Aaji Kavita In Marathi | आजी कविता मराठी | True Marathi Lyrics
नमस्कार मित्रांनो , या पोस्ट मध्ये तुम्हाला Aaji Kavita In Marathi आजी वर वेग वेगळ्या कविता वाचायला मिळणार आहेत . काही कवितांचा संग्रह मि इथे शेयर करत आहे . चला बघुया आजी वरच्या कविता -
1. आजी म्हणजे काय ???
आजी म्हणजे काय
दुधावरची साय !!! 🍼🍼🍼🍼
आजी म्हणजे काय
प्रेमाची माय !!!💓💓💓
आजी म्हणजे काय
आईची माझ्या माय !!!👧👩
आजी म्हणजे काय
नातवंडांची लाडकी आय !!!🙌🙌
आजी म्हणजे काय
आयुष्य भर जपलेली गोड बाय !!!😍😍
आजी म्हणजे काय
माझ्या बालपणीच्या मोठेपणाची सोबती हाय !!!👫👫
आजी म्हणजे काय
आशीर्वाद देणारी माऊली हाय..!!!👵👵
आजी म्हणजे काय
सगळ्यांचा खंबीर साथ हाय..!!!💥💥💥
आजी म्हणजे काय
दहा हत्तीचं बळ जणू बळ हाय..!!!💪💪💪
आजी म्हणजे काय
प्रत्येकाला लाभलेलं भाग्य हाय..!!!✅✅✅
2. माझी आजी
आजी माझी जशी चंद्रकोर🌙🌙🌙
जगण्याचा तिचा अनुभव थोर 👵👵👵
कपाळावर तीच्या आठी😠😠😠
शिकवितात जीवनातील
आडकाठींच्या गाठीभेठी 👯👯
तशी धडधाकट आहे माझी आजी 💪💪
बनवते ती चविष्ट भाकरी आणि भाजी🍲🍪🍪
आजीच आमचा पाया
आणि आजीची आम्हा सगळ्यांवर अफाट माया 💛💛💛💛
3. आजीची माया
आजीच्या थरथरणाऱ्या हातांची 👵👵👵
मऊशार माया
मला वाटते हवीहवीशी😚😚😚
मनात साठवाया
आजीच्या मांडीवर डोके ठेऊन
आकाशतल्या चांदन्या मोजव्यात 🌟🌟🌟🌟
आजीने सांगितलेल्या कथेत
स्वतःचा एक नवीन शोध लागावा
तिचा पदर धरून 💃💃
मग मागे-मागे फिरावे
बाबांकडून हट्ट पुरवण्यासाठी
आजीला लाडीगुडी लावावे 😏😏😏
आजी तुझ्या हातांची चव
या संपूर्ण जगात कुठेच नाही
आणि तू घास भरवल्याशिवाय
आजी माझी भूक संपत नाही😋😋
तुझ्या निस्वार्थ प्रेमाची छाया
आजी नको सोडूस मला कधी 🙅🙅
कारण तुझ्याशिवाय घराच्या घरपणाला 🏠🏠🏠
पूर्णत्व येणार नाही
4. सावलीत मी तुझ्या
सावलीत मी तुझ्या
हक्काने वाढत गेलो
काळजीने तुझ्या
हळवा होऊन गेलो
नातू म्हणून मी तुझा
मी धन्य धन्य झालो
तुझी ती अनमोल साथ
सदैव राही माझ्या मनात
आजी तू लक्ष्मी वरदा माझी
माझ्या सर्व गोष्टींना तू राजी
तुझे आमच्या प्रितीचे समर्पण
हे आजी अगदी झाले अर्पण
एकटी करुनी गेली तू
न बघता हे दर्पण
- Shashwat Bawankule
5. आजीची माया
आजीची माया असतेच अशी
मनाच्या कुपीत ठेवावी जशी
आजीची माया असतेच अशी
तूप रोटी साखर असावी जशी
आजीची माया असतेच अशी
मुरंब्याची गोडी असावी जशी
- Tanuja Pradhan
6. आजी माझी
आजी माझी जशी
आईची खरी सावली
काळजाची माझ्या
मायाळू माऊली
7. आजी
घरात असते एक म्हातारी, म्हणतात तिला सगळे आजी
जोवर असते आपल्या सोबत, नाही कळत तिची किंमत
चेहरा तिचा सुकलेला, पण हृदयात मात्र प्रेमाचे पाणी
नसते काही इच्छा तिची, फक्त द्यावा तिला थोडावेळ कुणी
- Yogesh Chitapure
8 . आजीची माया
आजीची माया असतेच अशी
मनाच्या कुपीत जपून ठेवावी जशी 💁💁💁
आजीची माया असतेच अशी
तूप रोटी साखर खावी जशी 🍪🍪🍪
आजीची माया असतेच अशी
मुरंब्याची गोडी वाढावी जशी 🍝🍝🍝
छान छान गोष्टी म्हणजे आजी
लहानपणीच्या भरपूर आठवणी म्हणजे आजी🙇🙇
एका पिढीचा अनुभव म्हणजे आजी
रानातली मस्त सैर म्हणजे आजी 🌳🌳🌳🌲🌿
जत्रेतील खूप मज्जा म्हणजे आजी
गोड खाऊचा डब्बा म्हणजे आजी 🍞🍞🍞
9. प्रिय आजी
अजुनही हवाहवासा वाटतो तुझा तो प्रेमळ स्पर्श ......
अजुनही ऐकाव्याश्या वाटतात तुझ्या श्रीकृष्णाच्या गोष्टी
अजुनही आठवते तुझी चांदोमामांची सुंदर ओवी ......
अजुनही हवीशी वाटते तुझ्या मायेची उबदार कुस
अजुनही हवासा वाटतो आजी तुझा आशीर्वाद .....
आणि जगण्याला नवे बळ देणारी तू
अजुनही हवीहवीशी वाटतेस तू .....
ईश्वराने तुला दीर्घायुष्य द्यावे
हेच त्याच्याकडे मागणे
अनुभवांनी भरलेले आयुष्य
चालून थकते काही पावले
जवळ जाता ओळखते न पाहता
चेहरा पाहून व्यक्ति परखते ती माझी आजी ........
- Marathi Pavsachi Kavita
- Bap Kavita In Marathi
- Small Poem In Marathi
- Kusumagraj Poems In Marathi
- Romantic Marathi Premachya Kavita
धन्यवाद !!!!!!!
Post a Comment