Sai Gayatri Mantra Lyrics | Marathi & English | साई गायत्री मंत्र
Sai Gayatri Mantra Lyrics | Marathi
ॐ शिरडी वासाय विद्महे सच्चिदानन्दाय
धीमहि , तन्नो साई प्रचोदयात ||
Sai Gayatri Mantra Meaning | साई गायत्री मंत्राचा अर्थ -
- ॐ , मला त्या देवाचे ध्यान करू द्या , जो शिरडी मध्ये राहतो . तो भगवान् जो शाश्वत सत्य अणि खरा आनंद ज्यामध्ये समवालेला आहे . जो मला खर ज्ञान देतो . आणि साई ला माझ्या मनात ज्योति जागवू दे .
Sai Gayatri Mantra Lyrics | English
Om Shirdi Vaasaay Vidmahe Sachhidanandaay
Dheemahi , Tanno Saai Prachodayaat ||
🙏🙏🙏
साईं बाबांचे महामंत्र
1.
|| ॐ साईं राम ||
2.
|| जय जय साईं राम ||
3.
|| ॐ साईं देवाय नमः ||
4.
|| ॐ साईं गुरुवाय नमः ||
5.
|| ॐ शिर्डी देवाय नमः ||
6.
|| ॐ सर्व देवाय रूपाय नमः ||
7.
|| ॐ समाधिदेवाय नमः ||
8.
|| ॐ अजर अमराय नमः ||
9.
|| ॐ फखिरदेवाय नमः ||
10.
|| ॐ सर्वज्ञा सर्व देवता सवरूप अवतारा ,
सत्य धर्म शांति प्रेमा स्वरूप अवतारा,
सत्यम शिवम् सुन्दरम स्वरुप अवतारा ,
अनंत अनुपम ब्रह्म स्वरूप अवतारा ,
ॐ परमानंद श्री शिरडी नाथाय नमः ||
साईं बाबांची व्रत कथा आणि पूजनाची विधि
साई बाबची भक्ति अणि पूजा अर्चा करण्यासाठी गुरूवार सगळ्यात उत्तम मनला जातो . कोणत्याही जाती धर्माचा व्यक्ति हे व्रत करू शकतो . तसेच स्त्री , पुरुष , लहन मुले अणि वयस्कर मंडळी कोणीही हे व्रत करू शकतात . या दिवशी तुम्हाला उपवास करावा तुम्ही दिवसा फलाहार घेऊ शकता आणि रात्रि उपवास सोडू शकता .
पूजा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधीही करू शकता . सर्वप्रथम साई बाबांचे स्मरण करा . एका आसनावर लाल किंवा पिवळा कपडा आंथरुण घ्या . त्यावर साई बाबांचे फोटो ठेवा आणि मग चंदन, हळद , कुंकु लावून पूजा करा . साईबाबाच्या फोटोला पिवळ्या फुलांचा हार घाला . ह्या नंतरसाई बाबांना नमस्कार करा आणि दिवा लावून साई व्रताची कथा वाचा . कथा वाचून झाल्यावर साई बाबची आरती म्हणून काही गोड़ प्रसाद / मिठाई वाटा .
अशाप्रकारे ९ आठवडे व्रत करून झाल्यावर दहाव्या गुरुवारी तुम्ही आपल्या सामर्थ्यानुसार पाच गरीब लोकना जेवू घालु शकता किंवा कही दान देवू शकता . या सोबत साई बाबांच्या व्रताचा प्रचार करण्यासाठी साई व्रत कथेची ७, ११ किंवा २१ पुस्तके तुम्ही तुमच्या घरजवळच्या साई मंदिरात वाटू शकता .
हे खूपच पावरफुल असे व्रत आहे अणि अतिशीघ्र फलदायी आहे . हे व्रत केल्याने तुम्ही तुमच्या मनातील कोणतीही इच्छा सहज पूर्ण करू शकता . फ़क्त एक गोष्ट लक्षात ठेवा तुमची इच्छा दुसऱ्याना कष्ट , तरस देणारी नसावी , कोणाचे नुकसान करणारी नसावी . शुभ इच्छाच नेहमी मागवी .
हे पण नक्की वाचा :
- Sai Baba Aarti Marathi Lyrics
- Jay Jay Aarti Nityanand Raya Marathi Lyrics
- Tuch Gajanan Tuch Sai Lyrics
तर मित्रानो आज आपण Sai Gayatri Mantra Lyrics , तसेच कही साई महामंत्र बघितले . अणि साई व्रत कथे विषयी सुद्धा सविस्तार माहिती जाणून घेतली . तुमचे कही प्र्शन असतील मला नक्की विचारा अणि साई बाबांच्या कृपेचा फायदा तुम्ही सुद्धा नक्की करुण घ्याल अशी मी आशा करते .
धन्यवाद !!!!!!!
Post a Comment