Header Ads

आई ग अंबे माते तुझा सोनियाचा झुबा Lyrics | Aai Ga Ambe Mate



नमस्कार या पोस्टमध्ये आपण आई ग अंबे माते तुझा सोनियाचा झुबा Lyrics बघणार आहोत. अंबादेवीचे खूप सुंदर असे हे भक्ती गीत आहे.

आई ग अंबे माते तुझा सोनियाचा झुबा Lyrics

आई ग अंबे माते तुझा सोनियाचा झुबा |
तुझ्या ग दर्शनाला राजा कोल्हापूरचा उभा || धृ ||

कोल्हापूरचा राजा राजा फिरतो जत्रेत |
फिरतो जत्रेत फुले पडती पदरात… आई || १ ||

आई ग अंबे माते केस सोनियाच्या तारा |
केस सोनियाच्या तारा वैरी कापे थरथरा…. आई || २ ||

ढोल वाले दादा ढोल वाजव जोरात |
ढोल वाजव जोरात आई हसते गालात… आई || ३ ||

टाळ वाले दादा टाळ वाजव जोमान |
टाळ वाजव जोमान अंग भिजल घामान…. आई || ४ ||




हि भक्तीगीते पण नक्की वाचा 👇👇👇


आज या पोस्टमध्ये आपण आई ग अंबे माते तुझा सोनियाचा झुबा Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.