Header Ads

देश भक्ति गीत कविता मराठी | Desh Bhakti Par Geet Marathi



नमस्कार मित्रांनो , आज आपण देश भक्ति गीत कविता मराठी मधून बघणार आहोत. आपल्या देशाचा प्रत्येकालाच अभिमान असतो. देशभक्तीवर आधारित गीत / कविता आपल्यामध्ये एक वेगळाच जोश उत्साह भरतात. अशाच आपल्या प्रिय भारत देशाचे वर्णन करणाऱ्या कविता तसेच गीत आपण इथे बघू.



    1. करितो आम्ही प्रणाम 


    झेंडा आमुचा प्रिय देशाचा , फडकत वरी महान
    करितो आम्ही प्रणाम याला , करितो आम्ही प्रणाम || धृ ||

    लढले गांधी याच्याकरिता , टिळक नेहरू लढती जनता .....
    समर धुरेधर वीर खरोखर अर्पूनि गेले प्राण || १ ||

    भारतमाता आमुची माता , आम्ही गातो या जयगीता ......
    हिमालयाच्या उंच शिखरावर , फडकत राही निशाण......

    करितो आम्ही प्रणाम याला , करितो आम्ही प्रणाम || २ ||

    या देशाची पवित्र माती , जुळवी आमुच्या मधली नाती .......
    एक नाद गर्जतो भरता , तुझा आम्हा अभिमान ......

    करितो आम्ही प्रणाम याला , करितो आम्ही प्रणाम || ३ ||
    गगनावरी अन सागरातीरी , सळसळ करिती लाटा लहरी

    जय जय भारत जय , जय भारत जय
    करितो आम्ही प्रणाम याला , करितो आम्ही प्रणाम || ४ ||


    2. हा देश माझा याचे भान

    हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे
    जरा से राहू द्या ........ || धृ ||

    हा उंच हिमालय माझा , हा विशाल सागर माझा
    ह्या गंगा , यमुना , शेती धरती , बाग बगीचा माझा

    अभिलाषा ह्याची धरिता कुणाची नजर वाकडी करिता
    या मरण द्यावया स्फुरण , आपुले बहू वाहू द्या रे ||| १ ||
    हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे
    जरा से राहू द्या ........

    जे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला ,
    रोका लावा कार्याला या देशाच्या प्रगतीला
    हे बंद करा उत्पात , थांबवा आपुला घात
    समर्थ न जावो व्यर्थ काहीसा , अर्थही येऊ द्या रे ||| २ ||
    हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे
    जरा से राहू द्या ........

    जरी अनेक आपुले धर्म , अनेक आपुल्या जाती
    परी अभंग असू द्या सदैव , आपुली माणुसकीची नाती
    द्या सर्व दूर ललकारी , फुंका रे एक तुतारी
    संदेश रोष हे द्वेष मनातील वाहून जाऊ द्या रे ||| ३ ||
    हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे
    जरा से राहू द्या ........


    3. ते देशासाठी लढले

    ते देशासाठी लढले , ते अमर हुतात्मे झाले || धृ ||

    सोडिले सर्व घरदार , त्यागिला सुखी संसार
    ज्योतीसम जीवन जगले , ते देशासाठी लढले || १ ||

    तो तुरुंगवास ते उपवास , सोसला किती वनवास
    कुणी फसवरती चढले , ते देशासाठी लढले || २ ||

    झगडले झुंजले जनता , मग स्वतंत्र झाली माता ,
    हिम शिखरी ध्वज फडफडले , ते देशासाठी लढले || ३ ||

    हा राष्ट्र ध्वज साक्षिला , करू आपण वंदन याला
    जय गीत गाऊया आपले , ते देशासाठी लढले || ४ ||

     

    4. चला मुलांनो आज गाऊया

    चला मुलांनो आज गाऊया स्वातंत्र्याचे गान
    एकमुखाने गर्जु चला रे भारत देश महान || धृ ||

    पहा झाशीची समोर किल्ला , झाशीची हि राणी
    मेरी झाशी कभी न दूंगी अशी गर्जती वाणी
    स्वातंत्र्याच्या यज्ञामधले हे पहिले बलिदान || १ ||

    एकमुखाने गर्जु चला रे भारत देश महान
    स्वतंत्रता हा हक्क कि माझा जन्मसिद्ध जो आहे
    टिळक केसरी गर्जत असता सारा भारत पाहे
    सिंहगर्जना ऐकून जागृत झाले थोर लहान || २ ||
    एकमुखाने गर्जु चला रे भारत देश महान

    चालो दिल्ली कि करीत घोषणा सुभाष बाबू आले
    भारतामध्येच उत्साहाला भलते उधाण आले
    स्वातंत्र्याच्या जयकाराने दुमदुमले आसमान ..... || ३ ||
    एकमुखाने गर्जु चला रे भारत देश महान

    सत्य अहिंसा शस्त्र घेऊनि बापूजी ते लढले
    स्वातंत्र्याचे निशाण गगनी डौलाने फडकावले
    जान देऊ पण सदैव राखू जगात याचा मान ....... || ४ ||
    एकमुखाने गर्जु चला रे भारत देश महान

    गुलामगिरीच्या बेड्यांमधुनी भारत मुक्त करायला
    नेहरू , आझाद , पटेल यांनी कारावासही भोगला
    लोककल्याणासाठी झटले होऊनिया बेभान || ५ ||
    एकमुखाने गर्जु चला रे भारत देश महान

    चला मुलांनो आज गाऊया स्वातंत्र्याचे गा
    एकमुखाने गर्जु चला रे भारत देश महान

    5. मानवंदना

    तिरंग्याला नमन करताना मन भरून आले
    स्वातंत्र्य पूर्व काळातील इतिहासात जाऊन रमले
    कसे असतील ते वीर बहाद्दर
    मोठ्या हिंम्मतीचे अन जिद्दीचे
    ज्यांनी देश स्वातंत्यासाठी ,बलिदान दिले प्राणांचे
    लढले , झगडले इंग्रजांशी इमान राखले भारतमातेशी
    जण ठेवून गुलामगिरीची आस धरली स्वातंत्र्याची
    अशा या थोर वीरांना मानवंदना माझ्याकडून
    कोटी कोटी प्राणामांची

    - जसवंत


    6. फडकवूया तिरंगा

    जण गण मण गा , गा रे गा अभंगा
    प्रत्येकाच्या घराघरांवर फडकवूया तिरंगा || धृ ||

    वंदे मातरम , वंदे मातरम , वंदे मातरम
    स्वातंत्र्याची उंच मिनारे , चैतन्याची खुली बहारे
    क्रांतीच्या या अभिमानाची प्रतिमा रंगा ........
    प्रत्येकाच्या घराघरांवर फडकवूया तिरंगा || १ ||

    मानवतेच्या हृदयामधुनी वंदे मातरम मंत्र वदुनि
    भारतभू च्या चरणस्थळी या वाहे अमृतगंगा
    प्रत्येकाच्या घराघरांवर फडकवूया तिरंगा || २ ||

    या देशाचा अजिंक्य तारा वीररसाची वाहती धारा
    सुवर्ण कमळे उरी झळाळे पवित्रतेच्या अंगा
    प्रत्येकाच्या घराघरांवर फडकवूया तिरंगा || ३ ||

    - धनंजय गव्हाळे


    7. तीन रंग झेंड्याचे

    तीन रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे
    तीन रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे

    मान पहिला भगव्याचा मंत्र देतो त्यागाचा
    मान पहिला भगव्याचा मंत्र देतो त्यागाचा
    तीन रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे

    मान दुसरा पांढऱ्याचा , मंत्र देतो शांतीचा
    मान दुसरा पांढऱ्याचा , मंत्र देतो शांतीचा
    तीन रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे

    मान तिसरा हिरव्याचा मंत्र देतो समृद्धीचा
    मान तिसरा हिरव्याचा मंत्र देतो समृद्धीचा
    तीन रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे

    रंग निळसर चक्राचा मंत्र देतो धावण्याचा
    रंग निळसर चक्राचा मंत्र देतो धावण्याचा
    तीन रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे


    8. माझा भारत महान

    शाहिद जाहले अनेक शूरवीर , रक्षण करण्या भारत भूमीचे
    मुळीच नाही विसरू आपण , बलिदान या शूरवीरांचे !!!

    वंदन करूया त्या लढवैयांना , जे लढले स्वातंत्र्यासाठी
    गाऊया राष्ट्रगान आपल्या भारतमातेसाठी !!!

    विविधतेने नटलेला माझा भारत देश महान
    विविधतेतही एकता हीच खरी भारताची शान !!!

    भूमीवर या वाहे पवित्र यमुना आणि गंगा
    उंच आकाशी फडकत राहे , आमचा प्रिय तिरंगा !!!

    स्वतंत्रता दिवस आहे भारताच्या विजयाचा
    गर्व आहे मला मी भारतीय असल्याचा !!

    - सोहम वेळंजकर


    9. उंच उंच गगनात तिरंगा

    उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडकतो
    हृदयातून जय हिंद , भारती सूर एक नांदतो

    भारतमाता जन्मदायीनी अमृत पुत्रांची
    राष्ट्रपुरुष घडविता भूमिका तुझी जिजाईची

    तुझ्या कीर्तीचा अवनी सुगंध दरवळतो || १ ||
    उंच उंच गगनात तिरंगा ......

    नंदनवन तू रम्य मनोहर समग्र विश्वाचे
    वसुंधरा तू मुळात सुंदर प्रतीक ऐक्याचे
    अमृताशी जणू वात्सल्याची नित्य सावली देतो || २ ||
    उंच उंच गगनात तिरंगा ......

    मन्मदिरी स्थान आईला , नित्य आम्ही दिधले
    उताठणास्तव भारतभूच्या जीवन वेचू आपले
    तिची कस्तुरी गंधित माती भाळावर लावतो || ३ ||
    उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडकतो

    हृदयातून जय हिंद , भारती सूर एक नांदतो
    उंच उंच गगनात तिरंगा ......


    10. माझा देश कविता

    सुंदर सुंदर माझा देश , सगळ्यात वेगळा माझा देश
    ज्याच्यावर गर्व आहे जगाला असा अनोखा माझा देश
    सोने चांदी माझा देश , सुजलाम सुफलाम माझा देश
    गंगा यमुनेच्या माळेचा , फुलासारखा माझा देश
    प्रगती करेल माझा देश , सुख देईल माझा देश
    इतिहासामध्ये नाव करेल माझा देश
    आकाशी झेप घेईल , माझा महान देश ..... !!!!


    11. प्रजासत्ताक दिन कविता

    २६ जानेवारी राष्ट्रीय सण , आज आहे प्रजासत्ताक दिन .... !!!
    सलामी देऊ आपल्या तिरंग्या झेंड्याला ,
    अभिमानी पद माझ्या भारत देशाला ,
    घोषणा देऊ भारतमाता कि जय ,
    माझ्या भारत देश होवो नेहमी जय
    आज संविधानाची झाली अंमलबजावणी ,
    भारत देश सजला डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्यानी !!

    - सतीश दत्ता भगत

    हे पण वाचा 👇👇👇


    तर मित्रानो आज आपण , देश भक्ति गीत कविता मराठी बघितल्या. तुम्हाला हि पोस्ट कशी वाटली ते मला सांगा आणि अन्य पोस्ट वाचण्यासाठी True Martahi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .

    हि पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!!!


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Blogger द्वारे प्रायोजित.