Header Ads

Small Powada In Marathi Lyrics | शिवजी महाराज पोवाड़ा लिरिक्स

या पोस्ट मध्ये आपण Small Powada In Marathi Lyrics बघणार आहोत. इथे तुम्हाला शिवाजी महाराजनवरील दोन पोवाडे वाचायला मिळतील .


    👑👑 Small Powada Lyrics 

    In Marathi 👑👑


    1. आहो राजे हो

    || आहो राजे हो ||
    जी र राजे हो जी जी.....
    स्वराज्याचे बांधू तोरण..
    बांधू तोरण संधीपाहून कोंढाणा किल्ला घ्यावा ताब्यात ...
    अष्टमी मुहूर्त ठेवा ध्यानात जिजाबाई भरल्या राजगडात जी......

    ※ ※ ※ ※


    2. नवा आवेश

    आला नवा आदेश, बिजातुन स्फुरला नव अंकुर
    महाराष्ट्र देवता वाजवी, मंजूळ सनई दूर ॥ध्रु॥

    स्वागत करती दाहि दिशा या, ओवाळून आरति शिवाला ओवाळून आरति
    फितुरीचा तो खेळ हरविण्या संत थोर जागती आमचे संत थोर जागती
    जिजा माउली पुण्य उधळती राष्ट्रातील घरभर ॥१॥

    शौर्याचे रणशिंग फुंकुनी शूर दावितो बाणा अमुचा शूर दावितो बाणा
    शत्रूसंगे झुंज खेळतो सवंगडयासह राणा शिवबा सवंगडया सह राणा
    भव तापाचे संकट हरले सुख चाले तूर तूर ॥२॥

    गिरी शिखरातून नद्या वाहती भय सोडून खळखळ वाहती भय सोडून खळखळ
    अभयाचे वरदान मिळाले उसळून आले बळ तयांचे उसळून आले बळ
    नत मस्तक होवूंया शिवाच्या जाउन चरणावर ॥३॥

    भिमा कोयना काठावरली क्षेत्रे ही जागली आमुची क्षेत्रे ही जागली
    पंढरपुरच्या विठूरायाला शांत झोप लागली पहा हो शांत झोप लागली
    वारकर्‍यांच्या कंठा मधुनी घोष घुमे हर हर ॥४॥


    ※ ※ ※ ※


    3. बालशिवाजीचा पोवाडा


    ज्याची कीर्ति सार्‍या जगतांत । मृत्यु लोकांत दख्खन देशांत ।
    महाशूर शिवाजी अवतरला । हिंदुधर्माच्या रक्षणाला जी ||
    असुरांनिं सारा मुलुख पिडिला । मानिना कोणी देवाजीला
    ऋषींचा होम बंद पडला । न्याय नाही जगामंदि उरला ।
    माय वळखिना लेंकराला । लागली चिंता महादेवाला ।
    इचार केला बसुनि कैलासाला । दैत्यांचा मोड करायाला ।
    अवतार शिवाजीला झाला । गा व्हय म्हन दादा, दादा रजी र दा जी ॥ १॥

    गोरगरिबांचा कैवारी । राजा अवतारी ।
    असा श्रीहरी । देशाचा पालनवाला ।
    धांवुन येणारा संकटाला । जशि काय माय लेकराला ।
    तसा तो शिवबा धनि आपुला । वाघ दख्खनचा जागा जाला ।
    करावं साह्य त्येला । वैर्‍यांच्या भुलून संपत्तीला ।
    लाळ भलत्याचिच घोटायला । लाज कशी नाहीं मुरदाडाला ।
    पेटवा आपुल्या जिनगानीला । गा व्हय म्हन दादा ॥२॥

    शिवबाची खरी बहाद्दरी । कोकण हेटकरी, घेऊनि बरोबरी ।
    दिली त्यांना घोडीं बसायाला । शिलेदार करुनि बरोबरिला ।
    झेंडा मराठयांचा फडकविला । राज्याचा पाया तोचि पहिला ।
    घ्यावा म्हणू चाकणचा किल्ला । नरसाळा फिरंगोजी तिथला ।
    गडकरी शूर लढनेवाला । शिवबानं जागविलं त्येला ।
    वळविला तसल्या बहाद्दराला । पेटवा तुमच्या जिनगानीला ।  ॥३॥

    म्हणे शूर मर्द फिरंगोजी । मराठी गाजी, अकलेची भाजी,
    तुझ्या कशि झाली ? सांग मजला । दास वैर्‍याचा कसा बनला ?
    जात गोत धरम बुडवायाला । गेल्या तरि कुठं तुमच्या अकला ?
    इसरला कुठं इरसरीला । द्या कि आया बहिणी दुस्मानाला ।
    लाज नाहीं मिशा बाळगायला । शूरपणा कुठं तुमचा गेला ?
    हिजडयावानि काय जलम असला । थूं तुमच्या जिनगानीला ।
    गा व्हय म्हन दाद, दादा, र जी ॥ ४ ॥

    ज्याला नाहीं जातीची चाड, मुलूख तो द्वाड, कुत्रा खादाड ।
    दुष्टाच्या जिनगानीला भूलला । कुळी नरकांमंदि घालायाला ।
    कशापायीं घ्यावा जलम असला । सांगावं काय निलाजर्‍याला ।
    धरम किर खास तुमचा बुडाला । लांचावलास कुत्र्या तुकडयाला ।
    धरति किर तुमच्या बायकांला । ओढून नेतात रंगमहालाला ।
    त्यांचा हंबरडा ऐकायला । कसा येईल रानदांडग्याला ।
    थूं तुमच्या जिनगानीला ॥५॥

    शिवबाच्या पायिं लागुनी, फिरंगोजी म्हणी, आपुल्यावानी ।
    आमाला गुरु नाहीं मिळाला । कुणाला ठावं धरम कसला ।
    वाघाचा बच्चा असुनि त्येला । मेंढरामंदीच वाढविला ।
    म्हणून जातीचा विसर पडला । झालो चाकर बघा आपुला ।
    फिरुन गड सारा त्येनं दावला । म्हणा हो अपुला आतां किल्ला ।
    बोलून गड दिला शिवाजीला । फिरंगोजी चढला लौकिकाला ।
    भाऊपणा शिवाजीसी केला ॥६॥

    ※ ※ ※ ※




    हे पण वाचा 👇👇👇


    या पोस्ट मध्ये आपण Small Powada In Marathi Lyrics बघितले. अश्याच मराठी लिरिक्स साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की दया .

    धन्यवाद !!!

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Blogger द्वारे प्रायोजित.