Header Ads

Aale Marathe Lyrics In Marathi | Subhedar | आले मराठे

 

नमस्कार मित्रांनो , या पोस्ट मध्ये आपण Aale Marathi Lyrics In Marathi बघणार आहोत .हे गान सुभेदार या मराठी मूव्ही मधील आहे . या गाण्याला सुवर्णा राठोड आणि देवदत्त मनीषा बाजी यांनी आवाज दिलेला आहे . चला तर मग बघूया " आले मराठे " या गाण्याचे बोल -


सॉन्ग - आले मराठे
मूव्ही - सुभेदार
सिंगर - सुवर्णा राठोड & देवदत्त मनीषा बाजी
लिरिक्स- दिगपाल लांजेकर
म्युझिक - देवदत्त मनीषा बाजी
म्युझिक ऑन - एवेरेस्ट मराठी




Aale Marathe Lyrics | Marathi 

हे अंबाबाईचा उदो
आरे अंबाबाईचा उदो
अंबाबाईचा उदो

हे रक्तामंदी उसळं तापता लाव्हा
शिवराय शब्दाची आन आम्हाला (2 times)
वैऱ्याच्या रक्तानं गड भिजवू
जिंकून नाचवू ध्वज भगवा

हे आदि न अंत अशा शिवाचे
त्रिशूळ आम्ही त्या भैरवाचे
आम्ही नीळकंठ विष पिऊन
मोडीतो वैऱ्याची मुंडकी मोजून

चंडीची ती प्यास मराठे
दुर्गेचे ते हास्य मराठे
वीजेला आडवा जाऊ नको रे
फाडून पल्याड जाती मराठे

रक्त अस्त्र वज्र ज्यांचे
वार घाव धन त्यांचे
ढाल तेगीची खण खण खण
मनी स्वराज्य दण दण दण

शिवरायांची आन मराठे
जिजामातेचा मान मराठे
तोडत जाती शत्रू सारा
भगवा छाताडात रोवी मराठे

आले मराठे आले मराठे
आदि न अंत अशा शिवाचे
मोडीतो वैऱ्याची मुंडकी मोजून
पातशाही झोडती असे मराठे (2 times)

उदो अंबाबाईचा..(3 times )
अंबाबाईचा

रामच हा
कलियुगी शिवराय रूपाने जो अवतरे आता
कृष्णच हा गीतेचा अर्थ रेखितो तेजाळ तलवारे आता
भीमच हा
बळ ज्याचे दळभारे
गजबळे रणधुळे रक्तजळे
वैरी पळे धक्क धिंग
काळ हा मृत्युचा

रक्ताने माखला, रणात धावला
रुद्रसम, शक्ती हस्ते अहं पातुं वीरकृते
त्रिशूल: रक्तस्नानं अहं कर्तुं तत्परिते

अग्नयः अरीमुण्डं भस्मं कर्तुम् रक्षाकृते
शूलीजातः मस्तक खड्गच्छिन्नं कर्तुं धर्म हिते

शं शं शं शं शं शं शंकराय रक्त अर्पण
रं रं रं रं रं रं रणधीराय स्वेद अर्पण
हं हं हं हं हं हं हनुमन्ताय प्राण अर्पण
कं कं कं कं कं कं कालिकाय मुण्ड अर्पण

नाद गुंजे दिगंबरा
डम डम डम डम डम डम डम डम डम

हे रक्तामंदी उसळं तापता लाव्हा
शिवराय शब्दाची आन आम्हाला
वैऱ्याच्या रक्तानं गड भिजवू
जिंकून नाचवू ध्वज भगवा

उदो अंबाबाईचा उदो (2 times )
अंबाबाईचा




हे पण नक्की वाचा 👇👇👇

मित्रांनो या पोस्ट मध्ये आपण Aale Marathi Lyrics In Marathi बघितले. नवीन मराठी गण्यांच्या लिरिक्स साठी पोस्ट साठी True Marathi Lyrics ला पुन्हा नक्की भेट द्या.

हि पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏 !!!!!!!!!!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.