Header Ads

सिंहासनी बैसले शंभू राजे सॉन्ग लिरिक्स | Kailash Kher | शिवरायांचा छावा



मित्रानो, आज या पोस्ट मध्ये आपण सिंहासनी बैसले शंभू राजे सॉन्ग लिरिक्स बघणार आहोत. हे गाणं शिवरायांचा छावा या मराठी मुव्ही मधलं आहे. दिगपाल लांजेकर यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत आणि कैलाश खेर यांनी हे गाणं गायलेलं आहे. चला तर मग बघूया सिंहासनी बैसले शंभू राजे या गाण्याचे बोल -


सॉन्ग - सिंहासनी बैसले शंभू राजे
मुव्ही - शिवरायांचा छावा (2024)
सिंगर- कैलाश खेर
लिरिक्स - दिगपाल लांजेकर
म्युझिक - देवदत्त मनीषा बाजी
म्युझिक ऑन - एवरेस्ट मराठी


सिंहासनी बैसले शंभू राजे लिरिक्स | Marathi



सिंहासनी रुद्र बैसलं शंभू राजं
शिवरायांच्या प्रिय रायगडी

पोरक्या या मातीचं रं डोळं पुसलं
नायक हा रयतेच्या मनी

रूपानं ह्याचा सारं आदित झकोळलं
तेज ते तेजाळलं डोळ्यातुनि

ऐशी ही ह्याची मती
वाऱ्याची थांबे गती

वैर्याला मात देती रणातूनी
रयतेच्या मनी हा संतोष दाटला

शंभूराजं आलं रं
हजारो कंठातून जयघोष घुमला

शंभूराजं आलं रं
शिवराय स्वप्नाचे नवे तेज

गगनात भगवा नाचे ध्वज
स्वराज्य शिरी हा नवा साज

पुन्यांदा अवतरलं रामराज
मावळ वीरांचा डंका वाजं

दिशादिशांना नावं गाजं
सवाई मल्हार त्ये शंभू राजं

जगणं सुखावलं
रोजच सन झालं

शंभूचं राज्य आलं रं
संतांचं ज्ञान आज

धर्माचं भान आज
शंभूनं दान दिलं रं सेना 
गर्जे धडक धडक देती

अश्व रगेने तडक फडक होती
तोफा जळती भडक भडक भीती

गनिमा बसते रे..
मावळची ती वाढे आशा

साम्राज्याची ती अभिलाषा
शंभूरूप ती भाग्य शलाका

भाळी उमटे रे..
घेवोनी अशी मुसंडी

शत्रूचे भान उडावे
रणी झुंज झुंज झुंजत

अन् धारातीर्थी पडावे..
मावळच्या दिलदारांचे

हे ब्रीद असे जन्माचे
रक्ताचे आहे मोल

दिधलेल्या निज वचनाचे..

असूदाने आहे भिजली
हर एक इथे तलवार

वीरांनी सजला आहे
नृप शंभूचा दरबार..

सूर्याच्या तप्त आभाळी
ही गरुडाची रे झेप

जाहला बघा संपूर्ण
नृप शंभूचा अभिषेक


हे पण वाचा 👇👇👇


तर मित्रानो आपण सिंहासनी बैसले शंभू राजे सॉन्ग लिरिक्स बघितले. यामध्ये काही मिस्टेक असेल तर मला नक्की सांगा.आणि अन्य मराठी गाण्यांच्या लिरिक्स संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .

धन्यवाद !!!!!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.