Gaav Sutana Song Lyrics In Marathi | Boys 4 | गाव सुटना
सॉन्ग -गाव सुटना
मुव्ही- Boys 4 (2023)
लिरिक्स - गणेश आत्माराम शिंदे
सिंगर - प्रथमेश गायकवाड
कंपोज्ड बाय - अवधूत गुप्ते
म्युझिक ऑन - एव्हरेस्ट मराठी
Gaav Sutana Song Lyrics | Marathi
काय सांगू राणी मला गाव सुटना....
कास सांगू राणी मला गाव सुटना...
काय सांगू राणी मला गाव सुटना...
कसं सांगू राणी मला गाव सुटना.....
बंद गळ्यामंदी माझं मावना ग अंग
जीन्स च्या कपडा मंदी दुनिया झाली कशी तंग
जो तो आहे राणी आपल्या धुंदीमध्ये दंग
माणसांनी माणसांचे सोडले का रंग
म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना ....
काय सांगू राणी मला गाव सुटना ....
काय सांगू राणी मला गाव सुटना .....
कसं सांगू राणी मला गाव सुटना....
पारी आली सरी गेली झाली त्याची तारी
पडव्याच्या ढिगाऱ्यात पाटी राहिली कोरी
कॉलेजाच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी
आपच्या चिपऱ्या कपड्यामंदी फिरती साऱ्या पोरी
हित म्हातारीच्या डोईवरला पदर हटना
काय सांगू राणी मला गाव सुटना...
काय सांगू राणी मला गाव सुटना....
कसं सांगू राणी मला गाव सुटना.....
शहरातली गाडी बघा धुमच गाणं गाती
भावनांनी भावनांशी तोडली का नाती
ओल्याचिंब पावसात ओलीचिंब माती
शारदाच्या चांदण्यात भिजल्या का ग राती
सर्जा राजाची ग जोडी माग हटना .....
काय सांगू राणी मला गाव सुटना .....
काय सांगू राणी मला गाव सुटना .....
कसं सांगू राणी मला गाव सुटना.....
गावाकडची माणसं आमची कशी साधी भोळी
प्रेमाच्या या रंगामध्ये रंगते आमची होळी
दिवाळीच्या सनामंदी जमली ही मंडळी
सुरसुरीच्या सुरामंदी चाखू पुरणपोळी
चुलीवरच्या भाकरीची चव ही सुटना
काय सांगू राणी मला गाव सुटना.....
हो शहरातली पोर कशी साहेब झाली
गावाकडली पोर आता पराखाली आली
मास्तरांच्या ठेक्यावती शाळा आमची सुटली
राम्याच्या गुत्त्यावर बाटली कशी फुटली
शांतेच कार्ट अजून दहावी सुटना...
काय सांगू राणी मला गाव सुटना...
काय सांगू राणी मला गाव सुटना....
कसं सांगू राणी मला गाव सुटना....
हे पण वाचा 👇👇👇
- Bharajari Ga Pitambara Song Lyrics
- Darav Darav Song Lyrics
- Bhingori Song Lyrics
- Mushaphira Song Lyrics | Hee Anokhi Gaath
धन्यवाद !!!!!!!!!
Post a Comment