Header Ads

Giriraj Chalisa Lyrics | वाचा गिरीराज गोवर्धन चालीसा आणि त्याचे फायदे


नमस्कार , या पोस्ट मध्ये तुम्हाला Giriraj Chalisa Lyrics वाचायला मिळतील. गिरीराज हे श्री कृष्णाचे बाल रूप आहे. गिरीराज चालीसा पाठाने व्यक्तीच्या जीवनात सुख सौभाग्याची प्राप्ती होते. तसेच यांच्या कृपेने बल, बुद्धी तसेच धन यांची पण प्राप्ती होते. हाकेला तर मग बघूया गिरीराज चालीसा -

    📒काय आहे गिरीरराज चालीसा आणि त्याचे महत्व काय आहे ??

    गिरिराज चालीसा ही गिरीराज गोवर्धन यांना समर्पित आहे. यात गिरीराज भगवान यांच्या मोहिमेचे वर्णन केलेले आहे. गिरीराज च्या पूजेमध्ये या चालीसेला विशेष महत्व आहे. नियमितपणे एक वेळ जरी याचा मनोभावे पाठ केला तर असे मानले जाते कि गिरीराज लवकरच प्रसन्न होतात. यामध्ये ४ दोहे आणि ४० चौपाई आहे. या चाळीस चौपाई मुळेच या काव्याला चालीसा कसे म्हणतात. यामध्ये सुरवातीला २ दोहे नंतर ४० चौपाई आणि शेवटी २ दोहे आहेत. गिरीराज यांची पूजा आणि चालीसा हि भगवान श्रीकृष्णाला प्रिय आहे.

    🙏गिरीराज गोवर्धनची पूजा कधीपासून सुरु झाली ?


    हिंदू पौराणिक मान्यतेनुसार, जेव्हा गावातल्या लोकांनी इंद्रदेवांची पूजा न करता गिरीराज गोवर्धन (श्रीकृष्ण ) ची पूजा केली तेव्हा नाराज होऊन अहंकारवश ब्रज मध्ये मुसळधार पाऊस पडायला सुरवात केली. तेव्हा श्रीकृष्णाच्या बाल रूपाने गोवर्धन पर्वताला आपल्या करंगळीवर उचलून ब्रज वासियांचे मुसळधार पावसामध्ये रक्षण केले. त्यांनतर जेव्हा इंद्रदेवाला समजले कि श्रीकृष्ण हे विष्णू देवाचे अवतार आहेत तेव्हा त्यांचा अहंकार गळून पडला, आणि इंद्रदेवने श्रीकृष्णाकडे क्षमा याचना मागितली. त्या कठीण प्रसंगामध्ये गोवर्धन पर्वताच्या खाली सर्व गोप गोपिका ग्वाल, पशु पक्षी सर्व जण पावसामध्ये सुरक्षित राहू शकले म्हणून तेव्हापासून गोवर्धन पूजेची सुरवात झाली.


    गिरीराज चालीसा पाठ करण्याचे लाभ काय आहेत ??😇📖


    गिरीराज गोवर्धन म्हणजे श्रीकृष्णाचेच रूप आहे. म्हणून लाखोंच्या संख्येने भक्त त्यांची परिक्रमा करतात. असे मानले जाते कि गोवर्धनाची परिक्रमा केल्याने भक्तांची मनोकामना पूर्ण होते. चला आता बघूया गिरीराज चालीसा पठणाने कोण कोणते फायदे होतात -

    • गिरीराज भगवान भक्तांच्या जीवनातले सर्व अडथळे तसेच समस्यांचा नाश करून सुख समृद्धीची प्रदान करतात आणि भक्तांना सर्व प्रकारच्या सुखाची प्राप्ती होते.
    • गिरीराज भगवान यांच्या कृपेमुळे व्यक्ती धनवान बनते आणि जीवनात त्याची प्रगती होते.
    • भगवान गिरीराज यांच्या कृपेने ग्रहांची दशा पण सुधारते त्यामुळे जीवनातील दुःखे कष्टे दूर होण्यास मदत होते.
    • जो भक्त मनोभावे चालीसा पठाण करतो त्याच्या शारीरिक व्याधी दूर होतात.
    • पुत्रहीन लोकांना या चालीसेच्या पठणाने निश्चित पुत्र प्राप्ती होते.
    • गिरीरराज चालीसेचा पाठ केल्याने सर्व प्रकारच्या भयाचा नाश होऊन व्यक्ती भयमुक्त जीवन जगू शकते.

    गिरीराज गोवर्धनच्या पूजेचा विधी आणि चालीसा पाठ कसा करावा ?📒📒

    • गोवर्धन पूजा तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला करू शकता.
    • सर्वात आधी गायीच्या शेणाने गोवर्धन पर्वताचे चित्र बनवा त्याला फुलांनी सजवा. आणि त्याच्या आजूबाजूला ग्वाल , पशु पक्षी आणि झाडे यांचे चित्र बनवा.
    • आता त्याच्या मध्यभागी श्रीकृष्णाची मूर्ती ठेवा.
    • मग देवाला दिवा लावून फुल वगैरे वाहून कोणत्याही प्रकारचा नैवेद्य दाखवावा. आणि मनोभावे नमस्कार करावा.
    • शेवटी गोवर्धन पूजा व्रत कथा वाचा. आणि प्रसाद सर्वाना वाटा आणि तुम्ही पण घ्या.
    • चालीसा पाठ करताना तुम्ही पूजा झाल्यावर व्रत कथा न वाचता डायरेक्ट चालीसा पाठ करायला सुरवात केली तरी चालते.

    Giriraj Chalisa Lyrics


    ॥ दोहा ॥


    बन्दहुँ वीणा वादिनी, धरि गणपति को ध्यान।
    महाशक्ति राधा, सहित कृष्ण करौ कल्याण।
    सुमिरन करि सब देवगण, गुरु पितु बारम्बार।
    बरनौ श्रीगिरिराज यश, निज मति के अनुसार।


    ॥ चौपाई ॥


    जय हो जय बंदित गिरिराजा ।
    ब्रज मण्डल के श्री महाराजा ।। 1 ।।
    विष्णु रूप तुम हो अवतारी ।
    सुन्दरता पै जग बलिहारी ।। 2 ।।
    स्वर्ण शिखर अति शोभा पावें ।
    सुर मुनि गण दरशन कूं आवें।। 3 ।।
    शांत कंदरा स्वर्ग समाना ।
    जहाँ तपस्वी धरते ध्याना ।। 4 ।।


    द्रोणगिरि के तुम युवराजा ।
    भक्तन के साधौ हौ काजा ।। 5 ।।
    मुनि पुलस्त्य जी के मन भाये ।
    जोर विनय कर तुम कूं लाये। ।। 6 ।।
    मुनिवर संघ जब ब्रज में आये ।
    लखि ब्रजभूमि यहाँ ठहराये ।। 7 ।।
    विष्णु धाम गौलोक सुहावन ।
    यमुना गोवर्धन वृन्दावन ।। 8 ।।


    देख देव मन में ललचाये ।
    बास करन बहुत रूप बनाये ।। 9 ।।
    कोउ बानर कोउ मृग के रूपा ।
    कोउ वृक्ष कोउ लता स्वरूपा ।। 10 ।।
    आनन्द लें गोलोक धाम के ।
    परम उपासक रूप नाम के ।। 11 ।।
    द्वापर अंत भये अवतारी ।
    कृष्णचन्द्र आनन्द मुरारी ।। 12 ।।


    महिमा तुम्हरी कृष्ण बखानी ।
    पूजा करिबे की मन ठानी ।। 13 ।।
    ब्रजवासी सब के लिये बुलाई ।
    गोवर्धन पूजा करवाई ।। 14 ।।
    पूजन कूं व्यंजन बनवाये ।
    ब्रजवासी घर घर ते लाये ।। 15 ।।
    ग्वाल बाल मिलि पूजा कीनी ।
    सहस भुजा तुमने कर लीनी।। 16 ।।


    स्वयं प्रकट हो कृष्ण पूजा में ।
    मांग मांग के भोजन पावें ।। 17 ।।
    लखि नर नारि मन हरषावें ।
    जै जै जै गिरिवर गुण गावें ।। 18 ।।
    देवराज मन में रिसियाए ।
    नष्ट करन ब्रज मेघ बुलाए ।।19 ।।
    छाया कर ब्रज लियौ बचाई ।
    एकउ बूंद न नीचे आई ।। 20।।


    सात दिवस भई बरसा भारी ।
    थके मेघ भारी जल धारी। ।। 21 ।।
    कृष्णचन्द्र ने नख पै धारे ।
    नमो नमो ब्रज के रखवारे ।। 22 ।।
    करि अभिमान थके सुरसाई ।
    क्षमा मांग पुनि अस्तुति गाई ।। 23 ।।
    त्राहि माम मैं शरण तिहारी ।
    क्षमा करो प्रभु चूक हमारी ।। 24 ।।


    बार बार बिनती अति कीनी ।
    सात कोस परिकम्मा दीनी ।। 25 ।।
    संग सुरभि ऐरावत लाये ।
    हाथ जोड़ कर भेंट गहाए ।। 26 ।।
    अभय दान पा इन्द्र सिहाये ।
    करि प्रणाम निज लोक सिधाये ।। 27 ।।
    जो यह कथा सुनैं चित लावें ।
    अन्त समय सुरपति पद पावैं ।। 28 ।।


    गोवर्धन है नाम तिहारौ ।
    करते भक्तन कौ निस्तारौ ।। 29 ।।
    जो नर तुम्हरे दर्शन पावें ।
    तिनके दुख दूर ह्वै जावे।। 30 ।।
    कुण्डन में जो करें आचमन ।
    धन्य धन्य वह मानव जीवन ।। 31 ।।
    मानसी गंगा में जो नहावे ।
    सीधे स्वर्ग लोक कूं जावें।। 32 ।।


    दूध चढ़ा जो भोग लगावें ।
    आधि व्याधि तेहि पास न आवें।। 33 ।।
    जल फल तुलसी पत्र चढ़ावें ।
    मन वांछित फल निश्चय पावें।। 34 ।।
    जो नर देत दूध की धारा ।
    भरौ रहे ताकौ भण्डारा ।। 35 ।।
    करें जागरण जो नर कोई ।
    दुख दरिद्र भय ताहि न होई।। 36 ।


    श्याम शिलामय निज जन त्राता ।
    भक्ति मुक्ति सरबस के दाता।। 37 ।।
    पुत्रहीन जो तुम कूं ध्यावें ।
    ताकूं पुत्र प्राप्ति ह्वै जावें ।। 38 ।।
    दण्डौती परिकम्मा करहीं ।
    ते सहजहिं भवसागर तरहीं ।। 39 ।।
    कलि में तुम सक देव न दूजा ।
    सुर नर मुनि सब करते पूजा ।। 40 ।।

    ।। दोहा ।।

    जो यह चालीसा पढ़ै, सुनै शुद्ध चित्त लाय।
    सत्य सत्य यह सत्य है, गिरिवर करै सहाय।
    क्षमा करहुँ अपराध मम, त्राहि माम् गिरिराज।
    || श्याम बिहारी शरण में, गोवर्धन महाराज ||



    हे पण वाचा 👇👇👇


    तर आज आपण Giriraj Chalisa Lyrics बघतले. त्यासोबतच गिरीराज भगवान यांच्याबदल चालीसेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतली. आणि चालीसा पाठ केल्याने काय फायदे होतात ते पण आपण बघितले. बल, बुद्धी, धन, धान्य देऊन सर्व दुःख दूर करणारी अशी हि चालीसा आहे. अधिक भक्ती संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या . 

     पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏





    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Blogger द्वारे प्रायोजित.