालून
    गेलेली गाडी पाहत बसला🚗🚗

    —⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—


    4. प्रिये .........

    तू सरकारी नोकरीत मिळणारी फुलपगारी रजा !!! 💸💸
    मी खाजगी कंपनीचा working sunday प्रिये .. !!! 💼💻

    तू पौर्णिमेचा निखळ चंद्रप्रकाश !!! 🌕🌕
    मी अमावास्येचा काळोख प्रिये ..... !!! 🌚🌚

    तू पहिल्या पावसाची हवीहवीशी शीत लहर !!! 😇😇
    मी सरावानं नकोस घामाजलेला उन्हाळा प्रिये ....!!! 😧😩

    तू झपाट्याने वाढणारी महागाई !!!!💹💹
    मी देशाची विस्कटलेली अर्थव्यस्था .....प्रिये !!!!! 💱💱📉

    अन तू नेत्यांच्या भाषणात गोंगावणारा देशाचा विकास 📄📃
    मी पंधरा लाखांच्या प्रतीक्षेत लाचार मतदार प्रिये ..... !!!! 👦👦

    —⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—

    5. जित्याची खोड


    कोकिळेच्या मागे गाढव एकदा लागले 🐦🐦
    शिकावं ना ग गं हट्ट करू लागले 🐹🐹

    सगळे लागले हसायला पोट धरून 😅😂😂
    जाऊ लागले गाढव तोंड बारीक करून

    कोकिळेला आली दया ती म्हणाली, ठीक आहे ☝☝
    शिकवीन तुला गाणं पण माझी एक अट आहे

    यापुढे कधी हि तू लाथा नाही झाडायच्या 👐👐
    वाटेल ताशा कधीही आरोळ्या नाही मारायच्या

    एकूण हे बोलणं तीच गाढव झाले खुश फार 😀😁
    आनंदाने त्याने मग लाथा झाडल्या दोन चार 🙈🙈

    —⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—

    6. आम्लेट

    कोंबडीच्या अंड्यामधून बाहेर आलं पिल्लू ;
    अगदी होत छोटं आणि उंचीही टिल्लू !!

    कोंबडी म्हणाली, "पिल्लू बाय सांग तुला हवे काय ?
    किडे हवे तर किडे, दाणे हवे तर दाणे
    आणून देईन तुला हवे असेल ते खाणे " !!

    पिल्लू म्हणाले, " आई दुसरे नको काही
    छोट्याशा कपमध्ये चहा भरून दे,
    मला एका अंड्याचे आम्लेट करून दे !!

    —⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—


    7. मदिरा आख्यान

    पाहुनिया बाटली | सुटेना मुख पाणी | 🍷🍺🍺
    परलोक तो प्राणी | पक्का जाणावा |

    जया अखंड ध्यास | पिण्याचीच ती आस | 😃😃
    एस भाला माणूस | विरळा जाणा |

    पितो मनापासून | पाजतो आग्रहाने | 😁😂
    कधी उसनवारीने | दोस्तांत प्रिय | 😍

    लुटून घरादारा | गुत्याला जागवितो | 😑😑
    सकाळ विसरतो | व्यसनी खरा |

    खनगुनिया तो जाता | पिउन मदिरा हाला |
    म्हणे कामातून गेला | एक दारुडा | 💁💁

    —⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—


    8. इडलीवरील कविता

    एक होती इडली.....🍥🍥🍥
    ती होती चिडली

    धावत धावत आली.......
    सांबारात बुडाली 🍲🍲

    सांबर होते गरम गरम ,
    इडली झाली नरम नरम..... 🍮🍮

    चमचा आला खुशीत 🍴🍴
    जाऊन बसला बशीत

    चमच्याने पहिलेइकडे तिकडे 👀
    इडलीचे केले तुकडे तुकडे

    इडली होती फारच मस्त 😁😁
    आम्ही मुलांनी केली फस्त 😋😋😋


    —⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—

    9. सगळा बट्ट्याबोळ केला

    इतके दिवस विचार केला सांगू का मी तिला
    खूप भीती वाटत होती ती आणेल तिच्या भावाला
    भावाने तिच्या घोळ केला ... सगळा बट्ट्याबोळ केला

    रोज शेवटच्या बाकावरून बघत असे मी तिला
    ती मात्र बघत असे माझ्या बाजूच्या बाकावरच्याला
    बजावल्याने घोळ केला .... सगळा बट्ट्याबोळ केला

    एक दिवशी विचार करून तिला गुलाब देऊ ठरविले
    त्याच दिवशी मास्तरांनी बारावीचे गुलकंद शिकविले
    गुलकंदाने घोळ केला .... सगळा बट्ट्याबोळ केला

    कॅलेंडरात व्हॅलेंटाईन डे दोन दिवसात
    मग आय सगळ्यांबरोबर मी हि जोमात
    पण दुसऱ्याच दिवशीची खबरबात
    म्हणे तिची पणजी गेली ढगात
    पणजीने केला घोळ ....... सगळा बट्ट्याबोळ केला
    😐
    कालच गच्चीवरती तिला पाठमोरी बघितली 👀👀
    क्षणात माझ्या मनातले सारे तिला सांगितले 💃💃
    पाठमोरी ती मूर्ती वळताच त त प प झाले 😏
    कारण मला तिच्या आईचे दर्शन झाले
    आईने तिच्या घोळ केला ..... सगळा बट्ट्याबोळ केला

    —⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—

    10. मच्छरवानी

    || जुमानले ना कारावास
    ना ऐकले गुड नाइटास
    पस्तावलो ते लावून ओडोमॉस ||

    || नाही अंत ह्यांच्या जातीस
    ना गणित ह्यांच्या संख्येस
    एकास मारल्यास लगेच
    उगवणार त्याच्या जागी ||

    || घरोघरी वाजतात टाळ्या
    मानेवर गालावर अथवा कपाळा
    आता वाढत आहे संख्या
    तृतीयपंथियांची ||

    || डास दिसता आमच्या दारी
    अबालवृद्ध त्याला मारी
    डाग राहून कायमचा
    चिकटतो भिंतीवरी ||

    || रात्री झोपतो थकून
    कानात त्याची गुणगुण
    ऐसे वाटते का नाही
    झालो बहिरे आम्ही ||

    || असा कसा हा दानव
    नाही येत त्यास कुणाची कणव
    रक्त पिऊन आमचेच
    चावती आम्हाला ||

    || तुझी नाही काही चूक
    नसांत तुझ्या आमचेच रक्त
    आपल्या थाळीत छेद करणे
    हा मानवधर्म ||

    || नका म्हणे तू कर
    कष्ट दिवसभर
    झोप येणारच मग
    लावून मच्छरदाणी ||

    —⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—

    11. दिवस तुझे हे

    दिवस तुझे हे
    मोजून मापून जेवायचे || धृ || 😕😕

    माझी तू लाडकी राणी 😘
    नको ग खास लोणी 🍞
    पाण्यात लिंबाला पिळायचे || १ || 🍋

    साजूक तुपाची धार 🍶
    वाढवी कॅलोरी फार
    पोटात सॅलड भरायचे || २ || 🍅🍃

    प्रभाती फिरायला जाणे 👬👭
    वाटेत धाप लागणे
    दमून जरासे टेकायचे || ३ || 😦😏

    वजन वाढते फार
    सोसेना काट्याला भार 😥😯😯
    कळेना काय ते करायचे || ४ ||

    आपुल्या पाराच्या पाशी 😒😒
    फिर तू गाडे जराशी
    हालत चालत राहायचे || ५ || 💃💃

    - नम्रता बापट

    —⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—


    हे पण वाचा :


     मित्रानो आज आपण मजेदार हास्य कविता बघितल्या. तुम्हाला या कशा ते मला सांगा. आणि अशा अजून कविता मी तुमच्यासाठी घेऊन येऊ. असं तुम्हाला वाटत असेल तर ते पण कंमेंट मध्ये मला नक्की सांगा. मी तुमच्यासाठी नवीन नवीन विनोदी कविता घेऊन येईल. आणि अन्य मराठी लिरिक्स साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.

    धन्यवाद !!!!!!!






    1 टिप्पणी:

    Blogger द्वारे प्रायोजित.