Navari Song Lyrics | Aditya Satpute | Mansi Survase | नवरी
मित्रानो, आज या पोस्ट मध्ये आपण Navari Song Lyrics बघणार आहोत. स्मिता कुलकर्णी, प्रसाद शिरसाट यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत आणि हर्षवर्धन वावरे , कस्तुरी वावरे यांनी हे गाण गायलेलं आहे. चला तर मग बघूया नवरी या गाण्याचे बोल -
सॉन्ग - नवरी
लिरिक्स - स्मिता कुलकर्णी, प्रसाद शिरसाट
सिंगर- हर्षवर्धन वावरे , कस्तुरी वावरे
म्युझिक - प्रसाद शिरसाट
म्युझिक लेबल - जगदंबा प्रोडक्शन्स
Navari Song Lyrics | Marathi
सोन्याची कांती आणि मोत्याचा रंग
तुझ्या ज्वानीचा ज्वर भरला
लचकत मुरडत चालली नार ,
जीव तिच्यात गुरफटला
सोन्याची कांती आणि मोत्याचा रंग
तुझ्या ज्वानीचा ज्वर भरला
लचकत मुरडत चालली नार ,
जीव तिच्यात गुरफटला
रात दिस देवा भर साकडं मी घालितो ,
भोळ्या शंभू देवाकडे तुला ग मी मागतो
भंडारा अतुझा मी अन तू सोन्याची ग जेजुरी
मी राशीत चढविणे तुला जेजुरीची पायरी ....
जेजुरीची पायरी ....
तुला सजून धजून नऊवारी नेसून,
मिरवीत आणीन ग
माझ्या आईची लाडकी सून तू,
तुला नवरी बनवीन ग
तुला सजून धजून नऊवारी नेसून,
मिरवीत आणीन ग
माझ्या आईची लाडकी सून तू,
तुला नवरी बनवीन ग
अल्लड वाऱ्यात मनाच्या
पाऱ्यात तुझाच ग रुपडं
पावसाच्या थेंबात पाखरांच्या
गाण्यात तुलाच मी जपलं
हळदीनं माखविन , सोन्यानं मढवीन,
रूपं सजवीन ग
माझ्या आईची लाडकी सून तू ,
तुला नवरी बनवीन ग
पहाट पहाट राणी सपान मी पाहिलं ,
तुझं माझं अंग सार हळदीनं माखलं
हो ..... पहाट पहाट राणी सपान मी पाहिलं ,
तुझं माझं अंग सार हळदीनं माखलं
हातावरली रेखीव मेंदी
करतात हिरवं काकण ,
गळ्यातलं रेशीम बंधन
बेल भंडारा खंडेराया
देवाच्या संगतीनं उडवीन ग
नऊ लाख पायरी गडाला
तरी मी तुलाच मिरवीन ग
तुला सजून धजून नऊवारी नेसून,
मिरवीत आणीन ग
माझ्या आईची लाडकी सून तू,
तुला नवरी बनवीन ग
तुला सजून धजून नऊवारी नेसून,
मिरवीत आणीन ग
माझ्या आईची लाडकी सून तू,
तुला नवरी बनवीन ग
चोरून चोरून बघताय काय ?
गालात खुद्कन हसताय काय ?
असं चोरून चोरून बघताय काय ?
गालात खुद्कन हसताय काय ?
जीव जडला राया तुझ्या जिव्हारी ,
स्वप्नात गप्प बाई बांधे जेजुरी
काळजाचं ढोल कसं धड धड वाजत ,
तुझ्या पिरतीच येड रात दिस लागत
रात दिस लागत
मी सजून धजून नऊवारी
नेसून मिरवीत येईन रे
माझ्या सासूची लाडकी सून
तुझी मी नवरी होईन रे
मी सजून धजून नऊवारी
नेसून मिरवीत येईन रे
माझ्या सासूची लाडकी सून
तुझी मी नवरी होईन रे
ओठावर दाटलंय डोळ्यात साठलंय
रूप तुझं रे साजणा
मनात भरलंय नाव तुझं कोरलंय
काळजात रे साजणा
हे पोरी सोन्याची कांती आणि मोत्याचा
रंग तुझ्या ज्वानीचा ज्वर भरला
लचकत मुरडत चालली नार,
जीव तिच्यात गुरफटला
हे पोरी सोन्याची कांती आणि मोत्याचा
रंग तुझ्या ज्वानीचा ज्वर भरला
लचकत मुरडत चालली नार ,
जीव तिच्यात गुरफटला
हे पण वाचा 👇👇👇
धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Post a Comment