दत्त गायत्री मंत्र (मराठी )| Dattanche Mantra Ani Tyache Fayde
हिंदू धर्मामध्ये दत्त गुरुला खूप महत्व आहे. दत्तात्रेयाला ब्रम्हा विष्णू महेशचा एकत्रित अवतार मानले जाते. म्हणून त्यांना त्रिमूर्ती असेही म्हणतात. दत्तात्रयाचे स्वरूप हे तीन शिरांचे , गळ्यात रुद्राक्ष माळा , अंगावर भस्माचे पट्टे , मागच्या बाजूला गाय , समोर चार कुत्रे असे असते . हे चार कुत्रे चार वेद मानले जातात आणि अंगावर भस्माचे पट्टे असल्यामुळे त्यांना शिवाचे रूप सुद्धा मानले जाते. दत्तांच्या जन्माबद्दल भागवत, मार्कंडेय सारख्या धर्मग्रंथ आणि पुराणांमध्ये मान्यता आहे पण त्यांच्या जन्म आणि उत्पत्ती बद्दल अनेक भिन्न मते आहेत . आज आपण दत्त गायत्री मंत्र तसेच दत्ताचे अन्य मंत्र आणि त्याचे महत्व बघणार आहोत.
- खाली आपण दत्ताचे काही महाशक्तिशाली असे मंत्र बघू -
* मंत्र 1 -
* मंत्र 1 -
|| ॐ द्रां दत्तात्रेयाय नम: ||
* मंत्र 2 -
दत्त गायत्री मंत्र ---
|| ॐ दिगंबराय विद्महे योगीश्रारय् धीमही तन्नो दत: प्रचोदयात ||
* मंत्र 3 -
|| श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
* मंत्र 4 -
|| ॐ द्रां ॐ द्रां ॐ द्रां ॐ द्रां ॐ द्रां ॐ द्रां ॐ द्रां ॐ द्रां
ॐ द्रां ॐ द्रां ॐ द्रां ॐ द्रां ॐ द्रां ॐ द्रां
ॐ द्रां ॐ द्रां ॐ द्रां ॐ द्रां ||
* मंत्र 5 -
|| ॐ द्रां दत्तात्रेयाय स्वाहा ||
* मंत्र 6 -
|| ॐ हीं विद्युत जिव्हाय माणिक्यरूपिने स्वाहा ||
* मंत्र 7 -
|| ॐ विध्याधिनायकाय द्रां दत्तारे स्वाहा ||
दत्तात्रय मंत्र जपाची संपूर्ण विधी -
- सर्वात आधी घरातील देवघरामध्ये लाल रंगाचा कपडा अंथरावा. नंतर त्यावर दत्ताची मूर्ती स्थापित करावी.
- आता कलश किंवा मातीचे मडके घेऊन त्यामध्ये आंब्याची ५ पाने आणि नारळ ठेवा.
- नंतर दत्ताची पूजा अर्चना करा. फुले वगैरे वाहून झाल्यावर दिवा लावा. लक्ष ठेवा कि मंत्र जाप
- पूर्ण होईपर्यंत दिवा जळत राहील.
- मंत्र जपासाठी बसताना शक्यतो पिवळ्या रंगाच्या आसनावर बसा. जर पिवळे आसन उपलब्ध नसेल तर कोणत्याही आसनाचा वापर तुम्ही करू शकता. शेवटी भावनाच सर्वात जास्त महत्वाची असते.
- आता हातामध्ये फुल आणि तांदूळ घेऊन दत्तांच्या मूर्ती वर अर्पण करावी. आणि पूर्ण भक्तिभावाने मंत्र साधना सुरु करावी.
- यानंतर तुम्ही ज्या मंत्राचा जप करणार असाल त्याचा जप सुरु करावा. हा जप तुम्ही १०८ वेळा करावा त्यासाठी तुम्ही रुद्राक्षाची माळ किंवा स्फटिकाच्या माळेचा उपयोग करू शकता.
दत्त मंत्र जपाचे फायदे -
- जर तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल तर दत्तांच्या सुरवातीच्या तीन मंत्राचा नियमित जप नियमितपणे करून तुम्ही पितृदोष दूर करू शकता.
- दत्तांच्या ॐ द्रां हीं स्पोटकाय स्वाहाः या मंत्र जपाने तुम्हाला शत्रू दोषापासून पण मुक्ती मिळते.
- विधिपूर्वक मंत्र जपामुळे कौटुंबिक वाद, कलह यापासून पण सुटका मिळते.
- दत्ताचा ॐ विध्याधिनायकाय द्रां दत्तारे स्वाहा हा मंत्र विशेष करून विद्यार्थ्यांसाठी लाभकारी मानला गेला आहे. परीक्षा मध्ये सफलता मिळविण्यासाठी रोज नियमितपणे पाच वेळा या मंत्राचा जप करून तुम्ही परीक्षेमध्ये चांगलं यश मिळवू शकता.
- ॐ हीं विद्युत जिव्हाय माणिक्यरूपिने स्वाहा या मंत्राच्या जपाने तुम्ही आपली गरिबी दूर करू शकता. असे मानले जाते कि ह्या मंत्राच्या नियमित जपाने गरिबातील गरीब व्यक्ती पण श्रीमंत बानू शकते.
- या सोबतच दत्ताचे सर्व मंत्र प्रभावशाली मानले जातात आणि कोणत्याही प्रकारच्या कष्टातून लवकर मुक्तता करून देणारे आहेत.
हे पण वाचा 👇👇👇
- Datta Bhajan Marathi Lyrics
- Swami Samarth Tarak Mantra Lyrics
- Sarva Mangala Mangalye Mantra
- Maha Mrityunjaya Mantra
तर मित्रांनो आज आपण दत्त गायत्री मंत्रासोबत इतरही काही दत्ताचे मंत्र या पोस्ट मध्ये बघितले. मला आशा आहे कि या पोस्टमुळे तुम्हला फायदा होईल. अधिक मराठी पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.
धन्यवाद !!!!!!!!!!!!
Post a Comment