Header Ads

Lal Chikhal Song Lyrics | लाल चिखल | Navardev (Bsc. Agri)


मित्रानो, आज या पोस्ट मध्ये आपण Lal Chikhal Song Lyrics बघणार आहोत. हे गाणं नवरदेव (Bsc. Agri) या मराठी मुव्ही मधलं आहे.रॉकसन यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत. 
चला तर मग बघूया लाल चिखल या गाण्याचे बोल -


सॉन्ग - लाल चिखल 
मुव्ही - नवरदेव (Bsc. Agri)  (2023)
लिरिक्स - रॉकसन
सिंगर- रॉकसन
बीट बाय - हृतिक कैलास कटके (खाकी )
कंपोज्ड बाय - रॉकसन & खाकी
म्युझिक ऑन - झी म्युझिक कंपनी



Lal Chikhal Song Lyrics | Marathi


लाल रक्त आटवूनी पिकवला माल
लाल लाल डोळ्यात पेटलाया जाळ
जगाचा पोशिंदा रोज बेदखल
स्वप्नांचा होतो त्याच्या लाल चिखल...

लाल रक्त, लाल चिखल, लाले लाल माती,
नंगा नाच जिंदगीचा, अन् ती फुटलेली छाती
आसुडाचा सपका पाठीवर अन् माथ्यावरती काठी
गिधाडांची भरली पोटं, आमच्या मढ्याला नाही माती
अश्रु पापणीत निजला, सदरा घामाने भिजला
आमच्या रक्ता मासाने, व्यापाऱ्यांचा खिसा सजला

घरावर पडला टेंबा तरी बळीराजा पुजला
उर फुटून गेला समदा हुंदका छाताडात निजला

या मातीच्या काळजात बळीराजा राहतो
जखमांनी माखतो अन् आसवात न्हातो
या धरणीच्या तळ हातावर जीव ठेवला
रक्ताचा घाम होतो आणि पाटामध्ये वाहतो...

या मातीच्या काळजात बळीराजा राहतो
जखमांनी माखतो अन् आसवात न्हातो
या धरणीच्या तळ हातावर जीव ठेवला
रक्ताचा घाम होतो आणि पाटामध्ये वाहतो...

या टाचेवरच्या भेगा आमच्या कष्टाचा पुरावा,
तरी व्यापाऱ्याच्या तालावर, आम्ही नाच का करावा...
या यातनांचा टाहो कुणी कसं ऐकना

जगाचं पोट भरणाऱ्याचा गळा का धरावा...
आम्ही शेतीत बियाण न्हाय, जीव पेरतो

त्या जीवाचा का किरकोळ मग भाव ठरतो
आमच्या कष्टाची किंमत का शून्य करता राव,
इथ जगण्यासाठी आम्ही रोज रोज मरतो.

जवा जत्रेमधे पोरगं करतं खेळणं घ्यायचं हट्ट
तवा खिश्यात हात घालून नुसते डोळे करतो घट्ट
रिकामा गळा बायकोचा काळजाला पिळ पाडतो,
भर उन्हात दिसतो अंधकार काळाकुट्ट...

या मातीच्या काळजात बळीराजा राहतो
जखमांनी माखतो अन् आसवांत न्हातो
या धरणीच्या तळहातावर जीव ठेवला
रक्ताचा घाम होतो आणि पाटामध्ये वाहतो...

या मातीच्या काळजात बळीराजा राहतो
जखमांनी माखतो अन् आसवांत न्हातो
या धरणीच्या तळ हातावर जीव ठेवला
रक्ताचा घाम होतो आणि पाटामध्ये वाहतो...

आयुष्याची माती होऊन ओंजळीत पडली
घराची झाली राख अन् ती वादळात उडली
पंचनामा पिकाचा का मढयाचा करता आमच्या
छाती वरती हात आपटून काळी आई रडली

काळ्या पेनाची शाई काळ्या कागदावर वतली
काळ्या रक्ताची गाठ काळ्या धमण्यात गुतली ...
मी टाचा खरडल्या अन् वाचा भरडल्या,
काळ्या मातीनं हाक काळ्या नभाला घातली.

किती सरकार आली, किती सरकार गेली
आमच्या उरावरती यांनी नुसता नाच केलाय...
किती औषधानी गेली, किती लटकून मेली
या सावकारांनी नुसता नुसता माज केलाय...

उन्हा तान्हात, थंडी वाऱ्यात, माती मधे खपतो
अर्ध्या रात्री मोटरा चालू कराय जीव जातो आमचा.

MRP वर मॉल मधे शॉपिंग करता राव,
अन् दहा रुपयाच्या भाजीसाठी जीव जातो तुमचा...
जरा लाज वाटू द्या स्वतःच्या वागण्याची,
स्वार्थासाठी आयुष्य हे जगण्याची!

त्यात तुमची पण काय चूक, तुम्ही सवयीचे गुलाम,
तुम्हाला सवय झालीय सरणं आमची बघण्याची

तरी शेतकरी असल्याची लाज नाय मित्रा,
मला शेतकरी असल्याचा माजय
खांद्यावरती पेलतो अख्खा दुःखाचा डोंगर
अन् स्वाभिमानी वाघाची मिजाजय....

या मातीच्या काळजात बळीराजा राहतो
जखमांनी माखतो अन् आसवांत न्हातो
या धरणीच्या तळ हातावर जीव ठेवला
रक्ताचा घाम होतो आणि पाटामध्ये वाहतो...



हे पण वाचा :👇👇👇


तर मित्रानो आपण Lal Chikhal Song Lyrics बघितले. यामध्ये काही मिस्टेक असेल तर मला नक्की सांगा.आणि अन्य मराठी गाण्यांच्या लिरिक्स संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .

धन्यवाद !!!!!!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.