Marathi Pavsachi Kavita | पावसावर आधारित मराठी कविता संग्रह
नमस्कार ,स्वागत आहे तुमच वर True Marathi Lyrics !!!!!!! या पोस्ट मध्ये तुम्हाला पावसा वर आधारित कविता वाचायला मिळतील . पाऊस म्हटला की बाहेर सगळीकडे हिरवंगार असं वातावरण होत . मन अगदी प्रसन्न होऊन जात . अशा अल्लाहदायक वातावरणामध्ये गरम गरम वाफाळता चहा , कांदा भाजी आणि सुंदर मराठी कविता हे कॉम्बिनेशन च खूप सुंदर आहे . जर तुम्ही पावसावर आधारित मराठी कविता कवितांच्या शोधात असाल तर तुम्हाला या लेखा मध्ये सुंदर अश्या Marathi Pavsachi Kavita पावसावरच्या कविता वाचायला मिळतील . तर लेख पूर्ण जरूर वाचा .
1. हा पहिला पाऊस
☁⛆☂☁⛆☁☂
सुखावणारा हा पहिला पाऊसमला नित्य वेगळा भासतो
मनात साठलेल्या आठवणींना
हळूच ओले करतो
मग या अल्लड पावसात मी
जणू बेधुंद होऊन नाचतो
अन् सरी अलगद झेलताना
बालपणांतील आठवणीत रमतो
पावसाच्या सरी अंगावर येताच
मी चिंब चिंब भिजून जातो
अन् लहान होऊन जरासा
खट्याळ खोड्या मी करतो
– – – –⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘– – – –
2. बाहेर बरसती धारा रे
हवा हवासा वाटणारा हा पाऊस
नेहमीच आनंदाचे क्षण घेऊन येतो.......
धावपळीच्या जीवनातही पुन्हा
बालपणाचे सुखद क्षण देऊन जातो…..
बाहेर बरसती धारा रे
मधुनीच वीज थरथरते
क्षण प्राण उजळुनी विरते
करी अधिक गहन अंधारा रे
बाहेर बरसती धारा रे
स्थिर अचल दिशांतुन दाही
निःशब्द वेदना काही
का व्याकुळ आज किनारा रे
बाहेर बरसती धारा रे
मी उन्मन, काही सुचेना
लाटांत निमंत्रण प्राणां
भरतीत मलाच इशारा रे
बाहेर बरसती धारा रे
हे मुक्त अनावर सगळे
आकाश इथून मज दिसले
घर गमे आज मज कारा रे
बाहेर बरसती धारा रे
मी उन्मन, काही सुचेना
लाटांत निमंत्रण प्राणां
भरतीत मलाच इशारा रे
बाहेर बरसती धारा रे
– मंगेश पाडगावकर
– – – – –⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘– –
3. आवडता पाऊस
मनाला हुरहुर लावून देणारा तो पाऊस..
कुणाची तरी आठवण करून देणारा तो पाऊस..
हळूच अलगद भिजवणारा तो पाऊस..
लहानांपासून मोठय़ांपर्यंत प्रत्येकाला आवडणारा तो पाऊस!!
कधी धो-धो तर कधी रिमझिम पडणारा तो पाऊस..
स्वप्नांच्या गावात घेऊन जाणारा तो पाऊस..
तुझ्या माझ्या आठवणीत रमणारा तो पाऊस..
चिंब-चिंब भिजवून हरवून टाकणारा तो पाऊस!!
अबोल असला तरी खूप काही बोलून जाणारा तो पाऊस..
मातीला भिजवून सुगंध देऊन जाणारा तो पाऊस..
भान हरवून टाकणारा तो पाऊस..
हवा-हवासा वाटणारा तो पाऊस!!
– – – –⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘– – – –
4. पुन्हा कालचा पाउस
आत्ता पावसाळा येईल
मन पुन्हा ओलं होईल
छत्री उघडू उघडू म्हणता
चिंब चिंब होऊन जाईल
कुणी तरी पावसा कडे
डोळे लाउन पहातंय
मळभ दाटल्या डोळ्यांचं
मन मात्र गातय
पाउस कधी मुसळधार
पाउस कधी रिपरीप
पाउस कधी संततधार
पाउस कधी चिडीचीप
आभाळभर डोळे आता
शोधत आहेत पाउस
कुणालाच दिसत नाही
पापण्यांमधला पाउस
खोल आठवणीचं बीज
अंकुरून येतं मनावर
वसंतात छाटलं असलं
तरी मन नसतं भानावर
– – – –⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘– – – –
5. आला पाऊस
मोती गुंफ़ित मोकळ्या केसांत ग
आभाळात आले, काळे काळे ढग
धारा कोसळल्या, निवे तगमग
धुंद दरवळ, धरणीच्या श्वासात ग
कोसळल्या कश्या, सरीवर सरी
थेंब थेंब करी नाच पाण्यावरी
लाल ओहळ वाहती जोसांत ग
लिबोळ्यांची रास कडूनिंबाखाली
वारा दंगा करी, जुइ शहारली,
चाफा झुरतो, फुलांच्या भासात ग
झाडांवरी मुके, पाखरांचे थवे
वीज लालनिळी, कशी नाचे लवे
तेजाळते उभ्या अवकाशांत ग
वीज कडाडतां, भय दाटे उरीं
एकलि मी इथे, सखा राहे दुरी
मन व्याकूळ, सजणाच्या ध्यासांत ग
– शांता शेळके
– – – –⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘– – – –
6. येरे येरे पावसा
येरे येरे पावसा ⛆ ⛆
तुला देतो पैसा 💰💰
पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठा ⛆ ⛆
ये ग ये ग सरी⛆⛆
माझे मडके भरी
सर आली धाउन
मडके गेले वाहुन!
– – – –⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘– – – –
7. पाऊस गातो गाणे
टिप टिप पाऊस ⛆ ⛆
झो झो वारा ☇☇🌀
गीत गाऊ पाहतो
आसमंत सारा ⛺
कडाडणारी वीज
गडगडणारे ढग
धावण्यार्या छत्रीतली ⛱⛱
आपली लगबग
डराव् डराव् बेडकं 🐸🐸
छम छम तळे
लेझीम हाती घेऊनी जणू
थेंब लाटेवर पळे 🌊🌊
खळ खळ झरा
तड तड पत्रा
पावसाने भरवली बघा
ताला सुरांची जत्रा 🎵🎹🎸🎻🎵
– – – –⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘– – – –
8. अग्गोबाई ढग्गोबाई
अग्गोबाई ढग्गोबाई, लागली कळ
ढगाला उन्हाची केवढी झळ
थोडी न् थोडकी लागली फार
डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार
वारा वारा गरागरा सो सो सूम्
ढोल्या ढोल्या ढगात ढुम ढुम ढुम
वीजबाई अशी काही तोऱ्यामधे खडी
आकाशाच्या पाठीवर चमचम छडी
खोलखोल जमिनीचे उघडून दार
बुडबुड बेडकाची बडबड फार
डुंबायला डबक्याचा करूया तलाव
साबु-बिबु नको थोडा चिखल लगाव
– संदीप खरे
– – – –⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘– – – –
9. पाऊस आलाय?
पाऊस आलाय?.....भिजून घ्या ☁ ⛆
थोडा मातीचा गंध घ्या 😏
थोडा मोराचा छंद घ्या
उरात भरून आनंद घ्या..
आलाय पाऊस?....भिजून घ्या ⛆ ⛆
बघा समुद्र उसळतोय 🌊🌊
वारा ढगांना घुसळतोय 🌀🌀
तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या.. 👬👭
आलाय पाऊस?....भिजून घ्या ⛆ ⛆
ऑफ़ीस रोजच गाठत असतं 💻💼
काम नेहमीच साठत असतं 🙈🙈
मनातून भिजावंसं वाटत असतं
मनाची हौस पुरवून घ्या.. 💃💃
आलाय पाऊस?....भिजून घ्या ⛆ ⛆
सर्दी पडसे रोजचेच.. 😞😞
त्याला औषध तेच तेच.. 💊💊
प्यायचेच आहेत नंतर काढे ,
आधी अमृत पिऊन घ्या..😀😀
आलाय पाऊस?....भिजून घ्या
बघा निसर्ग बहरलाय 🌄🌄⛺
गारव्याने देहही शहारलाय
मनही थोडं मोहरून घ्या.. 👨👩
आलाय पाऊस?....भिजून घ्या
– – – –⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘– – – –
10. वादलवारं सुटलं गो
🌀🌀✨🌊🌊
वादलवारं सुटलं गो, वाऱ्यानं तुफान उठलं गो
भिरभिर वाऱ्यात, पावसाच्या माऱ्यात,
सजनानं होडीला पान्यात लोटलंय्
वादलवारं सुटलं गो
गडगड ढगांत बिजली करी⛈⛈
फडफड शिडात धडधड उरी
एकली मी आज घरी बाय 💁
संगतीला माझ्या कुनी नाय
सळसळ माडांत, खोपीच्या कुडात,
जागनाऱ्या डोल्यांत सपान मिटलं
वादलवारं सुटलं गो
🌀🌀✨🌊🌊
सरसर चालली होडीची नाळ
दूरवर उठली फेसाची माळ 🌊
कमरेत जरा वाकूनिया
पान्यामंदी जालं फेकूनिया
नाखवा माजा, दर्याचा राजा,
लाखाचं धन त्यानं जाल्यात लुटलं
वादलवारं सुटलं गो
– शांता शेळके
– – – –⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘– – – –
11. माझा पाऊस
💁💁
पाऊस सगळ्यांचाच असतो
सगळ्यांनी तो भोगलेलाही असतो
मलाही पाऊस माहीत आहे
मीही पाऊस कधीतरी
भोगलेला आहे
झेललेलाही आहे
👱👱
माझ्यासाठी पाऊस म्हणजे
फक्त एक आठवण
लहानपणी माझा बाप
जेव्हा मारायचा
माझ्या आईला
योगायोगाने नाही
पण पाऊस बाहेर पडत रहायचा
माझ्या आईचे पाणावलेले डोळे
मला फक्त दिसायचे
👵👵
तोच पाऊस मला आठवतो
तोच पाऊस मला माहित आहे
माझ्यासाठी पाऊस म्हणजे
दु:ख, यातना, क्लेष, अश्रू, हंबरडा
आणि मूक विलाप माझ्या आईचा
पाऊस म्हणजे माझ्यासाठी नेहमीच
पाण्याचा अर्थहीन थेंबांचा
आणि माझ्या गेलेल्या आईच्या आठवणींचा
– – – –⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘– – – –
12. पाऊस कविता मराठी-
पाऊसप्तक
ढगांची पळपळ
थेंबाची ओंजळ
मृदेची सळसळ
बेधुंद तो दरवळ
पहिला थेंब खेळ
छतावरून घरंगळ
उतारावर ओघळ
पाखरांची अंघोळ
सांज पाऊस वेळ
पोरांचे पाण खेळ
मळभ अंधारखेळ
विजेची बंद वेळ
लोकांची पळपळ
वाहनांची वर्दळ
– – – –⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘– – – –
13. पहिला पाऊस
पहिला तुफान पाऊस
आणि तुझी आठवण….
एकाच छत्रीत कणीस खात
मनसोक्त आनंद
समुद्रकाठी जाऊन येणाऱ्या
गार वाऱ्याचा स्पर्श
तुझ्या जवळ असण्याने
येणारी शिरशिरी
न सांगताही वाफळलेली कॉफी
तू माझ्यासाठी विकत घेणं
आजूबाजूला बसलेल्या लोकांची
पर्वा न करता एकमेकात गुंतून जाणं
न बोलता फक्त त्या पावसाची मजा घेणं
न बोलता तू मला आणि मी तुला समजून घेणं
आता आठवणीतल्या तुला जपूनही तू
माझं असणं मला कधी तुझ्यापासून दुरावू नाही शकलं
पण पाऊस असा आला की
फक्त तुझं असणं जास्त गरजेचं….
पहिला तुफान पाऊस
आणि तुझी आठवण….
– दिपाली नाफडे
– – – –⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘– – – –
14. पाऊस आला
पाऊस आला, वारा आला, पान लागले नाचू
थेंब टपोरे गोरे गोरे, भर भर गारा वेचू
गरगर गिरकी घेते झाड, धडधड वाजे दार कवाड
अंगणातही बघता बघता, पाणी लागे साचू
अंगे झाली ओलीचिंब, झुलू लागला दारी लिंब
ओली नक्षी, पाऊसपक्षी, कुणी पाहतो वाचू
ओसरुनी सर गेली रे, उन्हे ढगांतुन आली रे
इंद्रधनुष्यामध्ये झळकती, हिरे माणके पाचू
– शांता शेळके
– – – –⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘– – – –
15. गेला मोहन कुणीकडे
रिमझिम पाऊस पडे सारखा,
यमुनेलाही पूर चढे,
पाणीच पाणी चहूकडे, ग बाई,
गेला मोहन कुणीकडे
तरुवर भिजले भिजल्या वेली,
ओली चिंब राधा झाली,
चमकुन लवता वरती बिजली,
दचकुन माझा ऊर उडे ग बाई,
गेला मोहन कुणीकडे
हाक धावली कृष्णा म्हणुनी,
रोखुनी धरली दाही दिशानी,
खुणाविता तुज कर उंचावुनी,
गुंजत मंजुळ मुग्ध चुडे ग बाई,
गेला मोहन कुणीकडे
जलाशयाच्या लक्ष दर्पणी,
तुझेच हसरे बिंब बघुनी,
हसता राधा हिरव्या रानी,
पावसातही ऊन पडे, ग बाई,
गेला मोहन कुणीकडे
– ग. दि. माडगूळकर
– – – –⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘– – – –
- Small Poem In Marathi
- Bap Kavita In Marathi
- Aaji Kavita In Marathi
- Kusumagraj Poems In Marathi
- Badbad Geete Marathi Lyrics
- जीवनाला प्रेरणा देणारे विचार
धन्यवाद !!!!!
Post a Comment