Header Ads

Shani Dev Aarti In Marathi | जय जय श्री शनिदेवा

स्वागत आहे तुमच वर True Marathi Lyrics!!!!!!! या पोस्ट मध्ये तुम्हाला Shani Dev Aarti In Marathi वाचायला मिळेल . शनि देवाला न्यायाची देवता म्हटले जाते . अशी मान्यता आहे की , शनि देव हे आपलीला आपल्या चांगल्या वाइट कर्मांच फळ देत असतात . म्हणूनच बहुतेक जण शनिवारी शनि देवाची भक्ती, आराधना करतात .जेणेकरून शनिदेवाच्या कोपापासून रक्षण व्हावे . इथे आपण शनी देवाची आरती बघणार आहोत .

Shani Dev Aarti In Marathi
Shani Dev Aarti In Marathi


श्री शनि देवाची आरती


जय जय श्री शनि देवा ।

पद्मकर शिरीं ठेवा ॥
आरती ओंवाळीतों ।
मनोभावें करुनी सेवा ॥ ध्रु० ॥

सूर्यसुता शनिमूर्ती ।
तुझी अगाध कीर्ती ॥
एकमुखें काय वर्णूं ।
शेषा न चले स्फूर्ती ॥ १ ॥

जय जय श्री शनि देवा ।

नवग्रहामाजीं श्रेष्ठ ।
पराक्रम थोर तूझा ॥
ज्यावरी तूं कृपाकरिसी ।
होय रंकाचा राजा ॥ २ ॥

जय जय श्री शनि देवा ।

विक्रमासारिखा हो ।
शककर्ता पुण्यराशी ॥
गर्व धरितां शिक्षा केली ।
बहु छळियेलें त्यासी ॥ ३ ॥

जय जय श्री शनि देवा ।

शंकराच्या वरदानें ।
गर्व रावणें केला ।
साडेसाती येतां त्यासी ।
समूळ नाशासी नेला ॥ ४ ॥

जय जय श्री शनि देवा ।

प्रत्यक्ष गुरुनाथा ।
चमत्कार दावियेला ।
नेऊनी शूळापाशीं ।
पुन्हा सन्मान केला ॥ ५ ॥

जय जय श्री शनि देवा ।

ऐसे गुण किती गाऊं ।
धणी न पुरे गातां ॥
कृपा करीं दीनावरीं ।
महाराजा समर्था ॥ ६ ॥

जय जय श्री शनि देवा ।

दोन्ही कर जोडोनीयां ।
रुक्मा लीन सदा पायीं ॥
प्रसाद हाचि मार्गे ।
उदयकाळ सौख्य दावीं ॥ ७ ॥


तर आपण या पोस्ट मध्ये Shani Dev Aarti In Marathi बघितले . भक्ती संबंधित पोस्ट साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .

धन्यवाद !!!!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.