बी सी मर्ढेकर कविता संग्रह | B C Mardhekar Kavita Sangrah
नमस्कार स्वागत आहे तुमचं True Marathi Lyrics वर !!! बाळ सिताराम मर्ढेकर उर्फ बि सी मर्ढेकर हे मराठी कवी व लेखक होते. त्यांचा जन्म खानदेशात भोजपुरी येथे 1 डिसेंबर 1990 रोजी झाला. सातारा जिल्ह्यातील मध्ये हे मर्ढेकरांचे मूळ गाव होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण बहादुरपूर येथून तर माध्यमिक शिक्षण फौजपूर सावदे येथून झाले. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी बीएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढे 1938 ला आकाशवाणी केंद्रात नोकरी केली.
1930 च्या काळात त्यांनी लिखाणात सुरुवात केली शिशिरागम ( 1939), काही कविता (1947), आला आषाढ श्रावण यांसारखे कवितासंग्रह तसेच रात्री का दिवस (1942), पाणी (1948) यांसारखे कादंबऱ्या ही लिहिल्या. 1956 मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले. वयाच्या फक्त 46 व्या वर्षी 20 मार्च 1956 ला त्यांचे निधन झाले. आज या पोस्ट मधून आपण बी सी मराठी मर्ढेकरांच्या कवितांचा संग्रह बघणार आहोत.
📔📔बा सी मर्ढेकर कविता संग्रह📔📔************************************
भंगू दे काठिन्य माझे
भंगू दे काठिन्य माझे, आम्ल जाऊ दे मनीचे,
येऊ दे वाणीत माझ्या, सूर तुझ्या आवडीचे ,
सात हेतूतील माझ्या दे गळू, मालिन्य आणि
माझिया अज्ञात टाकी, स्फूर्ती केंद्री त्वदा बियाणे
राहू दे स्वातंत्र्य माझे, फक्त उच्चारातले गा
अक्षय आकार तुझ्या फुफ्फुसांचा सांगता वाहू देगा
लोभ जिभेचा जळू दे, दे थिजू विद्वेष सारा
द्रौपदीचे सत्व माझ्या लाभू दे भाषा शरीरा
खांब दे इर्षेस माझ्या बाळगू तुझ्या तपाचे
नेऊ दे तिथून माते शब्द तुझ्या स्पंदनाचे
धैर्य दे अन नम्रता दे, पाहण्या जे जे पाहणे
वाकू दे बुद्धीस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे
घेऊ दे आघात तिते इंद्रिय द्वारा जगाचे
होऊ दे आतून तिते गा अतिंद्रियाचे
जाऊदे कार्पण्य मी चे दे धरू सर्वास पोटी
भावनेला येऊ देगा शास्त्र काट्याची कसोटी
- बी सी मर्ढेकर
❖ ❖ ❖ ❖
किती तरी दिवसात
कितीतरी दिवसात नाही चांदण्यात गेलो
कितीतरी दिवसात नाही नदीत डूंबलो
खुल्या चांदण्याची ओढ आहे माझी जुनीच
आणि वाहत्या पाण्याची शीळ ओळखीची तीच
केव्हा तरी चांदण्यात पुन्हा जाईन निर्भय
गावाकडच्या नदीत होईन मी जलमय
आज अंतरात भीती खुल्या चांदण्याची थोडी
आणि नदीचा प्रवाह अंगावर काटा काढी
बरा म्हणून हा इथे दिवा पारवा पाण्याचा
बरी तोतऱ्या नळाची शिरीधार मुखी रुचा
- बी सी मर्ढेकर
❖ ❖ ❖ ❖
देवाजीने करुणा केली
देवाजीने करुणा केली, भाते पिकुनी पिवळी झाली
देवाजीने करुणा केली सकाळ नित्याची ही आली
जणू पायाने चित्त्याच्या अन रस्ता झाडी झाडूवाली
घराघरातील चूल पेटली चहा उकळूनी काळा झाला
जरा चढविता दुसरी भांडी भातही शिजवणी होईल पिवळा
देवाजीने करुणा केली रोजचीच पण बस ही आली
जणू पायाने हरिणीच्या अन शिरस्तातील कामे झाली
घरी परतता भाजीवाली समोर दिसली भरली थैली
दो दीडक्यांच्या कडू दोडकी जरी पिकुनी झाली पिवळी
उजाडता ते उजाड झाले झोपी गेले मावळता ते
करील जर का करुणा देव बीचकूनी होतील हिरवी भाते
- बी सी मर्ढेकर
❖ ❖ ❖ ❖
पिपात मेले ओल्या उंदीर
पिपात मेले ओल्या उंदीर,
माना पडल्या मुरगळल्याविन
ओठावरती ओठ मिळाले
माना पडल्या असती विन
पिपात मेले उचकी देऊन
दिवस साडला घाऱ्या डोळी
गात्र लिंग अन धुवून घेऊन
जगायची पण सक्ती आहे
मरायची पण सक्ती आहे
उदासतेला जहरी डोळे
काचेचे पण मधाळ पोळे
ओठावरती जमेल तेही
बेक लाईटी बेक लाईटी
ओठावरती ओठ लागले
ती पाच उंदीर न्हालं न्हाले
- बी सी मर्ढेकर
❖ ❖ ❖ ❖
गणपत वाणी
गणपत वाणी बीडी पिताना
चावायचा नुसतीच काडी
म्हणायचा अन मनाशीच की
या जागेवर बांधीन माडी
मिचकावूनी मग उजवा डोळा
आणि उडवूनी डावी भिवयी
गिऱ्हाईकांची कदर राखणे
जिरे धने धान्य गाळीत
खोबरेल अन तेल केळीचे
विकून बसणे हिशेब कोळीत
स्वप्नांवरती धूर सोडणे,
क्वचित बिडीचा वा पणतीचा
मिन मिन जळत्या आणि लेटने
वाचित गाथा श्री तूकयाचा
गोणपाटावर वीटकर रंगी
सतरंजी अन ऊशास पोते
आडोशाला वास तुपाचा
असे झोपणे माहीत होते
काडे गणपत वाण्याने
ज्या हाडांची ही अशी केली
दुकानातल्या जमिनीत ती
सदैव रुतली आणिक रुतली
काड्या गणपत वाण्याने ज्या
चावूनी चावूनी फेकून दिधल्या
दुकानातल्या जमिनीस त्या
सदैव रुतल्या आणिक रुतल्या
गणपत वाणी बिडी बापडा
पिता पितांना मरून गेला
एक मागता दोन डोळे
देव देत असे जन्मांधाला
- बी सी मर्ढेकर
❖ ❖ ❖ ❖
ह्या दुःखाच्या कढईची
ह्या दुःखाच्या कढईची गा
अशीच देवा घडण असू दे ;
जळून गेल्या लोखंडातही
जळण्याची पण पुन्हा ठसू दे
कणखर शक्ती, ताकद, जळकट.
मोलाची पण मलूल भक्ती
जशी कुंतीच्या लिहिली भाळी
खिळे पाडूनी तिचे जरा ह्या
कढईच्या दे कुट्ट कपाळी
ठोकूनी पक्के काळे बळकट
फुटेल उकळी जमेल फेस
उडून जाईल जीवन वाफ
तरी सांध्यातून कढईच्या ह्या
फक्त बसावा थोडा कैफ
तव नामाचा भेसूर भुरकट.
- बीसी मर्ढेकर
❖ ❖ ❖ ❖
केला थोडा रोजगार
केला थोडा रोजगार | आणि अन्नाचा विचार ;
आता शेवटी लाचार | माझा मिच ||
दृष्टी पडे जेथे जेथे |नाकी झोंबे ही का मिरची ?
मग आभासी बरची | मारीती का ?
आहे विज्ञान महंत | आणि भावनेने संत |
जन्ममृत्यूची ना खंत| टने परी ||
आज पाहिले मरण |गेला भांबावून प्राण |
माझ्या सानाचे कुंपण | स्मशानात ||
लावा दुर्बीण आकाशी | फोडा परमाणु राशी ;
आम्ही आधाशी ? उपाशी ? | आम्हा नेणे ||
जाता मायेची माऊली | केली बापाने सावली ;
आता बहीण बाईली | धीर दिला ||
ही ही जातील गा देवा | मग सर्वांचा सुगावा ||
कैसा कैसा रे लगावा | आंधळ्याला ! ||
- बीसी मर्ढेकर
❖ ❖ ❖ ❖
नाही कुणी का कुणाचा
नाही कोणी का कुणाचा| बाप लेक मामा भाचा
मग अर्थ काय बेंबीचा | विश्व चक्री ? ||
आई गोंजारते मुला | कासया हा बाप लळा,
बाईल प्रीतीच्याही कळा | कशास्तव ? ||
येतो उर का भरून | जाती आतडी तुटून ,
कुणी कुणाचा लागून | नाही जर ? ||
कैसा बांधला देखावा | जन्म मरणातून देवा,
कुशी कुशीत गिलावा |रक्ता मांसी ? ||
का हे बांधकाम सुंदर | फक्त नश्वरतेचेच मखर,
अथवा दर्शनी महाद्वार | मिथ्यत्वाचे ? ||
मग कुठे रे इमारत | जिचे शिल्पकाम अद्भुत,
जीत चिरंतनाचा पुत | वावरे की ? ||
जरी कुठे ऐसे धाम| ज्याच्या पायऱ्या ही अनुपम,
आणि चुना विटा परम | चिरस्थायी||
तरी मग रोकडा सवाल | कोरीसी हाडांचा महाल,
ठेवीसी त्यात हरीचा लाल | नाशवंत ||
वास्तुशास्त्र का बिलोरी | योजीशी येथेच मुरारी,
घडसघ वस्तीला भाडेकरी | बिलोरीचं ? ||
❖ ❖ ❖ ❖
कुणी मारावे कुणी मरावे
कुणी मारावे, कुणी मारावे
कुणी जगावे खाऊनी दगड ;
वितळून कुणी आयुष्यांना
ओतावे अन सोन्याचे घड
कुणी रडावे, रडवावे कुणी,
कुणी हसावे पिऊन वायू ;
कुणी दाबूनी जखम आजची
जरा काढावा उद्याचा पू.
ह्या जगण्यातून, ह्या मरणातून
हसण्यातून अनरडण्यातून ह्या ;
अशाश्वताच्या मुठी वळूनी
आपाप वरती चढतील बाह्या.
अखेर होता टक्कर जरी मग
युगायुगांचे फुटेल भाल ;
अशाश्वताच्या समशेरीवर
शाश्वतताची ही तुटेल ढाल!
❖ ❖ ❖ ❖
या कविताही नक्की वाचा 👇👇👇
- कुसुमाग्रज कविता संग्रह
- ग दि माडगूळकर यांच्या कवितांचा संग्रह
- शांता शेळके यांच्या कविता
- पद्मा गोळे यांच्या कविता
- सुरेश भट कविता (मराठी)
आज या पोस्टमध्ये आपण बी सी मर्ढेकर कविता संग्रह बघितला. अधिक मराठी कविता आणि लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पून्हा भेट द्यायला विसरू नका.
Post a Comment