Header Ads

Maha Mrityunjaya Mantra In Marathi | महामृत्युन्जय मंत्र (मराठी )


मित्रानो , या पोस्ट मध्ये आपण Maha Mrityunjaya Mantra In Marathi बघणार आहोत . हिंदू धर्मामधील अतिशय शक्तिशाली अशा मंत्रांपैकी हा एक मंत्र आहे . हा मंत्र भगवान शिव यांना समर्पित आहे आणि या मध्ये भगवान शिवाची स्तुती केलेली आहे . मृत्युन्जय चा अर्थ होतो , मृत्यूवर किंवा मरणावर विजय मिळवलेला .

    हिंदू धर्मामध्ये खुप लोक भगवान शिवाला इष्टदेव मानतात आणि त्यांची खूप भक्ती सुद्धा केली जाते . या मंत्राचे आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्व आहे . आणि या मंत्राची खूप नावे आहे आणि प्रकार आहेत . जसे याला रुद्र मंत्र हि म्हटले जाते . रुद्र हे भगवान शिवाचे रागातील एक आहे .

    Maha Mrityunjaya Mantra In Marathi
    Maha Mrityunjaya Mantra In Marathi

     
    त्र्यंबक मंत्र हे सुद्धा याच मंत्राचे एक नाव आहे . यातला त्र्यंबक हा शब्द शिवाचे तीन नेत्र म्हणजे डोळे दर्शवतो . तसेच या मंत्राला संजीवनी मंत्र सुद्धा म्हटले जाते . कारण असे मानले जाते कि शरीरामधून निघून गेलेले प्राण परत आणण्याची क्षमता या स्तोत्रामध्ये आहे. चला तर मग बघूया महामृत्युन्जय मंत्र -

    Maha Mrityunjaya Mantra | Marathi


    || ॐ हौं जूं सः ॐ भू र्भुवः स्वः ||
    ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्
    उर्वारुकमिव बन्धनान्मृ त्योर्मुक्षीय मामृतात् 
    || ॐ स्वः भुवः भूः ॐ सः जूं हौं ॐ ||

    मंत्राचा अर्थ -

    हे ईश्वर , आम्हा भक्तांना या संसारचक्रामधून बाहेर काढा आणि अमरत्व द्या . आम्ही या संसारामधील सर्व बंधने सोडून तुझ्या चरणाशी येऊन अमर होऊ असं वरदान आम्हाला द्या .


    mrutunjay mantra marathi 


    Maha Mrityunjaya Mantra | English


    Om Hou Jun Sahaa Om Bhu Bhuvaa svhaa
    || Om Tryambakam Yajaamahe
    Sugandhim Pushtivardhanam
    Urvaarukamev Bandhanaat
    Mrutyurmokshiya Maamrutaat ||
    || Om Svahaa Bhuvahaa Bhu Om Sahaa Ju Hou Om ||


    महामृत्युंजय मंत्राचे फ़ायदे -


    • आपल्या जीवनातील कष्ट , दारिद्य या मंत्राच्या नियमित जप केल्याने नाहीसे होते आणि सौभाग्य आणि सुखाची प्राप्ती होते .
    • मृत्यूवर विजय मिळवणारा मंत्र असा हा मंत्र असल्यामुळे याचा जप केल्यामुळे कोणत्याही प्रकारचे भय , मृत्यूचे भय यापासून सुटका होते .
    • निरोगी आणि दीर्घयुष्याचीही प्राप्ती या मंत्राच्या जपामुळे होते .
    • आपल्या सर्व दुःखाचे निवारण करून मनाला शांती देणारा असा हा मंत्र आहे .


    हे पण वाचा :


    तर मित्रानो , आज आपण Maha Mrityunjaya Mantra In Marathi बघितले . या मध्ये आपण मंत्रासोबत त्याचा अर्थ आणि मंत्र जप करण्याचे फायदे पण बघितले . तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की विचार आणि अन्य भक्ती संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा नक्की भेट द्या .

    धन्यवाद !!!!!

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Blogger द्वारे प्रायोजित.