Header Ads

Diwali Kavita Marathi | दिवाळी वर आधारित कविता संग्रह


मित्रानो, दिवाळी आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच हा सण खूप खास असतो. त्यानिमित्तच आपण या पोस्ट मध्ये Diwali Kavita Marathi बघणार आहोत. कवितांबरोबरच आपण इथे काही चारोळ्या पण बघणार आहोत. दिवाळी वर आधारित चांगल्या चांगल्या कविता तुमच्यापपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी इथे केला आहे. चला तर मग बघूया दिवाळी कविता -

    Diwali Kavita Marathi
    Diwali Kavita Marathi


    दिवाळी कविता चारोळ्या


    १ )))))

    मनाच्या मातीची उजळो पणती
    नाती आणि माती तेजाळल्या
    जाणिवांना राहो वास्तवाचे भान
    वसो समाधान अंतरंगी
          -गुरु ठाकूर


    २ ))))))

    घेऊनि दिव्यांचा प्रकाश सोनेरी
    माळूनी गंध मधुर उटनांचा
    करा संकल्प सुंदर जगण्याचा
    गाठूनी मुहूर्त दिवाळी सणाचा


    ३ ))))))

    लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश
    होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश
    मिळो सर्वाना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश
    आज साजरा होवो आपला
    दिवाळी सण आज !!!!!!!!


    ४ ))))))))

    फुलांची रस चंदनाचा सुवास
    दिव्यांच्या रांगा, अंगानी रांगोळीचे सडे .......
    नवे पर्व विचार नवे
    पसरन्या नवं आकांक्षाचे धडे ..........


    ५ ))))))))

    स्नेहाचा सुगंध दरवरला,
    आनंदाचा क्षण आला
    सौख्य समृद्धी लाभो आपणास
    हीच ईश्वर चरणी प्रार्थना


    ६ ))))))

    लक्ष दिव्यांचे तोरण ल्याली
    उटण्याचा स्पर्श सुगंधी
    फराळाची लज्जत न्यारी
    रंगवलीचा शालू भरजरी
    आली आली दिवाळी आली



    दिवाळी कविता


    १ >>>-

    कोट्यवधी दिव्यांनी उजळून आसमंत
    अंधार भेदणारी आली पहा दिवाळी

    दृष्टी सुखावणाऱ्या रंगात रंगलेली
    रंगवली पहाया आली पहा दिवाळी

    कंदील टांगलेले रंगीत रोषणाई
    चाखायला मिठाई आली पहा दिवाळी

    आता प्रदूषणाचे उडवू नका फटाके
    अति शुद्ध श्वास घ्या आली पहा दिवाळी

    - शैलेश हिंदळेकर


    २>>>>-

    आज आहे दिवाळी श्रीमंतांची लख लख
    तर गरिबांची काटकसरी

    कुठे दिव्यांचा मळा
    तर कुठे फक्त एक ज्योती

    कुठे फटक्यांचा कल्ला
    तर कुठे गरिबांच्या आशा

    कुठे चमचमीत गोड धोड
    तर कुठे तुकड्यांची अपेक्षा

    नको लक्ष्मी माता सोन नान
    फक्त गरिबास एकवेळचे खाणं

    नको राहायला आज कुणी उपाशी
    प्रकाश कर प्रत्येकाच्या दाराशी

               - गणेश तायडे



    ३ >>>---


    ऊन सावल्या येतील जातील
    कोंब जपावे आतील हिरवे
    चला दिवाळी आहे
    ओंजळीत घ्या चार दिवे

    पहिला लावा थेट मनातच
    तरीच राहील दुसरा तेवत
    घरात आणि प्रियजनांच्या
    आयुष्यावर प्रकाश बरसत

    तिसरा असू दे इथे अंगनी
    उजेड आल्या गेल्यानां हि
    चौथा दिवा अशा ठिकाणी
    जिथे दिवाळी माहित नाही


    ४ >>>----

    दिवाळी मनात असते
    आकाशदिवे, पणत्या, रांगोळ्या
    पक्वांने, सजावट हि सगळी आनंदाची बाह्य रूप
    एकमेकांबद्दल मनातून वाटणाऱ्या
    भावनांची ती केवळ प्रतीक असतात
    खरी दिवाळी असते मनामनात .......
    आपल्याला एकमेकांबद्दल वाटणारा
    स्नेह , प्रेम , माया आपलेपणा
    हीच खरी दिवाळी मनामनांची ......!!!!!


    ५ >>>>-----

    लख्ख लख्ख रोषणाई दारी पणत्यांच्या ओळी,
    लाडू सांजोरी, फराळी सजे अंगानी रांगोळी

    शेत पिकाला रानात दान पडलं पानात
    भारे खाणाऱ्याच पोट, भारे देणाऱ्याची झोळी

    दारी झेंडूचं तोरण , गाय वासरू पूजन
    घाले पाहत दुरून, कुठे वासुदेव हाळी

    रूप लेऊन नवीन येई माहेरवाशीण
    तिला उटानचे स्नान, तिला पुरणाची पोळी

    पदे वर्षातून गाठ, पापण्यांचे ओले काठ ,
    भाऊबीजेला भावास जेव्हा बहीण ओवाळी

    संभार राबणाऱ्या घरातील लक्ष्मीला ,
    कुठे रेश्माचा शालू कुठे जरीची चोळी

    नाही शाळा , नाही क्लास , दोस्त जमलेले खास
    घाली हौदोस जोमात, बालगोपाळांचा टोळी

    लाल निळ्या पिवळ्या रंगी आतिषबाजीने
    जन्मे प्रकाश नभात होई अंधाराची होळी

    पडे चांदणं मनात आशा भरल्या क्षणात
    कुठे प्रसवे कविता ,कुठे जन्मयी चारोळी

    - विनय पाटील


    ६ >>>>--

    पुसटली उन्हाने अंगणात रांगोळी
    घरात राहिली पणती ती केविलवाणी

    कंदील बिचारा फडफडतो तो वाऱ्याने
    शेपट्या फाटल्या वाऱ्याच्या माऱ्याने

    फडताळामधूनी डबे झाले रिते
    लाडूचे तुकडे, चिवड्यामधील शिते

    रंगीत दिव्यांची मिताली सर्व झळाळी
    झगमगली आणि सरली आता दिवाळी

    - शैलेश हिंदळेकर


    ७ >>>>----

    लक्ष दीप उजळू दे
    दश दिशा रंगू दे
    तिमिर दात सरुनी
    दीप दीप झळाळू दे || १ ||

    दडून साऱ्या दुष्ट शक्ती
    स्वच्छंद आनंद दशदिशी
    घेऊ हर्ष उल्हास
    आली नरकचतुर्दशी ||२ ||

    संपेल चिंता दुःख
    द्या नैराश्य टाकून
    येईल ऐश्वर्य सुख
    करीत लक्ष्मी पूजन || ३ ||

    भाऊ बहीण प्रेम
    नाते जपते काळीज
    खुलवू भाव अमोलिक
    करू साजरी भाऊबीज || ४ ||

    तुटेल फुटेल चिंता
    सरेल दारिद्र्य आता
    उजळेल कोपराही
    दीपवंत तेजाळता || ५ ||

    - सचिन पु कुलकर्णी


    ८ >>>- ---

    दिवाळीची मौज

    छान छान चकल्यांचा कुरूकुरू घास
    मोतीचूर लाडवांचा दरवळे वास ..... !!!!

    आई मला येऊ दे ना आतल्या खोलीत
    जिथे फराळाचे डबे बैसले रांगेत ...... !!!!

    अगं किती पाहते नैवेद्याची वाट
    बाल ब्रम्हा देव असे हे तर नाही खोटं ...... !!!!

    देई देई लवकरी तुझा सारा खाऊ
    आशीर्वाद देऊ तुला पापा गोड देऊ ...... !!!!

    - डॉ. विजया लाड


    ९ >>>>----

    दादा निघाला सकाळी सारी तयारी करून
    डबे फराळाचे आणि थैल्या भेटीच्या घेऊन

    चार लाडक्या बहिणी चार गावात राहती
    भाऊबीजेला बिचाऱ्या वाट दादाची पाहती

    दिस दादाचा सारतो सारा प्रवासात आज
    पण लाडक्या बहिणी कुठे भेटतात रोज

    गर्दी वाढली गाडीला त्याने दमछाक होई
    पण बहिणी भेटता सारा शिणवटा जाई

    - शैलेश हिंदळेकर


    १० >>>>------

    आली दिवाळी

    दिव्या दिव्यांच्या लावून ओळी
    आली दिवाळी सोन पावली
    निळ्या सावल्या धुक्यातुनी

    दिवाळी आली न्हाउनी
    लाडू चिवडा फस्त करा रे
    फस्त करा रे चकली !!!!!

    फटाके तोटे उडवुया , फुलबाजा फुलवुया
    लख लख करती, चक चक करती
    रत्नदीप आभाळी !!!!!!

    सुख मागून देवाला,
    बहीण ओवाळी भावाला
    वेड्या बहिणीची वेडी
    माया जगातून आगळी !!!!!!!

    - डॉ. श्रीकांत नरुले


    ११>>>>----

    दिवाळी बालगीत

    फट फटका फुटला, धाम धमाका झाला
    लावा दिवा पणती, उजळू दे भिंती
    सण आला घर फराळाचं करा
    गूळ साखर हसली करंजीत बसली
    कुरकुरीत चकली पोटभर खाल्ली
    चंदनाचा पाट , सोनीयाचे ताट
    आली आली दिवाळी, बहीण भाव ओवाळी






    हे पण वाचा 👇👇



    तर मित्रानो तुम्हाला Diwali Kavita Marathi कशा वाटल्या ते मला कंमेंट मध्ये सांगा. इथे ज्या कवींची नावे मला नाही मिळाली त्यांचा उल्लेख मी नाही करू शकले त्यासाठी माफी असावी. अन्य लिरिक्स संबंधित मराठी पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .



    धन्यवाद !!!!!!!




     

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Blogger द्वारे प्रायोजित.