शांता शेळके यांच्या कविता | Shanta Shelke Marathi Kavita
नमस्कार मित्रानो, आज आपण या पोस्ट मध्ये शांता शेळके यांच्या कविता बघणार आहोत. शांता शेळके या मराठी भाषेतील अत्यंत गाजलेल्या लोकप्रिय कवियत्री आहेत. मराठी मनावर त्यांच्या कविता आणि गाण्यावर राज्य केलं आहे.
यासोबतच त्या प्राध्यापिका, संगीतकार, लेखिका, अनुवादक, बाल साहित्य लेखिका, साहित्यिक, आणि पत्रकार पण होत्या. त्यांच्या कवितांकडे वळण्यापूर्वी आपण शांता शेळके यांच्याविषयी थोडी माहिती जाणून घेऊ.
हे पण वाचा 👇👇👇
तर मित्रानो, आज आपण शांता शेळके यांच्या कविता बघितल्या. तुम्हाला या कविता कशा वाटल्या मला नक्की सांगा आणि तुमचे काही प्रश्न किंवा प्रतिक्रिया असतील तर त्या पण कंमेंट करून विचारा. लवकरच पुन्हा भेटू अश्याच कोणत्यातरी नवीन पोस्टमध्ये !!!!!!!!! तोपर्यंत मजेत राहा !!!!!!!
धन्यवाद !!!!!!!!!!!!!
![]() |
शांता शेळके यांच्या कविता |
शांता शेळके यांचे पूर्ण नाव शांता जनार्दन शेळके(12 ऑक्टोबर 1922). त्यांचा जन्म पुणे जिह्यातील इंदापूर येथे झाला. लहान वयापासूनच त्यांना कवितेची आणि वाचनाची आवड होती. १९९६ मध्ये आळंदी येथे झालेल्या मराठी साहित्य सम्मेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. त्यांना सुरसिंगर पुरस्कार, केंद्र सरकारचा उत्कृष्ट चित्रगीत पुरस्कार, गदिमा गीतलेखन पुरस्कार (1996) यांसारख्या पुरस्कारांनी सम्मानित करण्यात आले होते. चला तर मग वळूया शांता शेळके यांच्या कवितांकडे -
1. इथे
आम्रतरू हा धरी शिरावर प्रेमळ निज साऊली,
मृदुल कोवळी , श्यामल हिरवळ पसरे पायांतळी
आणिक पुढती झरा खळाळत खडकांतून चालला
सध्या भोळ्या गीतांमध्ये या आपुल्या नित रंगला !!
काठी त्याच्या निळी लव्हाळी , डुलती त्यांचे तुरे
तृणां कुरांवर इवलाली हि उडती फुलपाखरे !!
खडा पहारा करिती भवती निळे भुरे डोंगर,
अगाध सुंदर भव्य शोभते माथ्यावर अंबर !!
दुर्मिळ ऐशी देई शांतता सदा मला हे स्थळ ,
ऐकू न येई इथे जगाचा कर्कश कोलाहल
व्याप जगाचा विसरल्या मी येई इथे सत्वर ,
अर्ध्या मिटल्या नयनी बघितले स्वप्ने अति सुंदर !!
शांतविले मी तृप्त जीवाला इथे कितीदा तरी
कितीदा यावे तरी येथली अवीट हि माधुरी !!
आम्रतरू हा धरी शिरावर प्रेमळ निज साऊली,
मृदुल कोवळी , श्यामल हिरवळ पसरे पायांतळी
आणिक पुढती झरा खळाळत खडकांतून चालला
सध्या भोळ्या गीतांमध्ये या आपुल्या नित रंगला !!
- शांता शेळके
⁘⁘⁘⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘⁘⁘⁘
2. काळोख
काळोख असतो समदर्शी समजूतदार
दाटत येतो चहूकडून वेढतो घुसतो आरपार
मिटवून टाकतो सारे भेद रंगरूपाचे वेगळेपण
असतो सर्व समावेशक विश्वंभर विश्वाकार
काळोख खोल शहाणपण मायाळू हातानी वेढून घेते
प्रौढ वयही प्रगल्भ वात्सल्याने हळुवार जोंजवते
सारे शिन विसावतात काळोखाच्याच मांडीवर
काळोखाच्या अंगाईला काजळ काळी लय लागते
काळोख असतो समदर्शी समजूतदार
दाटत येतो चहूकडून वेढतो घुसतो आरपार
काळोखाचा निर्धार अंतिम टोकाला जाणारा
काळोखाचा ताण प्राण प्राण पिळवटणारा
करीत नाही तडजोड फिकट उजेडाशी , संदिग्धाशी
काळोख अत्यंत आत्मलीन , आपले गाणी आपण गाणारा
काळोख असतो समदर्शी समजूतदार
दाटत येतो चहूकडून वेढतो घुसतो आरपार
मिटवून टाकतो सारे भेद रंगरूपाचे वेगळेपण
असतो सर्व समावेशक विश्वंभर विश्वाकार
-शांता शेळके
⁘⁘⁘⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘⁘⁘⁘
3. तुझे पाप आणि पुण्य
तुझे पाप आणि पुण्य तुझे सुख आणि दुःख
एक हजार वर्षांनंतर यातलं मागे काय राहील
आजची थाप आजचे काम, आजचे तळपणारा ऊन
आजचा भाळावरचा घाम तेव्हा कुठे कोण पाहिलं
तेव्हासुद्धा गवंतामधून अशी असंख्य फुले फुलतील
माणसागणिक नाव लेऊन गर्द ताटवे पुन्हा झूलतील
निळ्या भोर नभाखाली लहान मोठ्या लाटा उठतील
लहान मोठे हर्ष विषाद खतावरती पुन्हा फुटतील
सळसळणाऱ्या धमन्यांमधून पुन्हा वाहील लाल रक्त
त्यातल्या थेंबातच क्वचित तुझी स्मृती राहील फक्त
तोवर सक्त हास्यामागे आजचा अश्रू रोखून ठेव
जाण सोशिक त्वचेमागे एक जखम झाकून ठेव !!
- शांता शेळके
⁘⁘⁘⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘⁘⁘⁘
4. पाऊस
पावसाच्या धारा येती झरझरा
झाकळलें नभ, वाहे सोसाट्याचा वारा
रस्त्याने ओहोळ जाती खळखळ
जागजागी खाचांमध्ये तुडुंबले जळ
ढगावर वीज झळके सतेज
नर्तकीच आली गमे लेवुनिया साज
झोंबे अंगा वारे काया थरथरे
घरट्यांत घुसूनिया बसली पाखरें
हर्षलासे फार नाचे वनीं मोर
पानांतून हळूं पाहे डोकावून खार
पावसाच्या धारा डोईवरी मारा
झाडांचिया तळी गुरे शोधिती निवारा
नदीलाही पूर लोटला अपार
फोफावत धांवे जणू नागीणच थोर
झाडांची पालवी चित्ताला मोहवी
पानोपानी खुलतसें रंगदार छबी
थांबला पाऊस उजळे आकाश
सूर्य येई ढगांतून, उधळी प्रकाश
किरण कोंवळे भूमीवरी आले
सोनेरी त्या तेजामध्यें वस्तुजात खुले
सुस्नात जाहली धरणी हांसली,
वरुणाच्या कृपावर्षावाने संतोषली
- शांत शेळके
⁘⁘⁘⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘⁘⁘⁘
5. पाणी
या पाण्याच्या अनंत लीला अनंत त्याची रूपे
केव्हा अवघड कोडे घाली, केव्हा अगदी सोपे
थेम्ब चिमुकला केव्हा झुलतो पानांच्या टोकाशी
केव्हा चिडुनी उलथून टाकी प्रचंड प्रस्तर राशी
संथ वाहता सामावून घे गहाण कधी आभाळ
चित्रदर्पणी केव्हा उमटे शुभ्र खगांची माळ
तीरावरची झाडी केव्हा घट्ट उराशी धरते
ओले तिचे वस्त्र खेचुनी थट्टा भलती करते
कधी इवल्याशा कळशी मधुनी सुखे घराला येती
तान्हलेल्या प्राणांत खोलवर झिरपत झिरपत जाती
ओघळ ओघळ पूर अनावर, झिरप निरझार सरिता
किती शोधली नावे आम्ही अनाम जे त्याकरिता
या पाण्याचे काही न कळते विरक्त कि आसक्त
लंपट केव्हा, अलिप्त केव्हा, केव्हा असते फक्त
सात सागारांमधून वेडे दिशादिशातून फिरते
कुमारिकेच्या नयनी केव्हा आसू होऊन उरते
- शांता शेळके
⁘⁘⁘⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘⁘⁘⁘
6. अटळ
शेवटी अटळ असते
गाठी तुटत जाणे
संबंध सुटत जाणे
शेवटी अटळ असते
रंग विटत जाणे
क्षितिज मिटत जाणे
- शांत शेळके
⁘⁘⁘⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘⁘⁘⁘
7. एकाकी
तुझ्या आणि तुझ्या साठी
शब्द सारे खोटे
खरी फक्त क्वचित कधी
बोलागणारी बोटे
बिलगणारी बोटे तीही
बिलगुणसुद्धा दूर
खोल खोल भुयारात
कण्हणारे सूर
दूर दूरच्या ओसाडीत
भटकणारे पाय
त्वचेमागील एकाकीपण
कधी सरते काय
- शांता शेळके
⁘⁘⁘⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘⁘⁘⁘
8. बाहुल्या
सावल्यांचा बाहुल्यांच्या भोवताली घोळका
ये पुढे एकेक बोले कोण मी ते ओळखा
सावल्यांचे मूळचे आधार ते सुटले तरी
जवळ येत अंगुलीचा स्पर्श होतो बोलका
टाकले मी पुरून सारे खोल चित्ताच्या तळी
वेड भरते का तरी हे ? आज जातो तोल का ?
जाड कला तिमिरपडदा झाकतो भूता जरी
कोण कानी कुजबुज हे ? कुठून येती बोल ? का ?
अंध बोटे चाचपती काय खोटे व खरे ?
रंगचित्रे फुलून मिटती फिरविताना लोलका
सावल्यांचा बाहुल्यांची क्रूर, निर्दयी हि मिठी
वाटले जे उथळ पाणी, तेच इतके खोल का ?
- शांत शेळके
⁘⁘⁘⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘⁘⁘⁘
9. नवीन वर्ष तुझ्या स्वागता
कुठले पुस्तक, कुठला लेखक
लिपी कोणती, कसले भाकीत
हात एक अदृश्य उलटतो,
पानांमागून पाने अविरत ....
गतसालाचे स्मरण जागता,
दाटून येते मनामध्ये भय !!!!
पान हे नवे यात जरी का
असेल काही प्रसन्न आशय ...
अखंड गर्जे समोर सागर
कणाकणाने खचते वाळू
तरी लाट हि नवी उठता
साजे कैमरा तिज कुरवाळू
स्वतः स्वतःला देत दिलासा
पुसते डोळे हसता हसता
उभी इथे मी पसरून बाहू
नवीन वर्ष तुझ्या स्वागता
- शांत शेळके
⁘⁘⁘⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘⁘⁘⁘
10. विजनामधले पडके देऊळ
विजनामधले पडके देऊळ
ओशट ओला तो गाभारा
काळोखात शिवलिंगावर
अभिषेकाची अखंड धारा
- शांत शेळके
⁘⁘⁘⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘⁘⁘⁘
11. सावली
भर दुपार रस्त्याच्या कडेला मी उभी
माझ्या पाठीशी उभे एक झाड
आणि माझ्यासमोर त्याची सावली पसरलेली
झाडाचा बुंधा काळा, फांद्या काळ्या करड्या
हिरवीगार त्याची पाने वर निळा जांभळा मोहोर
चमकदार काळ्या पंखांचा एक कावलाही फांदीवर
झाडात अनेक रंग काळा, करडा, हिरवा, निळा, जांभळा
माझ्या समोरची सावली फक्त काळी
बुंधा काळा, फांद्या काळ्या,पालवी काळी
मोहोर काळा आणि कावळाही काळाच
सारे रंग भेदभाव विसरून काळेपणात एकवटलेले
झाडाला त्याचे झाडपण भेटलेले
झाड स्वतःहून सावलीत जिवंत
- शांत शेळके
⁘⁘⁘⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘⁘⁘⁘
12. फुलांच्या जन्मवेळा
कोणत्या असतात
फुलांच्या जन्मवेळा ??
काळ्या फुलताना
कि पाकळ्या गळताना ??
अथांग निळाई
प्राण एकवटून बघताना
कि निमूटपणे खालच्या
मातीत मिसळताना
- शांत शेळके
⁘⁘⁘⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘⁘⁘⁘
13. कागदी क्षितिजाआडून
कागदी क्षितिजाआडून
मी चंद्र पाहिले, सूर्य पाहिले
चित्रातल्याच समुद्रावर
माझी वादळे उठवत राहिले
वाटले होते आज ना उद्या
ओसंडेल समुद्र जळ
कागदी क्षितिज चंद्र, सूर्य
जागवतील रक्तात कळ
शेवटी कागदी क्षितिजाआडच
थोडे अस्त थोडे उदय
चित्रातच असेल केवळ
समुद्राचा उगम विलय
ठरल्याचा तरी आंनद काय ?
बुडण्याचेही कसले भय ?
⁘⁘⁘⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘⁘⁘⁘
14. चांदणी
सायंकाळी क्षितिजावरती
मंदपणे मी करते लुकलुक
शांत राहुनी आपल्या जागी
भवतालचे बघते कौतुक !!!
अफाट वरती गगन पसरले
विशाल खाली पसरे धरती
मी सृष्टीची सुता लाडकी
मंद चमकते क्षितिजावरती
- शांत शेळके
⁘⁘⁘⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘⁘⁘⁘
15. आजोबा
आजोबांचे वय आता सत्तरीच्या पार आहे
उभे आयुष्य पिकून फळ गळावया आले
जुना कसदार देह, बळकट अंगकाठी
किती पहिले, भोगले सांगे कपाळावर आठी
रिते घर हिंडताना भिंती पुढे पुढे येति
भुते भूतकाळातील फेर धरून नाचती
कधी कातरवेळेला मन उदासीन भुके
अलीकडे रात्र रात्र दिव्यामध्ये जळे वाट
जगणाऱ्या वार्धक्याला गाथा पोथीची सोबत
सुख दुःखाचा हिशेब वजाबाकी एक झाली
काही हातात न आले शून्ये शून्यात मिळाले
तरी आजोबांच्या मनी, काही खळ-मळ
साऱ्यांसाठी ओठावर आशीर्वादच केवळ
संसाराच्या सारणात देह कधीच घातला
आता लागलेली आहे ओढ मातीची मातीला
- शांत शेळके
⁘⁘⁘⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘⁘⁘⁘
16. आठवण
कधी आठवण लपलेली असते
हृदयाच्या बंद कप्प्यात
कधी आठवण लपलेली असते
वसंतमधल्या गुलमोहरात
कधी ती लपलेली असते
सागराच्या अथांग निळाईत,
तर कधी ती लपलेली असते
बहरलेल्या निळाईत
या साऱ्याभोवती फिरत असतो
श्वास आपला मंद धुंद
आणि यातूनच मग दरवळतो
तो आठवणींचा बकुळगंध
- शांत शेळके
⁘⁘⁘⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘⁘⁘⁘
17. शोध
बाहेरचे प्रदेश संकुचित होत आहेत
तसा तसा आतल्या प्रदेशांचा
शोध लागत आहे मला
माझी मीच किती
अनोळखी होते स्वतःला !!!
माहित नव्हते मला माझे बाळ, माझी दुर्बलता
सतत वेढून बसलेली माझी भीरूता,
माझे माझ्याशी असलेले भांडण,
माझ्या निकट सहवासातले
माझे एकाकीपण
काहीच उमगत नव्हते यातले
होते केवळ असह्य घुसमटणे
एका अथांगातले ....
आतल्या आत मी आहे उलगडत
क्षणोक्षणी विस्तार पावत
पोहोचते आहे जाऊन
माझ्याच अंतरंगाचा कानाकोपऱ्यापर्यंत
मी चकित होते आहे, स्तिमित होते आहे
दुखावत आहे आणि सुखावतही.
- शांत शेळके
⁘⁘⁘⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘⁘⁘⁘
18. समंजस
दुःख समंजस माझे
नाही फिरवली व्दाही
कधी आले आणि गेले
मला कळलेही नाही
मला कळलेही नाही
उरे पुसटशी खून
.... फक्त फक्त चांदणे
... फक्त फक्त मंदावले ऊन
- शांत शेळके
⁘⁘⁘⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘⁘⁘⁘
19. मागते मन एक काही
मागते मन एक काही दैव दुसरे घडविते
उमलेना आधीच कैसे फुल पायी तुडविते
खेळ नियती खेळते ती
पाप येते हे पणा
वाहणाऱ्या या जनाना कोण मार्गी अडविते
मागते मन एक काही
मागते मन एक काही दैव दुसरे घडविते
ईश्वरीच्छा हीच किंवा संचिताचा शाप हा
चंद्ररेखा प्रतिपदेची कोण तिमिरी बुडविते
मागते मन एक काही दैव दुसरे घडविते
उमलेना आधीच कैसे फुल पायी तुडविते
-शांता शेळके
⁘⁘⁘⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘⁘⁘⁘
20. टप टप टप टप टाकीत टापा
टप टप टप टप टाकीत टापा चाले माझा घोडा
पाठीवरती जीन मखमली पायी रुपेरी तोडा !!
उंच उभारी दोन्ही कान
ऐटीत वाळवी मान कमान
मधेच केव्हा दुडकत दुडकत
चाले माझा घोडा !!
घोडा माझा फार हुशार
पाठीवरती मी होता स्वार
नुसता त्याला पुरे इशारा ,
कशास चाबूक ओढा !!
सात अरण्ये , समुद्र सात
ओलांडली हा एक दमात
आला आला माझा घोडा ,
सोडा रास्ता सोडा !!
-शांता शेळके
⁘⁘⁘⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘⁘⁘⁘
21. तोच चंद्रमा नभात
तोच चंद्रमा नभात तीच चैत्रयामिनी
एकांती मजसमीप तीच तुही कामिनी || धृ ||
निरव ती तशीच धुंद तेच चांदणे
छायांनी रेखियले चित्र ते देखणे
जाईचा कुंज तोच तीच गंध मोहिनी || १ ||
सारे जरी ते तसेच धुंदी आज ती कुठे ??
मीही तोच तीच तुही प्रीती आज ती कुठे ??
ती न आर्तता उरात स्वप्न ते न लोचनी || २ ||
त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा
वाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधतो पुन्हा
गीत ये न ते जुळून भंगल्या सुरांतुनी || ३ ||
-शांता शेळके
⁘⁘⁘⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘——⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘—⁘⁘⁘⁘
हे पण वाचा 👇👇👇
- ग दि माडगूळकर यांच्या कवितांचा संग्रह
- बायकोसाठी मराठी कविता
- पावसावर आधारित मराठी कविता संग्रह
- बेस्ट मराठी छोट्या कविता
- कुसुमाग्रज कविता संग्रह
तर मित्रानो, आज आपण शांता शेळके यांच्या कविता बघितल्या. तुम्हाला या कविता कशा वाटल्या मला नक्की सांगा आणि तुमचे काही प्रश्न किंवा प्रतिक्रिया असतील तर त्या पण कंमेंट करून विचारा. लवकरच पुन्हा भेटू अश्याच कोणत्यातरी नवीन पोस्टमध्ये !!!!!!!!! तोपर्यंत मजेत राहा !!!!!!!
धन्यवाद !!!!!!!!!!!!!
Post a Comment