Maval Jaga Zala Ra Lyrics | Subhedar | मावळं जागं झालं रं
नमस्कार मित्रांनो , या पोस्ट मध्ये आपण Maval Jaga Zala Ra Lyrics बघणार आहोत . हे गान " सुभेदार " या मराठी मूव्ही मधल आहे. चला तर मग बघूया " मावळं जागं झालं रं " या गाण्याचे बोल -
सॉन्ग -मावळं जागं झालं रं
मूव्ही - सुभेदार (2023)
लिरिक्स - दिगपाल लांजेकर
वोकॅल्स - देवदत्त मनीषा बाजी , अवधूत गांधी
म्यूज़िक -देवदत्त मनीषा बाजी
म्युझिक लेबल - एवरेस्ट एंटरटेनमेंट
Maval Jaga Zala Ra Lyrics | Marathi
मावळं जागं झालं रं,
तांबडं फुटलं भगवं जी..
गुलामी अंधार फिटं…
सूर्य शिवबा उगवं जी..
मावळच्या मातीला जाग ही आली
तुमच्यापायी धरनी पावन जाली..
सह्याद्रीला आज येतीया जाग..
दख्खनचा गर्व ह्ये शिवाजी राजं..
हे सर्जा रं..
सोन्याच्या फाळानं शेतीची लेणी
कोरून काढी ह्यो मराठा मानी..
आधार जेयांचा मानी बळीराजं..
दख्खनचा गर्व ह्ये शिवाजी राजं..
शिवबा रं.. राजं रं.. मावळचं धनी
शिवबा राजं मर्दानी…
बिरुबा.. खंडुबा.. जोतिबा जो मनी
शिवबा तैसा मर्दानी..
काळाच्या ह्या.. भाळावरी
रेखियले भाग्य ऐसे तुम्ही..
जिजाईचा पुत्र असा
कनवाळू मायाळू राजं तुम्ही..
जीव प्रान वाहू पायी
संगती राहूया झुंजमंदी..
आशीर्वादे अंबाबाई..
शिवरायांना यश देई..
दुस्मन हा दबला हरला
मावळा जितला तुमचा राजं
मावळ जागं झालं रं..
मराठा ऐसा तुमचा बुलंद गर्जे घुमला राजं..
मावळ जागं झालं रं..
मावळं जागं झालं रं, तांबडं फुटलं भगवं जी..
गुलामी अंधार फिटं सूर्य सिवबा उगवं जी..
शिवबा रं.. राजं रं.. मावळचं धनी
शिवबा राजं मर्दानी…
बिरुबा.. खंडुबा.. जोतिबा जो मनी
शिवबा तैसा मर्दानी..
- Aale Marathe Lyrics In Marathi
- Baipan Bhari Deva Lyrics In Marathi
- Maza Shahu Raja Lyrics
- Afzal Khan Vadh Powada Lyrics In Marathi
हि पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏 !!!!!!!!!!!
Post a Comment