Lagin Ghatika Song Lyrics | आरती केळकर & वैशाली सामंत | सत्यशोधक
मित्रानो, आज या पोस्ट मध्ये आपण Lagin Ghatika Song Lyrics बघणार आहोत. हे गाणं सत्यशोधक या मराठी मुव्ही मधलं आहे. किशोर बाली यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत आणि आरती केळकर & वैशाली सामंत यांनी हे गाणं गायलेलं आहे. चला तर मग बघूयालगीन घटीका या गाण्याचे बोल -
सॉन्ग - लगीन घटीका
मुव्ही - सत्यशोधक (2024)
सिंगर- आरती केळकर & वैशाली सामंत
लिरिक्स - किशोर बाली
म्युझिक - अमित राज
म्युझिक ऑन - झी म्युझिक कंपनी
Lagin Ghatika Song Lyrics | Marathi
पानाफुलांच्या मांडवाखाली, पोर कोवळी हळदीत न्हाली
एक बाहुला एक बाहुली , आज रंगली जशी भातुकली
पानाफुलांच्या मांडवाखाली, पोर कोवळी हळदीत न्हाली
एक बाहुला एक बाहुली , आज रंगली जशी भातुकली
लगीन घटिका समीप आली , जीव बावरा झाला ग
नकळत बाई सखा जीवाचा , जीवनात या आला ग
लगीन घटिका समीप आली , जीव बावरा झाला ग
नकळत बाई सखा जीवाचा , जीवनात या आला ग
डगमग आल्या सख्या साजिऱ्या,
हसत खिदळत आईल्या
सनई अन चौघड्या सवे हि झाली लगीन घाई ग
सासरच्या उंबरठ्यावरती , आज पाऊले थरथरती
माहेराच्या आठवणींनी मनास आले ग भरुनी
पापण्यातला गहिवर ओला , दावू कशी कोणाला ग
नकळत बाई सखा जीवाचा , जीवनात या आला ग
अल्लड अवखळ ऋतू हासरा , देऊन गेला भूल ग
अल्लड अवखळ ऋतू हासरा , देऊन गेला भूल ग
देहावरती उमलून आले , तारुण्याचे फुल ग
पाटीवरती बाराखडीचे टिपू दे चांदणे चांदणे
अक्षर वाटे घेऊन हाती हृदयाशी बांधले
रिमझिम आल्या सरी सुखाच्या
त्यात जन्म हा न्हाला ग
नकळत बाई सखा जीवाचा ,
जीवनात या आला ग
हे पण वाचा :👇👇👇
तर मित्रानो आपण Lagin Ghatika Song Lyrics बघितले. यामध्ये काही मिस्टेक असेल तर मला नक्की सांगा.आणि अन्य मराठी गाण्यांच्या लिरिक्स संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .
धन्यवाद !!!!!!!
Post a Comment