Header Ads

Aarti Sai Bbaa Lyrics Marathi | साई बाबांची आरती मराठी मध्ये



नमस्कार मित्रांनो , या पोस्ट मध्ये तुम्हाला Sai Baba Aarti Marathi Lyrics वाचायला मिळणार आहे. नियमित मनःपूर्वक आणि भक्तीने आरती केल्याने आरोग्य ,संपत्ती ,धन धान्यामध्ये वृद्धी होऊन मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात याचा अनुभव हजारो काय पण लाखो साई भक्तांनी घेतला आहे . तर तुम्ही पण नियमित साई बाबांची आरती आणि भक्ती करा आणि आपले आयुष्य सुंदर बनवा . चला तर मग वळूया साई बाबांच्या आरती कडे -


Sai Baba Aarti Lyrics Marathi


आरती साईबाबा ।
सौख्यदातारा जीवा ।
चरणरजतळीं निज दासां विसावां ।
भक्तां विसावा ॥धृ॥

जाळुनियां अनंग ।
स्वस्वरुपी राहे दंग ।
मुमुक्षुजना दावी ।
निजडोळां श्रीरंग ॥१॥

जया मनीं जैसा भाव ।
तया तैसा अनुभव ।
दाविसी दयाघना ।
ऐसी ही तुझी माव ॥२॥

तुमचें नाम ध्यातां ।
हरे संसृतिव्यथा ।
अगाध तव करणी ।
मार्ग दाविसी अनाथा ॥३॥

कलियुगीं अवतार ।
सगुणब्रह्म साचार ।
अवतीर्ण झालासे ।
स्वामी दत्त दिगंबर ॥४॥

आठा दिवसां गुरुवारी ।
भक्त करिती वारी ।
प्रभुपद पहावया ।
भवभय निवारी ॥५॥

माझा निजद्रव्य ठेवा ।
तव चरणसेवा ।
मागणें हेंचि आता ।
तुम्हा देवाधिदेवा ॥६॥

इच्छित दीन चातक ।
निर्मळ तोय निजसुख ।
पाजावें माधवा या ।
सांभाळ आपुली भाक ॥७॥


हे पण वाचा 👇👇👇



तर मित्रांनो आज आपण Sai Baba Aarti Lyrics Marathi बघितली . अश्याच भक्ति सबंधित पोस्ट वाचण्यासाठी साठी True Marathi Lyrics पुन्हा भेट नक्की दया .


धन्यवाद !!!!!!!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.