Header Ads

Beautiful Ukhane (Marathi) For Female | उखाणे मराठी



हॅलो फ्रेंड्स, आपल्यकडे पूजा आणि मोठ्या समारंभाच्या वेळी उखाणे हे घ्यायला लागतातच. त्यासाठी ह्या पोस्ट मध्ये मी तुमच्यासाठी Ukhane (Marathi) घेऊन आली आहे. इथे तुम्हाला महिलांना वेगवेगळ्या प्रसंगी घेण्यासाठीचे उखाणे वाचायला मिळतील .
या पोस्ट मध्ये मी टॉप ४० मराठी उखाणे शेअर करत आहे.निवडून काही चांगलेच असे उखाणे तुम्हाला इथे वाचायला मिळतील. तुम्हाला ते कसे वाटले ते मला नक्की सांगा -


Ukhane (Marathi) For Female
Ukhane (Marathi) For Female


Ukhane | Marathi


(1)

गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं
....... रावांचं नाव माझ्या मनात कोरलं


(2)

प्रेमळ शब्दामागे भावना असते कौतुकाची
.......... रावांच्या साथीने सुरवात करते सहजीवनाची


(3)

नाव घ्या.... नाव घ्या.... नाव तरी काय घ्यायचे
.......... रावांना शेवटी आहोच म्हणायचे ......


(4)

रंगा रंगानी रंगलाय श्रीकृष्ण सावळा
........... रावांचं नाव घेते आज आहे
माझ्या लग्नाचा सोहळा


(5)

आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा
........... रावांचे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा


(6)

पैठणीवर शोभते मोरांची जोडी
....... रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी


(7)

तार गेली, पात्र गेले नंतर मोबाईल आले
........... रावांशी लग्न करून मी सौभाग्यवती झाले


(8)

भोळ्या शंकराला बेलाची आवड
........ रावांची पती म्हणून केली मी निवड


(9)

सोन्याच्या ताटात खडीसाखरेचा वाटी
......... रावांचं नाव घेते सात जन्मांसाठी


(10)

निळ्या निळ्या साडीवर चमचमणारे खडे
........ राव झाले माझ्या प्रेमाने वेडे


(11)

गणपतीला दुर्वा, शिवाला बेल
.... रावांच्या साथीत बहरली संसारवेल


(12)

जाई जुईच्या वेलीखाली हरीण घेते विसावा
.... रावांचं नाव घेते तुमचा आशीर्वाद असावा


(13)

संसारात स्त्रीने नेहमी राहावे दक्ष
......... रावांचं नाव घेते इकडे द्या लक्ष


(14)

श्री विष्णूच्या मस्तकावर सदैव असतो शेष
...... रावांचं नाव घेऊन करते गृहप्रवेश


(15)

आकाशात चमकतो तारा, अंगठीत चमकतो हिरा
......... रावांच्या सुखी संसारात सामावलाय माझा आनंद खरा


(16)

सोन्याच्या साखळीत खुलतात काळे मणी
........ राव आहेत माझ्या अआयुष्याचे धनी



(17)

सोडली माहेरची माया मिळाली सासरची छाया
....... रावांचं नाव घेते आता हीच माझी दुनिया


(18)

घातले मंगळसूत्र, लावले कुंकू आणि नेसली मी साडी
लोक म्हणतात शोभून दिसते माझी नि ...... रावांची जोडी


(19)

प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे, प्रेमाचा असावा साठा
....... रावांच्या सुखदुःखात माझा अर्धा वाटा


(20)

कुलदेवतेला स्मरून वंदन करते देवाला
....... रावांचं सौभाग्य अखंड दे मला


(21)

मोगऱ्याचा गजरा, गुलावाबाचा हार
...... रावांचं रूपात भेटला मला उत्तम जोडीदार


(22)

हातात अंगठी, अंगठीत हिरा
....... रावांसारखे पती मिळाले हाच भाग्योदय खरा


(23)

आग्रहाखातर नाव घेते आशीर्वाद द्यावा
........ रावांचा सहवास आयुष्यभर लाभावा


(24)

इंद्रधनुष्याच्या असतात सप्तरंग
........ रावांच्या संसारात असते मी दंग


(25)

साडी घालते फॅशनची पदर घेते साधा
........ राव माझे कृष्ण मी त्यांची राधा


(26)

नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे
........ रावांसारखे पती मला जन्मोजन्मी मिळावे


(27)

आईने केले संसकार, बाबानी केले सक्षम
........ राव सोबत असताना
संसाराचा पाय होईल भक्कम


(28)

गरम गरम भाजीबरोबर नरम नरम पाव
...... राव आहेत बरे पण खातात खूपच भाव


(29)

क्रिकेटच्या मॅच मध्ये धोनीने मारला Six
....... रावांना केलं मी सात जन्मांसाठी Fix


(30)

एक होती चिऊ एक होता काऊ
...... रावांचा नाव घेते आता डोकं नका खाऊ


(31)

इंग्लिश मध्ये चंद्राला म्हणतात मून
......... रावांचा नाव घेते ....... ची सून


(32)

वर्तन असावे साधे वाणी असावी गोड
...... रावांच्या जीवनाला माझी जोड


(33)

गुलाब असतो काटेरी, मोगरा असतो सुगंधी
....... रावांच्या जीवनात, आहे मी आनंदी


(34)

यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब
........ रावांचा एनव्ही घेण्यास मी करत नाही विलंब


(35)

मॉल मध्ये जायला मी तयार होते झटकन
........ रावांचा नाव घेते तुमच्यासाठी पटकन


(36)

पैठणी घालण्यासाठी मी आहे फार हौशी
...... रावांचा नाव घेते ......च्या दिवशी


(37)

मंदिरात वाहते फुलं आणि पान
......... रावांचा नाव घेते सर्वांचा राखून मान


(38)

चांदीची जोडवी लग्नाची खून
..... रावांचा नाव घेते
....... ची सून


(39)

संसाररूपी मार्गावर दोन प्रवासी नवे
........ हेच पती सात जन्मी हवे


(40)

दह्याचे करतात श्रीखंड, दुधाचा खवा
......... रावांचा नाव घेते नीट लक्षात ठेवा





हे पण वाचा :



हि पोस्ट वाचल्याबद्दल खूप धन्यवाद !!!!!!
तर मित्रानो आज आपण 
Ukhane (Marathi) मधून बघितले. इथे आपण महिलांना घेण्यासाठीचे उखाणे बघितले लवकरच आपण पुरुषांसाठी घेण्याचे उखाणे बघू. अन्य मराठी पोस्ट साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.