Header Ads

Shivaji Maharaj Song Lyrics In Marathi | शिवाजी महाराजांवर आधारित गाणी



नमस्कार मित्रांनो आज या पोस्ट मध्ये आपण Shivaji Maharaj Song Lyrics In Marathi बघणार आहोत. शिवाजी महाराजांचे नावच पुरेसे आहे महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशात त्यांनी आपली कीर्ती गाजवली. अशा या महाराजांचे काही सुंदर गाणी आपण या पोस्ट मध्ये बघणार आहोत. तर पोस्ट तुम्ही पूर्ण वाचा चला तर मग वळूया गाण्यांकडे -

    1. शोधू कुठं रं सॉन्ग लिरिक्स


    शोधू कुठं रं , धावू कसं रं ??
    मीच स्वतःला पाहू कसं रं ??
    या मावळ्यातून मावळून तू कधीच गेला रं !!
    माझ्या राजा रं , माझ्या शिवबा रं

    माझ्या राजा रं , माझ्या शिवबा रं
    माझ्या राजा रं , माझ्या शिवबा रं
    माझ्या राजा रं , माझ्या शिवबा रं

    शोधू कुठं रं , धावू कसं रं ??
    मीच स्वतःला पाहू कसं रं ??

    श्वास हे गहाण , श्वास हे गहाण
    बदलले किती जन्म मी ,
    पायाची वाहन होऊ दे एकदा तरी !!

    डोळे मिटून घेतो मी तुझ्यापाशी येतो
    डोळे मिटून घेतो मी तुझ्यापाशी येतो

    मंडी तुझी दे रे एकदा माझ्या उशाला रं
    माझ्या राजा रं , माझ्या शिवबा रं

    माझ्या राजा रं , मझ्या शिवबा रं
    माझ्या राजा रं , माझ्या शिवबा रं
    माझ्या राजा रं , माझ्या शिवबा रं

    शोधू कुठं रं , धावू कसं रं ??
    मीच स्वतःला पाहू कसं रं ??

    〰〰〰*-*-*-------------------〰〰〰---------------------*-*-*〰〰〰


    आता आपण शिवबा राज सॉन्ग लिरिक्स बघणार आहोत. हे गाणं शिवरायांचा छावा या मराठी मुव्ही मधलं आहे. दिगपाल लांजेकर यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत आणि अवधूत गांधी यांनी हे गाणं गायलेलं आहे. चला तर मग बघूया शिवबा राज या गाण्याचे बोल -


    सॉन्ग - शिवबा राज
    मुव्ही - शेर शिवराज (2022)
    सिंगर- अवधूत गांधी
    लिरिक्स - दिगपाल लांजेकर
    म्युझिक - देवदत्त मनीषा बाजी
    म्युझिक ऑन - झी म्युझिक कंपनी


    2. शिवबा राज सॉन्ग लिरिक्स 



    मावळ आम्ही वादळ आम्ही
    आर मरणाचा भी काळ आम्ही

    रण मस्तांची जात आमची
    आर भ्या कुणाला दावतो र

    प्रीत तलवारीशीनातं हे मातीशी
    खाकर सरनावरची रोज र खायाची

    रयतेचा राजा त्यो आम्ही हात र तयाच
    झिकत नाही जवर तवर झुंजत रहायचं

    तुकडे तुकडे झाले तरी बी
    कणा कणान झुजतो र

    हे मेल्या मना जाग यावी अशी त्याची भाषा र
    मराठी या मातीची त्योच हाय आशा र

    दुष्मनाला धाक देई शिवरायांच नाव र
    हे शंभु-शंकराच नव राजंगड धाव र

    शिवबा राजं शिवबा राजं
    शिवबा राजं राजा रं

    हे हिथ पाय ठेवण्या आंदी
    इचार दोस्ता कर बरं

    कन कन रुद्र बनला शिवरायांचा आधार
    वाऱ्याचा ह्यो वणवा कसा कसा तुला झेपलं

    मराठा ह्यो आत्ता
    मराठा ह्यो आत्ता
    हुबी बादशाही ठोकल

    〰〰〰*-*-*-------------------〰〰〰---------------------*-*-*〰〰〰


    आपण राजं आलं राजं आलं सॉन्ग लिरिक्स बघणार आहोत. हे गाणं पावनखिंड या मराठी मुव्ही मधलं आहे. दिगपाल लांजेकर यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत आणि अवधूत गुप्ते यांनी हे गाणं गायलेलं आहे. चला तर मग बघूया राजं आलं राजं आलं या गाण्याचे बोल -


    सॉन्ग - राजं आलं राजं आलं
    मुव्ही - पावनखिंड (2022)
    सिंगर- अवधूत गुप्ते
    लिरिक्स - दिगपाल लांजेकर
    म्युझिक - देवदत्त मनीषा बाजी
    म्युझिक ऑन - एवरेस्ट मराठी


    3. राजं आलं राजं आलं सॉन्ग लिरिक्स


    राजं आलं राजं आलं
    जिंकुनिया जगभरी

    शिवबा राजं नाव गाजं जी 
    पानी गातं वारं गातं
    गानं आभाळा भरी

    शिवबा राजं डंका वाजं जी
     कडाड वाजं मराठी ईज

    गनीम भ्या हे मनी खातों जी
    कंचा गड भी करुद्या माज

    आमच्या वारानं ढासळती
     हे माझ्या राजा रं
    हे माझ्या शिवबा रं 
    देवा आमचं रगात

    देवा तुझा निवेद
    देवा तुझ्या चरनी व्हातो

    आमचं हे आसुद देवा ह्या जुझात
    देवा लढू जोमात

    भंडारा हो भाळी माखु
    उफानलं रगात ह्येच 
    मागनं राजं तुम्हाला

    जीव तुमचा पायी व्हातो जी
    झुंजा मंदी तुमच्या संगती
    मर्द मावळा लढतो जी

    〰〰〰*-*-*-------------------〰〰〰---------------------*-*-*〰〰〰


    Shivaji Maharaj Song Lyrics In Marathi 

    आपण बघतोस काय मुजरा कर या मुव्ही चे टायटल ट्रॅकचे लिरिक्स बघणार आहोत. दिगपाल लांजेकर यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत आणि अवधूत गुप्ते यांनी हे गाणं गायलेलं आहे. चला तर मग बघूया बघतोस काय मुजरा कर या गाण्याचे बोल -


    सॉन्ग - बघतोस काय मुजरा कर
    मुव्ही -बघतोस काय मुजरा कर (2017)
    सिंगर- सिद्धार्थ महादेवन
    लिरिक्स - क्षितिज पटवर्धन
    म्युझिक - अमित राज
    म्युझिक ऑन - एवरेस्ट मराठी


    4. बघतोस काय मुजरा कर सॉन्ग लिरिक्स


    तुझ्या किर्तीच कथन, आम्ही पुसलं कव्हाच
    तुझ्या गडाचे दगड,  कधी येऊन तू वाच

    कसे विसरतो रे आम्ही
    आम्हा साऱ्यांचा तू बाप

    मनामधी नाही भाव
    तरी पुजतो रे तुलाच

    घडू दे नवी हि कथा आता राजा
    रचू दे नवा इतिहास

    तुझ्या गडांची हि व्यथा आता राजा
    कळू दे साऱ्या जगास ताठ होती माना

    उंच होतील नजरा
    या रयतेच्या राजाला

    मानाचा मुजरा बघतोस काय मुजरा कर
    बघतोस काय मुजरा कर तुझ्या मातीचा आदर

    माझ्या मातीत फुलू दे
    मला तुझ्यातच राजा
    तुला माझ्यात रुजूदे

    तुझ्या नजरेची ज्वाला
    पेटूदे माझ्या मनात
    हीच रयत करील
    तुझ्या गडाची राखण

    घडू दे नवी हि कथा आता राजा
    रचू दे नवा इतिहास
    तुझ्या गडांची हि व्यथा आता राजा
    कळू दे साऱ्या जगास

    〰〰〰*-*-*-------------------〰〰〰---------------------*-*-*〰〰〰


    आपण वीर मराठे सॉन्ग लिरिक्स या बघणार आहोत . श्रेयस जाधव यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत आणि त्यांनीच हे गाणं गायल देखील आहे. चला तर मग बघूया वीर मराठे या गाण्याचे बोल -

    सॉन्ग - वीर मराठे
    सिंगर, रॅपर - श्रेयस जाधव
    लिरिक्स - श्रेयस जाधव
    म्युझिक - हर्ष करण आदित्य
    लेबल - एवरेस्ट मराठी


    5. वीर मराठे सॉन्ग लिरिक्स 


    मर्द मावळे आम्ही मराठी
    भीती ना आमच्या कधी मनाशी
    आई भवानी सदैव पाठी

    नवीन बळ ती देती अमहासी, 
    जय भवानी ........ जय शिवाजी .......

     आभाळाला हात टेकूनी मन हे आमचे मातीत
    आभाळाला हात टेकूनी मन हे आमचे मातीत आहे ....

    मोडेल पण झुकणारी नाही स्वाभिमान जातीत
    मोडेल पण झुकणारी नाही स्वाभिमान जातीत ....

    काय सांगू महाराजांचे अशे किस्से आहे किती
    अरे काय सांगू भाऊ महाराजांचे किस्से आहे किती ...

    शुर आम्ही सरदार आम्हांला काय कोणाची भीती
    शुर आम्ही सरदार आम्हांला काय कोणाची भीती...

    शुर आम्ही सरदार आम्हांला काय कोणाची भीती
    शुर आम्ही सरदार आम्हांला काय कोणाची भीती .....

    स्वराज्य ची रीत आम्ही वीर मराठे
    विधी चे लिखित आम्ही वीर मराठे

    नाही कुणाला भीत आम्ही वीर मराठे
    वीर मराठे आम्ही वीर मराठे
    एक मराठा हो लाख मराठे

    Rap - 
    here we go Yo...

    भगवे आमचे रक्त भगवा आमच्या मनात
    शिवाचे हे भक्त आम्ही वीर असतो रणात

    खंबीर आमचे सामर्थ्य चुकून पण मोडणार नाही
    वाकड्यात जाईल आमच्याशी जो 
    त्याला आम्ही सोडणार नाही

    खोडणार नाही, आमच्या हृदया वरची नावा
    शिवबा शंभू बाजी यांच्या सारखा बनाव ...

    एकाच गर्व आणि एकाच खाज
    मराठी हे पर्वा मराठी हा माज

    स्वराज्य साठी लढले धरती वर जे पडले
    त्याग करून सुखाचा मराठे हे घडले

    वीर मराठे भाई सर्वांवर भारी
    वाऱ्या सारख्या सुसाट आमच्या तलवारी

    अहो वारी असो बारी असो
    सोमोर दुनिया सारी असो
    वाघ ची हे जात सोमोर कोण शिकार असो

    किती आले किती गेले मुगल इंग्रज त्यांचे चेले
    मराठ्यांचा तलवारीने किती जण जीवाशी गेले
    असो कुठला राजा किंवा असो कुठली राणी

    असो खराब वेळ किंवा आणीबाणी
    मोडलं पण झुकणारी नाही मराठ्यांचा जुबानी ... yeah
    मोडलं पण झुकणारी नाही मराठ्यांचा जुबानी ... Aah
    मोडलं पण झुकणारी नाही मराठ्यांचा जुबानी ... Yow

    महाराष्ट्रा ची शान आम्ही वीर मराठे
    अख्या दुनियेत महान आम्ही वीर मराठे
    करू सर्वांचे कल्याण आम्ही वीर मराठे
    गड किल्याची लाज राखू वीर मराठे

    एक मराठा हो लाख मराठे
    एकसाथ ...

    स्वराज्य ची रीत आम्ही वीर मराठे
    विधी चे लिखित आम्ही वीर मराठे
    नाही कुणाला भीत आम्ही वीर मराठे
    वीर मराठे आम्ही वीर मराठे

    (शिवाजी महाराज घोषणा )
    प्रौढ प्रताप पुरंदर
    क्षत्रियकुलवतुंस
    सिहासंधिश्वर
    महाराजाधिराज
    योगीराज
    श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की .... जय .....
    मर्द मावळे आम्ही मराठी
    जय भवानी जय शिवाजी
    भीती ना आमच्या कधी मनाशी

    जय भवानी जय शिवाजी
    आई भवानी सदैव पाठी
    जय भवानी जय शिवाजी
    नवीन बळ ती देती अमहासी,
    जय भवानी जय शिवाजी

    〰〰〰*-*-*-------------------〰〰〰---------------------*-*-*〰〰〰


    आपण भगवा झेंडा सॉन्ग लिरिक्स या बघणार आहोत . विष्णू थोरे यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत आणि योगेश खंदारे हे गाणं गायल देखील आहे. चला तर मग बघूया भगवा झेंडा या गाण्याचे बोल -


    सॉन्ग - भगवा झेंडा
    सिंगर - योगेश खंदारे
    लिरिक्स - विष्णू थोरे
    म्युझिक - योगेश खंदारे
    लेबल - एवरेस्ट मराठी


    6. भगवा झेंडा सॉन्ग लिरिक्स 


    राजे SSSSSSSSSS
    जय भवानी जय शिवाजी 
    जय शिवाजी जय भवानी 
    जी रं रामा, जी रं रामा, 
    जी रं रामा, जी जी जी जी रं रामा, 
    जी रं रामा, जी रं रामा, जी जी जी जी 

    सह्याद्रीच्या डोंगराचा शोभे वाघ खरा
     महाराष्ट्राच्या मातीला या शिवबाचा आसरा

     भगवा झेंडा... भगवा झेंडा... भगवा झेंडा...
    हाती धरा मराठी माणुस शोभल खरा... 

    भगवा झेंडा हाती धरा, मराठी माणुस शोभल खरा
    भगवा झेंडा हाती धरा, मराठी माणुस शोभल खरा
     जी रं रामा, जी रं रामा, जी रं रामा, जी जी जी... 
    जी रं रामा, जी रं रामा, जी रं रामा, जी जी जी जी... 

    छत्रपती शिवाजी महाराजांचा शवजय असो हे...
    मराठी मातीचा पुन्हा होवू दे गाजा वाजा
     जन्मा येईल शिवा होईल यगाचा राजा पुन्हा आईन sssssss
     पुन्हा आईन जिजाबाईन घडवावं रं लेकरा भगवा... 
    भगवा... भगवा... 
    भगवा झेंडा... भगवा झेंडा... भगवा झेंडा... 

    हाती धरा, मरामाणुसठी  शोभल खरा... 
    भगवा झेंडा हाती धरा, मराठी माणुस शोभल खरा 
    भगवा झेंडा हाती धरा, मराठी माणुस शोभल खरा 
    जी रं रामा, जी रं रामा, जी रं रामा, जी जी जी... 
    जी रं रामा जी रं रामा जी रं रामा जी जी जी जी... 

    हे ........... साधसूंतांच्या झाली स्पिााने श्रीमंत माती ....... 
    बोल गवाान तझी मदाानी फुलू दे छातीू शिवजोषान..... 
    हर हर महादेव शिवजोषान, 
    जयघोषान गर्जू दे इथली धरा शिवबा...
    शिवबा... शिवबा... जी रं रामा जी रं रामा जी रं
     रामा जी जी जी जी रं रामा जी रं
     रामा जी रं रामा जी जी जी जी

     भगवा झेंडा.... भगवा झेंडा.... भगवा झेंडा....
    हाती धरा मराठी माणुस शोभल खरा
     भगवा झेंडा हाती धरा, मराठी माणुस शोभल खरा
     भगवा झेंडा हाती धरा, मराठी माणुस शोभल खरा 
    राजा ssssssssssssssssss 
    रा sssssssss जा 
    रं रा sssssssss जा रं

    〰〰〰*-*-*-------------------〰〰〰---------------------*-*-*〰〰〰


    आपण शककर्ते शिवराय सॉन्ग लिरिक्स या बघणार आहोत . विष्णू थोरे यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत आणि शंतनू नंदन, विजय धुरी, सागर लेले, उपगणा पंड्या, योगिता दांडेकर बोराटे , सीमा लेले हे गाणं गायल देखील आहे. चला तर मग बघूया शककर्ते शिवराय या गाण्याचे बोल -

    सॉन्ग - शककर्ते शिवराय
    सिंगर्स -शंतनू नंदन, विजय धुरी, सागर लेले, उपगणा पंड्या, 
    योगिता दांडेकर बोराटे, सीमा लेले
    लिरिक्स - डॉ सदाशिवराव शिवडे
    म्युझिक - शंतनू नंदन हेर्लेकर
    लेबल - इंदूस मून मीडिया


    7. शककर्ते शिवराय सॉन्ग लिरिक्स 


    शककर्त्यांचा मेरुमणी तू राजर्षीचा राजा
    युगंधराचा योगी अन तू सामर्थ्याचा सरजा 

    शककर्त्यांचा मेरुमणी तू राजर्षीचा राजा
    युगंधराचा योगी अन तू सामर्थ्याचा सरजा

    महान मंदिर महाराष्ट्राचे सुफलित संचलित सह्याद्रीचे
    महान मंदिर महाराष्ट्राचे सुफलित संचलित सह्याद्रीचे

    संजीवन हो जनामनांचे , ए संजीवन हो जनामनांचे
    रयतेच्या रे तारणहारा पावित्र्याच्या तेजा
    युगंधराचा योगी अन तू सामर्थ्याचा सरजा

    सूर्य राज्य तू , चंद्र राज्य तू
    सूर्य राज्य तू , चंद्र राज्य तू

    समरराज तू , तीर्थ राज तू
    समरराज तू , तीर्थ राज तू

    राजयोग तू , त्यागयोग तू
    राजयोग तू , त्यागयोग तू

    वायुगतीने वीरश्री तव
    कीर्ती भेदी क्षितिजा
    युगंधराचा योगी अन तू सामर्थ्याचा सरजा

    तू रयतेचा रे कैवारू, तू पतितांचा रे तारू
    तू रयतेचा रे कैवारू, तू पतितांचा रे तारू

    तू दीनांचा रे सहकारु, तू दीनांचा रे सहकारु
    संतांची अन गुणिजनांची करिसी तू पूजा
    युगंधराचा योगी अन तू सामर्थ्याचा सरजा

    महाभारत घडले जेथे , महाभारत घडले जेथे
    रामायण घडले तेथे , रामायण घडले तेथे
    शिवभारत तेथे घडते , शिवभारत तेथे घडते
    रामकृष्ण हि तुझी दैवते , प्रताप दुर्गा तुळजा
    युगंधराचा योगी अन तू सामर्थ्याचा सरजा

    शककर्त्यांचा मेरुमणी तू राजर्षीचा राजा
    युगंधराचा योगी अन तू सामर्थ्याचा सरजा
    सामर्थ्याचा सरजा

    〰〰〰*-*-*-------------------〰〰〰---------------------*-*-*〰〰〰


    आपण श्वासात राजा ध्यासात राजा सॉन्ग लिरिक्स या बघणार आहोत . हे गाणं पावनखिंड या मराठी मुव्ही मधलं आहे. आणि अवधूत गांधी हे गाणं गायल देखील आहे. चला तर मग बघूया श्वासात राजा ध्यासात राजा या गाण्याचे बोल -


    सॉन्ग - श्वासात राजा ध्यासात राजा
    मुव्ही -पावनखिंड (2022)
    सिंगर- अवधूत गांधी , कोरस
    लिरिक्स - दिगपाल लांजेकर , देवदत्त मनीषा बाजी
    म्युझिक - देवदत्त मनीषा बाजी
    म्युझिक लेबल - एवरेस्ट मराठी


    8. श्वासात राजा ध्यासात राजा सॉन्ग लिरिक्स


    रणी धाव मार्तंड चांद तू प्रचंड धाव
    साहुनीया तांडव हे , कर तू धुंद शंकरा
    तिन्ही नेत्र जाळू दे अरी मुंड डम डम डम
    डमरू नाद डळमळे भूमंडळ आज हो शंकरा
    शंकरा ....

    रणी धाव मार्तंड चांद तू प्रचंड धाव
    साहुनीया तांडव हे , कर तू धुंद शंकरा
    तिन्ही नेत्र जाळू दे अरी मुंड डम डम डम
    डमरू नाद डळमळे भूमंडळ आज हो शंकरा
    हो ... ओ ... ओ ..
    शंकरा ....

    अरे आले रे आले रे अरे मराठे आले रे ......
    शान राजची घेऊन आता रणी निघाले रे ......
    आरं तुफान पेटलं ..... अन गनीम खेटल ....
    तर एकाच नाव हे शिवाचं घेतलं .....

    अरे आले रे आले रे अरे मराठे आले रे ......
    शान राजची घेऊन आता रणी निघाले रे ......
    आरं तुफान पेटलं ..... अन गनीम खेटल ....
    तर एकाच नाव हे आमच्या सिवबाच घेतलं .....

    श्वासात राज रं , ध्यासात राज
    घावात राज रं , भावात राज
    जगण्यात राज रं , मारण्यात राज
    हे ...... सिवबा रं

    श्वासात राज रं , ध्यासात राज
    घावात राज रं , भावात राज
    जगण्यात राज रं , मारण्यात राज
    हे ...... सिवबा रं

    〰〰〰*-*-*-------------------〰〰〰---------------------*-*-*〰〰〰



    हे पण वाचा 👇👇👇


    आपण Shivaji Maharaj Song Lyrics In Marathi बघितले. यामध्ये काही मिस्टेक असेल तर मला नक्की सांगा.आणि अन्य मराठी गाण्यांच्या लिरिक्स संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .

    धन्यवाद !!!!!!!


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Blogger द्वारे प्रायोजित.