Superhit Kalubai Song Lyrics | काळुबाईची गाणी
नमस्कार मित्रानो, आज आपण काळुबाईची गाणी बघणार आहोत. भक्तांच्या हाकेला धावून येणाऱ्या काळूबाईचे काही सुपरहिट गाण्यांचे बोल आपण या पोस्ट मध्ये बघणार आहोत. चला तर मग बघूया काळूबाईची गाणी -
१. काळूबाई का झाकून बसलीस डोळं
काय झाला गुन्हा काळू मला सांग ना
बघ आली कशी आज अशी वेळ
हाक मारतोय काळूबाई तुला
का ग झाकुनिया बसलीस डोळं
चुकल असल आई माफ कर मला
दूर करू नको माझी आन तुला ग (2times )
नको होऊ नाराज मन बोलत माझं
रडून सांगतय तुला तुझं बाळ
हाक मारतोय काळूबाई तुला
का ग झांकुनिया बसलीस डोळं
हाक मारतोय काळूबाई तुला
का ग झांकुनिया बसलीस डोळं (2times )
तुझ्याविना नाही मला आधार कुणाचा
थोडा विचार कर आई भोळ्या या जीवाचा
आई ग तुझ्याविना नाही मला आधार कुणाचा
थोडा विचार कर आई भोळ्या या जीवाचा
एवढी माया तुला ग, पडतो तुझ्या पाय ग
नको लांबून पाहू माझा खेळ
हाक मारतोय काळूबाई तुला
का ग झांकुनिया बसलीस डोळं
माय ग ........
हाक मारतोय काळूबाई तुला
का ग झाकुनिया बसलीस डोळं
नको काही मला फक्त राहू दे तुझी साथ
सांगतो ग आई तुला जोडुनिया हात
काळूबाई
नको काही मला फक्त राहू दे तुझी साथ
सांगतो ग आई तुला जोडुनिया हात
आता सोडूनि राग आई थोडं तर बघ
कार्तिक आकाशाची हि तळमळ
हाक मारतोय काळूबाई तुला
का ग झांकुनिया बसलीस डोळं
काय झाला गुन्हा कळू मला सांग ना
काय झाला गुन्हा कळू मला सांग ना
बघ आली कशी आज अशी वेळ
हाक मारतोय काळूबाई तुला
का ग झांकुनिया बसलीस डोळं
२. माझं सर काही तूच काळूबाई
तुझ्यासाठी काळूबाई करू तरी काय
अग तुझ्यासाठी काळूबाई करू तरी काय
माझं जीवनही तूच माझं मरणही तूच
माझं जीवनही तूच माझं मरणही तूच
माझं सार काही तूच तूच काळूबाई
माझं म्हणून जोडलं होत मी नातं
स्वार्थापोटी दिली होती ती साथ
तुला सांगतो काळूबाई जोडुनी हात
या जग दुनियेत केला माझा घात
हो ... माझं म्हणून जोडलं होत मी नातं
स्वार्थापोटी दिली होती साथ
तुला सांगतो काळूबाई जोडुनी हात
या जग दुनियेत केला माझा घात
तुझ्याविना आशा आता कुणाचीच नाही
तुझ्याविना आशा आता कुणाचीच नाही (2times)
माझं जीवनही तूच माझं मरणही तूच
माझं सार काही तूच तूच काळूबाई (2times)
आपलं म्हणून साऱ्यांचा केला विचार
जाण नाही ठेवली जे केले उपकार
दूर केला तू ग जीवनातला अंधार
हो ... आपलं म्हणून साऱ्यांचा केला विचार
जाण नाही ठेवली जे केले उपकार
दूर केला तू ग जीवनातला अंधार
अग तूच झाली आई या वासराची गाय
तूच झाली आई या वासराची गाय
माझं जीवनही तूच माझं मरणही तूच
माझं सार काही तूच तूच काळूबाई (2times)
तुझ्यामुळे खातो दोन सुखाचे घास
पैसे पाण्याची नाही आता ग आस
नको जग दुनियेचा आता हा त्रास
आता काळूबाईच माझा श्वास अन ध्यास
हो ... तुझ्यामुळे खातो दोन सुखाचे घास
पैसे पाण्याची नाही आता ग आस
नको जग दुनियेचा आता हा त्रास
आता काळूबाईच माझा श्वास अन ध्यास
आकाश कार्तिकच्या नाव तुझ्यामुळेच हाय (2times)
तुझ्यासाठी काळूबाई करू तरी काय
माझं जीवनही तूच माझं मरणही तूच
माझं सार काही तूच तूच काळूबाई (4times)
३. पौष पुनवेला काळूबाईचा लखलखला डोंगर
आई काळूबाईच ....... चांगभलं
काळूबाईच्या नावं .......चांगभलं
पौष पुनवेला काळूबाईचा लखलखला डोंगर
पौष पुनवेला काळूबाईचा लखलखला डोंगर
यात्रा भरते दरवर्षीची गजबजला मांढर
पायी पायी चालायचं चांगभलंच बोलायचं
पायी पायी चालायचं चांगभलंच बोलायचं
अल्याड बोर पल्याड वाई, दोन्ही बाजूनी घाट
दोन्ही बाजूनी घाट
अवघड वाट चढुनी भक्त घेती आईची भेट
घेती आईची भेट ........
अल्याड बोर पल्याड वाई, दोन्ही बाजूनी घाट
दोन्ही बाजूनी घाट
अवघड वाट चढुनी भक्त घेती आईची भेट
फुलवी मनाला सांजसकाळी वार तिथलं गार
आई माझी काळूबाई ओढ तुझी लागली
ओढ तुझी लागली ......
महिमा अपरंपार देवी नवसाला पावली
नवसाला पावली ......
आई माझी काळूबाई ओढ तुझी लागली
महिमा अपरंपार देवी नवसाला पावली
भाविक भक्त येति गडाला कित्येक लाखभर
भाविक भक्त येति गडाला कित्येक लाखभर
यात्रा भरते दरवर्षीची गजबजला मांढर
पायी पायी चालायचं चांगभलंच बोलायचं
चांगभलं न गर्जून उठला डोंगर हिरवागार
डोंगर हिरवागार .....
पार्वती आई सिंहावरती स्वार
सिंहावरती स्वार
चांगभलं न गर्जून उठला डोंगर हिरवागार
पार्वती आई सिंहावरती स्वार
मांढरगावी इथंच बाई मारलाय लाख्यासुर
मांढरगावी इथंच बाई मारलाय लाख्यासुर
पायी पायी चालायचं चांगभलंच बोलायचं
पायी पायी चालायचं चांगभलंच बोलायचं
मुलाबाळांना घेऊन संगती राहती दोन चार दिस
राहती दोन चार दिस ........
निवड करुनि पुरणपोळीचा भरती तुजला घास
भरती तुजला घास ........
मुलाबाळांना घेऊन संगती राहती दोन चार दिस
निवड करुनि पुरणपोळीचा भरती तुजला घास
आवडीनं ग भक्तघरची खाती भाजी भाकर
आवडीनं ग भक्तघरची खाती भाजी भाकर
यात्रा भरते दरवर्षीची गजबजला मांढर
पायी पायी चालायचं चांगभलंच बोलायचं
पायी पायी चालायचं चांगभलंच बोलायचं
पौष पुनवेला काळूबाईचा लखलखला डोंगर
पौष पुनवेला काळूबाईचा लखलखला डोंगर
यात्रा भरते दरवर्षीची गजबजला मांढर
पायी पायी चालायचं चांगभलंच बोलायचं
पायी पायी चालायचं चांगभलंच बोलायचं
४. आईचा राजवाडा मांढरचा डोंगर
धावजी गोजी जाळी मधला
मसोबा आईचा शिपाई सरदार
आईचा राजवाडा मांढरचा डोंगर न
आईचा राजवाडा मांढरचा डोंगर
काळूबाईच्या नावं चांगभलं
काळूबाईच्या नावं चांगभलं
हिरवेगार डोंगर झाडी फुलली हिरवळ
उधं धुपानं माईच्या राउळी सुगंध दरवळे
हिरवेगार डोंगर झाडी फुलली हिरवळ
उधं धुपानं माईच्या राउळी सुगंध दरवळे
चेड गोठ भुतावळ मोठं सांभाळत सार कारभार
चेड गोठ भुतावळ मोठं सांभाळत सार कारभार
आईचा राजवाडा मांढरचा डोंगर न
आईचा राजवाडा मांढरचा डोंगर
काळूबाईच्या नावं ........ चांगभलं
काळूबाईच्या नावं ........ चांगभलं
हो पुनवेला काळूबाई थाटात
देखरेख करतीय करवंदी बेटात
हो पौषी पुनवेला काळूबाई थाटात
देखरेख करतीय करवंदी बेटात
शुभ दिसाच असं पुसाच , चांदण्याची चादर पांगर
हो .. शुभ दिसाच असं पुसाच , चांदण्याची चादर पांगर
हो ... आईचा राजवाडा मांढरचा डोंगर न
आईचा राजवाडा मांढरचा डोंगर
काळूबाईच्या नावं ........ चांगभलं
काळूबाईच्या नावं ........ चांगभलं
जीवनभर कष्ट केलंय झोळी भरणा
ज्याला ती मावळी पावली त्याला सरता सरेना
हो .... जीवनभर कष्ट केलंय झोळी भरणा
ज्याला ती मावळी पावली त्याला सरता सरेना
गळ्याला साज गाणं तुझं
चंदन गाईल आयुष्यभर
आईचा राजवाडा मांढरचा डोंगर न
आईचा राजवाडा मांढरचा डोंगर
काळूबाईच्या नावं ........ चांगभलं
काळूबाईच्या नावं ........ चांगभलं
५. गाठायचं काळू बाईचा मांढरगड
गाडी घुंगराची वाट डोंगराची (2times)
घाट वाईचा लय अवघड (2times)
गाडीवाल्या दादा गाडी हाक र मला गाठायचा मांढर गड (2times)
बैलगाडी चालली सा तार वाईला
बैल खिल्लारी जुंपलेत गाडीला
सोन्याची किनार बाई माझ्या साडीला
घर धनी माझा आहे माझ्या जोडीला
देवी काळूबाई तीच माझी आई (2times)
कळू बघतोय माझ्याकडं (2times)
गाडीवाल्या दादा गाडी हाक र मला गाठायचा मांढर गड (2times)
पौष पौर्णिमेची रात गजबजली
जत्रा मोठी माझ्या काळूबाईची भरली (2times)
काळूच्या भेटीची मला ओढ लागली
कान फुक दादा माझी सारी हरली
हिरवं हे शिवार ग हवा गर गर ग (2times)
बघा आरवलंय कोंबड (2times)
गाडीवाल्या दादा गाडी हाक र मला गाठायचा मांढर गड (2times)
भक्ती शक्ती हाय काळूच्या नावात
आज मला जायाचं मांढर गडाला (2times)
भरलाया आनंद दादा माझ्या उरात
गाते गं कळूच मी तालासुरात (2times)
भक्त येती दर्शनाला सातारा वाईच (2times)
त्या डोंगरघाटाकडं (2times)
गाडीवाल्या दादा गाडी हाक र मला गाठायचा मांढर गड (2times)
- Navratri Bhajan Lyrics Marathi
- Kalubaichi Aarti Lyrics
- देवीचे भजन मराठी Lyrics
- Pahili Aarti Manachi Lyrics
तर मित्रानो , या पोस्ट मध्ये आपण काळुबाईची गाणी बघितली. अश्याच भक्तीसंबंधित पोस्ट साठी ला पुन्हा भेट नक्की द्या.
धन्यवाद !!!!!!!!!!!
Post a Comment