Bharajari Ga Pitambara Song Lyrics | श्यामची आई(2023) | ऋचा बोन्द्रे
नमस्कार मित्रानो , या पोस्ट मध्ये आपण Bharajari Ga Pitambara Song Lyrics बघणार आहोत. हे श्यामची आई या मराठी मुव्ही मधलं गाणं आहे. आणि हे ऋचा बोन्द्रे यांनी म्हटल आहे. प्रल्हाद केशव अत्रे यांनी या गाण्याचे लिरिक्स लिहिले आहेत. चला तर मग बघुया भरजरी ग पितांबर या गण्याचे बोल -
सॉन्ग -भरजरी ग पितांबर
मुव्ही- श्यामची आई (2023)
लिरिक्स - प्रल्हाद केशव अत्रे
सिंगर - ऋचा बोन्द्रे
म्युझिक - अशोक पत्की
म्युझिक लेबल - पनोरमा म्युझिक
Bharajari Ga Pitambara Song Lyrics
भरजरी ग पितांबर दिला फाडून
द्रौपदीसे बंधू शोभे नारायण
द्रौपदीसे बंधू शोभे नारायण
सुभद्रा कृष्णाच्या पाठीशी बहीण विचाराया गेली
नारद म्हणून .........
बोट श्रीहरीचे कापले ग बाई
बांधायला चिंधी लवकर देई
सुभद्रा बोलली
सुभद्रा बोलली
शांदुणी पैठणी फाडून का देऊ
चिंधी तुम्हासनी .....
पाठची बहीण झाली वैरीण
द्रौपदीसे बंधू शोभे नारायण
द्रौपदीसे बंधू शोभे नारायण
द्रौपदी बोलली हरीची मी कोण ??
परी मला त्याने मानली बहीण
परी मला त्याने मानली बहीण
काळजाची चिंधी फाडून देईल
एवढे त्याचे माझ्यावरी ऋण
वसने देऊन प्रभू राखी माझी लाज
चिंधी साठी आला माझ्या दारी हरी आज
चिंधी साठी आला माझ्या दारी हरी आज
त्रैलोक्य मोलाचे वसन दिली फाडून
द्रौपदीसे बंधू शोभे नारायण
द्रौपदीसे बंधू शोभे नारायण
प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण
जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण
रक्ताच्या नात्याने उपजेना प्रेम
पटली पाहिजे अंतरीची खून
धान्य तोचि भाऊ
धान्य ती बहीण
प्रीती जी खरी ती जगाला भाविन
चिंधी पाहून हरी झाले प्रसन्न
द्रौपदीसे बंधू शोभे नारायण
द्रौपदीसे बंधू शोभे नारायण
द्रौपदीसे बंधू शोभे नारायण
हे पण वाचा 👇👇👇
- Bhingori Song Lyrics
- Chadi Lage Cham Cham Song Lyrics
- Khara To Ekachi Dharma Song Lyrics
- Chadi Lage Cham Cham Song Lyrics
तर मित्रानो आज आपण Bharajari Ga Pitambara Song Lyrics बघितले . यामध्ये काही मिस्टेक असतील तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि मराठी लिरिक्स च्या पोस्ट साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की दया .
धन्यवाद !!!!!!!!!
Post a Comment