Header Ads

तीच मांढरची काळी Lyrics | Tich Mandharchi Kali Lyrics

 


नमस्कार या पोस्टमध्ये आपण तीच मांढरची काळी Lyrics बघणार आहोत.

तीच मांढरची काळी Lyrics | Marathi

चहुबाजूना गुंफिली माईन करवंदी जाळी
अन ओल्या झाडाला जाळी
तीच मांढरची काळी घेते वैऱ्याचा बळी
तीच मांढरची काळी बाईनं ठोकली आरोळी
तीच मांढरची काळी... || धृ ||

पुणे हौसेन बांधील बाईचा डोंगरी मंदिर
हेमाडपंथी कोरलया चीरबंदिर
कशी नवलाने बसविली बाईचं मुरत सावळी
जणू चाफ्याची कळी, तीच मांढरची काळी..
अन अशी कवळी कर्तरी तिचं मांढरची काळी..
हे गुलाबाची पाकळी तीच मांढरची काळी..
हे फुल बागेची माळी तीच मांढरची काळी.. || १ ||

गळ्याच्या भोवताल म्हसोबाचा दबदबा
सारा शिपाई सरदार गोंदी माग र उभा
डोंगरदरी वाघिनी फोडतीया डरकाळी
भरी रक्ताची तळी तीच मांढरची काळी..
नागिन सळसळी तीच मांढरची काळी..
वैऱ्याला तुडवी पायंदळी तीच मांढरची काळी..
ही स्थळी अस्थळी तीच मांढरची काळी.. || २ ||

असं योगी जोगीच हे कडक देवस्थान
सारा दैत्य मारुनी केलं पवित्र मसान
ऐका सत्वाच्या माऊलीची महिमा चंदना गळी
अन जिथे गातो भूपाळी तिचा मांढरची काळी..
जिच्या कुंकू कपाळी तीच मांढरची काळी..
तिला पुरणाची पोळी तीच मांढरची काळी..
हे तिला दुनिया ओवाळी तिच मांढरची काळी..|| ३ ||

चहुबाजूना गुंफिली माईन करवंदी जाळी
अन ओल्या झाडाला जाळी
तीच मांढरची काळी घेते वैऱ्याचा बळी
तीच मांढरची काळी बाईनं ठोकली आरोळी
तीच मांढरची काळी... ||

* * * * *



ही भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇


आज आपण तीच मांढरची काळी Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!! 🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.