Satyanarayan Puja Ukhane | सत्यनारायण पूजेच्या वेळी घेण्याचे सुंदर उखाणे
नमस्कार मित्रानो, आज आपण Satyanarayan Puja Ukhane बघणार आहोत. महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतामध्ये विशेष प्रसंगी सत्यनारायणाची पूजा केली जाते. उखाण्याला मराठी मध्ये नाव घेणे असेही म्हणतात. लग्नामध्ये तसेच पूजा समारंभामध्ये नाव घेण्याची पद्धत आहे. सत्यनारायण पूजा हि विशेष तिथी किंवा सणाला घरासोबतच दुकान, सोसायटी तसेच दुकानांमध्ये पण केली जाते. आपल्याकडे लग्न झाल्यावर नवीन वर वधूच्या हातून तर पूजा केली जाते आणि त्यावेळी उखाणा सुद्धा घ्यायला लावतात. म्हणूनच सत्यनारायण पूजेच्या वेळी घेण्याचे ५० उखाणे आपण या पोस्ट बघणार आहोत.
Satyanarayan Puja Ukhane | Marathi
१. सत्यनारायण देवाची राहो सदा कृपादृष्टी
......... रावांच्या येण्याने सुंदर वाटे सृष्टी
***
२. सत्यनारायणाला नमस्कार करते जोडीने
....... रावाचं नाव घेते जोडीने
***
३. चौरंगावर कलश कलशावर सांध्यापात्र,
सांध्यापात्रात आहे तांदळाची रास
त्या राशीवर विराजला बाळकृष्ण खास
बाळकृष्णाला वाहिले तुळशीचे पान
........ रावांमुळे मिळाला मला सौभाग्याचा मान
***
४. सत्यनारायणाची पूजा चौरंगावर मांडली
....... रावांसाठी ...... (माहेरच्या गावचे ) ची वेस
***
५. सत्यनारायणाला मागते सुख, समृद्धी, आरोग्य
......... रावांच्या रूपात मिळाला जीवनसाथी योग्य
***
६. सप्तपदीची सात वचने आणि सात जन्माची साथ
मोठ्याचा सदा राहो आशीर्वादाचा हात
संकटकाळी नेहमी राहीन .....रावांपुढे सुख समृद्धी
मागते सत्यनारायणाकडे
***
७. अंगणात आहे तुळस त्याला पाणी घालू किती
..... रावांच्या हातात सत्यनारायणाची पोथी
***
८. सत्यनारायणापुढे दरवळला धुप अगरबत्तीचा सुवास
.... रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास
***
९. सत्यनारायणापुढे लावली पंचरंगी समई
.... राव माझे पती मी त्यांची अखंड सौभाग्यवती
***
१०. नाकारल्या नाथाला सोन्याचा साज
.... रावांचं नाव घेते सत्यनारायण आहे आज
***
११. सत्यनारायणाच्या पूजेला बनवला प्रसादाचा शिरा
..... राव मला मिळाले जसा शोधून सापडला हिरा
***
१२. गुरु चरित्राचे करावे पारायण
..... रावांचे नाव घेते आज आहे सत्यनारायण
***
१३. हिमालय पर्वतावर तपश्चर्या करत होते साधुमुनी आणि ऋषी
.... रावांचं नाव घेते सत्यनारायचं पूजनाच्या दिवशी
***
१४. पुरातन महाकाव्ये महाभारत रामायण
.... रावांचा नाव घेते घरी आहे सत्यनारायण
***
१५. .... रावणसोबत केली पूजा, पूजेसमोर निरंजन
निरांजनाच्या तूप, तुपात फुलवात
सत्यनारायणाला नमस्कार करून करते, संसाराला सुरवात
***
१६. कुरुक्षेत्रात कृष्ण झाला अर्जुनाचा सारथी
...... रावांसोबत करते सत्यनारायची आरती
***
१७. अंगानी काढली रांगोळी दारी बांधले तोरण
...... रावांचा नाव घेते सत्यनारायण पूजेचं कारण
***
१८. प्राजक्ताच्या पायथ्याशी शुभ्र फुलांच्या राशी
.... रावांचा नाव घेते सत्यनारायण पूजेच्या divash
***
१९. सरस्वतीच्या मंदिरात साहित्याच्या राशी
..... रावांचा नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी
***
२०. सत्यनारायणाची पूजा करते खाली वाकून
..... रावांचा नाव घेते सर्वांचा मन राखून
***
२१. विशाल सागर भेटण्याकरिता खळखळत जाते सरिता
...... रावांचा नाव घेते सत्यनारायण पूजेकरिता
***
२२. सत्यनारायणापुढे लावली समईची जोडी
...... रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी
***
२३. सत्यनारायण पूजेच्या दिवशी केला मी मेकअप,
मेकअप करण्याचा आहे माळ छंद,
...... रावांचा नाव घेताना होतो मला आनंद
***
२४. सौभाग्याचं लेन कंकण चुडे
... रावांचा नाव घेते सत्यनारायणापुढे
***
२५. सत्यनारायणापुढे ठेवले केशरी पेढे
.... रावांचा नाव घ्यायला कशाला आढेवेढे
***
२६. प्रेमाचा रंग चढला हाताच्या मेंदीला
.... रावांचा नाव घेते सत्यनारायण पूजेला
***
२७. कृष्णाला अर्पण केले साखरेचे खडे
......... रावांचा नाव घेते सत्यनारायणापुढे
***
२८. सत्यनारायची पूजा लावली तुपाची समई
... राव मला मिळाले हीच माझी पुण्याई
***
२९. दत्त दिगंबराला औदुंबराची सावली
... रावांचा नाव घेते रावांचा नाव घेते
सत्यनारायण पूजेच्या दिवशी
***
३०. सासूबाई आहेत प्रेमळ, जाऊबाई आहेत हौशी
... रावांचा नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी
***
३१. सत्यनारायणाच्या पूजेला बसलो दोघे जोडीनं
... रावंच नाव घेते सदा आवडीने
***
३२. पूजेला जमले सारे घर सोबती
.... रावांसोबत करते सत्यनारायची आरती
***
३३. साईबाबांच्या चरणी कीर्तन चालते मजेत
... रावांचं नाव घेते सत्यनारायणाच्या पूजेत
***
३४. काचेच्या अलमारीत गणपतीची मूर्ती
...... बसली पूजेला मी करतो आरती
***
३५. गोंड्याचा हार, कंदीचे पेढे,
.....रावंच नाव घेते सत्यनारायणापुढे
***
३६. माय बाप सेवा ,पवित्र हे कर्म
.... रावांचं नाव घेते हिंदू हाच खरा धर्म
***
३७. पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने,
.... रावांचे नाव घेतल्यावर चेहरा माझा खुले
***
३८. झाले सत्यनारायण पूजन, कृपा असो लक्ष्मी नारायणाची
.... राव सुखी राहो हीच आस मनाची
***
३९. देवाची आरती करताना अंगात येते ऊर्जा
... रावांसोबत करते मी असत्यनारायणाची पूजा
***
४०. पूजेसाठी काढली रांगोळी आणि दरवाज्याला लावले तोरण
..... रावांचं नाव घेते सत्यनारायण पूजेचं कारण
***
४१. पूजेला बसणार म्हणून घातला सदरा,
.... रावांनी आणला मला गजरा
***
४२. मंथरेमुळे घडले रामायण
.... रावांचं नाव घेते आज घरी आहे सत्यनारायण
***
४३. घरात भरल्या अठरा धान्यांच्या राशी,
.... रावांचं नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी
***
४४. मोत्याची मला सोन्याचा साज,
...... रावांचं नाव घेते सत्यनारायण आहे आज
***
४५. मातीच्या चुली असतात घरोघर,
...... सत्यनारायणाला बसले ......... रावांबरोबर
***
४६. शुभ समारंभात उखाणा घेण्याची प्रथा,
....... रावांसोबत एकटे सत्यनारायणाची कथा
***
४७. हिमालय पर्वतावर बर्फाचे खडे,
.......... रावांचं नाव घेते सत्यनारायण पूजेच्या पुढे
***
४८. महाराष्ट्राची परंपरा आहे मंगळागौरीचे खेळ,
......... रावांचं नाव घेते झाली सत्यनारायच्या पूजेची वेळ
***
४९. मावळा सूर्य चंद्र उगवला आकाशी,
.... रावांचे नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी
***
५०. मंगळसूत्रातील दोन वाट्या संसार आणि महेर ,
.... रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर
***
हे पण वाचा :
तर मित्रानो, आज आपण Satyanarayan Puja Ukhane बघितले. मराठी लिरिलस संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.
धन्यवाद !!!!!!!!!!!!!
Post a Comment