Header Ads

मराठी हृदयस्पर्शी प्रेम कविता | Heart Touching Love Poems In Marathi


मित्रानो , प्रेम हि भावनाच खूप सुंदर आणि हळवी असते. आयुष्यामध्ये प्रत्येकालाच कधी ना कधी प्रेम हे होत असते. फरक फक्त एवढाच आहे. काहींना ते मिळते तर काहींना मिळत नाही , तर काहींमध्ये ते व्यक्त करण्याची हिम्मत नसते. हे असे प्रेम कधी पूर्ण होते तर कधी अपूर्णच राहून जाते. प्रेमाबद्दलच्या सुंदर भावना व्यक्त करणाऱ्या मराठी हृदयस्पर्शी प्रेम कविता आपण या पोस्ट मध्ये बघणार आहोत. ज्या कवितेच्या कवींची नावे माहित झाली आहेत त्यांचा उल्लेख इथे केला आहे पण ज्याची नावे माहित होऊ शकली नाहीत त्या बद्दल मी सांगू इच्छिते कि ज्यांनी कोणी ह्या कविता लिहिल्या आहेत त्याचे पूर्ण श्रेय हे मूळ कविलाच जाते.
चला तर मग वळूया प्रेम कवितांकडे -



    💝मराठी हृदयस्पर्शी प्रेम कविता💝


    इथे आपण प्रेमाच्या 10 सुंदर अशा मराठी कविता बघणार आहोत. बघा तुम्हाला त्या कशा वाटतात.

    1. तुझ्या हृदयाचा पल्ला गाठता गाठता

    तुझ्याशी झालेली मैत्री जपता जपता 👫
    मी स्वतःला तुझ्या प्रेमात पडताना पाहिलंय
    तुझ्या शोधात मागे फिरता फिरता
    मी स्वतःला तुझ्यात हरवताना पाहिलंय 👤

    तुझ्या एका भेटीची अपेक्षा करता करता ✋
    मी माझ्या अपेक्षांना भंग होताना पाहिलंय
    तुझ्या येण्याची वाट पाहता पाहता 👦
    मी माझ्या पावलांना
    ठेचकाळून पडताना पाहिलंय

    तुझ्या सहवासाची स्वप्न पाहता पाहता
    मी माझ्या स्वप्नांना तुटताना पाहिलंय💔
    तुझ्यासाठी झुरत जगता जगता
    मी स्वतःला एकटं मरताना पाहिलंय

    तुला माझं बनवता बनवता
    मी स्वतःला तुझं होताना पाहिलंय 💕
    तुझ्यावर जीवापाड प्रेम करता करता
    मी माझ्या जीवाला तुझ्यासाठी झुरताना पाहिलंय 〰〰

    तुझ्या जाण्याने स्वतःला सावरता सावरता
    मी तुझ्या आठवणींना
    हृदयात विखुरताना पाहिलंय💗
    तुझ्या आठवणींना गोळा करता करता
    स्वतःच्या हृदयाला विस्कटताना पाहिलंय💚

    तुझ्यासाठी नव्या कविता रचता रचता
    मी माझ्या कवितांना रडताना पाहिलंय😩
    तुझ्या हृदयाचा पल्ला गाठता गाठता
    मी माझ्या हृदयाला 💖
    जिवंतपणी जळताना पाहिलंय .......🔥🔥 !!!!!

    - सुमित



    2. तुझी खूप आठवण येते


    तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा प्रेम म्हणे काय ??
    हेच माहीत नव्हतं 💁
    पण तू आवडायला लागली तेव्हा
    ते माझ्याच डोळ्यात दिसू लागलं
    तू अगदी स्वप्नात यावी ना
    तशीच माझ्या आयुष्यात आलीस😃
    आणि या रानजोंधळ्याच्या
    आयुष्याला चकाकी दिली ✨

    तुझी आता मला जणू
    सवय झाली होती
    तुझ्याविना जगणं म्हणजे
    मला सजाच झाली होती 😑
    डोळे फक्त तुझीच वाट पाहत होते 👀
    खूप सारे स्वप्न होते आपल्या दोघांचे
    पण ........

    हृदयविकाराचा झटका यावा
    तशी तुझ्या लग्नाची बातमी आली 👸
    आणि तुझं नाही माहित मला काय झालं ??
    पण मला जिवंतपणीच मारून गेली😌😌

    मला तुझ्या लग्नात पाहण्यासाठी
    आतुर झाले असतील डोळे तुझे ही
    पण माफ कर ...... मी नव्हतो येऊ शकत 👦
    तुला दुसऱ्याच होताना बघायला

    जिथे असशील तिथे फक्त खुश राहा .... 😇😘
    ईश्वराजवळ एवढेच मागेल
    तू विसरशील कि नाही माहित नाही पण ......😓😓
    तुला विसरायला मला बरेच जन्म लागेल

    आज अचानक जुन्या फाईल मध्ये
    तुझी चिठ्ठी सापडली 🎫🎫
    आणि जुन्या आठवणींना
    एकदम उजाळा मिळाला
    वाटलं आज तू माझ्यासोबत हवी होतीस👫
    पण नाही कधी कधी नशिबासमोर
    हतबल व्हावंच लागतं
    असू दे ......
    पण आज तुझी खूप आठवण येते


    3. एक होकार दे फार काही नको

    एक होकार दे , फार काही नको  ✅✅
    फार काही नको , फक्त नाही नको  ❌❌

    एकदा दोनदा ठीक आहे सखे 😃😃
    तुझे लाजणे असे बारमाही नको 💃💃

    थेट स्पर्शातुनी बोल काहीतरी 💜💜
    गूढ शब्दातली नेहमी मौन ग्वाही नको 

    आपले भेटणे हीच एक कोजागिरी 🌕🌕
    मग चांदनेही नको , चांदवा हि नको 🌙🌜🌟🔥🔥

    - वैभव जोशी


    4. आठवण

    आठवण तर तुझी आजही येते,
    पण डोळ्यात पाणी देऊन जाते 😪😪
    कधी सावरते तर कधी बावरते ,
    पण परत येऊन तुझ्यावरच थांबते
    त्याच त्याच विचारात
    परत घेऊन जाते आणि 💑💑
    माझ्या गोड स्वप्नातही तुझ्याच
    वेड्यापिशा स्वप्नांना घेऊन येते 💞💞

    जेव्हा जाग येते मला तेव्हा
    माझ्या डोळ्यांसमोर परत तूच येतोस 👦👦
    अशी हि तुझी आठवण परत परत
    मला आभास तुझाच देऊन जाते
    अशी हि तुझी आठवण आली कि
    मग मी स्वतःला विसरते 💃💃
    अन पुन्हा एकदा तुझ्या
    आठवणीत हरवून जाते

    पण कधी तुला हि माझी आठवण येते का ??
    कधी मी हि तुझ्या स्वप्नात येते का ??
    या माझ्या प्रश्नांची उत्तर तर तुझ्याकडेच आहते ना .....
    पण वेड हे मन माझं ... मलाच पुन्हा पुन्हा विचारते 😟😕

    नाहीये माझ्याकडे उत्तर म्हणून
    मीच मला गप्प करते 😑
    डोळ्यातलं पाणी हळूच
    गालावरती येत आणि 😭
    पुन्हा तुझ्या आठवणीत मी हरवून जाते
    अशी हि तुझी आठवण
    मला सारखी सारखी छळते

    गोड क्षण आठवला कि मग हसवते 😍😂
    तू सोबत नाहीयेस आठवलं कि मग रडवते 😭
    अशी हि तुझी आठवण
    आठवण मला आजही येते
    आणि एकटं करून जाते .......... 💚💚



    5. पाहिलं प्रेम

    पाहिलं प्रेम कधीच विसरू शकत नाही
    का ??
    कारण खूपदा आपण ते व्यक्तच केलेलं नसत 💘💘
    ते व्यक्त केलं कि त्याच ओझं उतरत 😌😌
    प्रत्येकाला पहिल्यांदा प्रेमात पडलेल्या
    मुलीसोबत संसार करता येत नाही
    पण .....
    पण ती व्यक्ती कायमची तुमची झाली नाही
    तर काय बिघडलं ?? 😀😀
    ती अजूनही तुमच्या आयुष्यात आहे
    हो .......
    ती अजूनही तुमच्या आयुष्यात आहे
    खूप छान मैत्रीण म्हणून ...... 👧
    हि काय कमी ग्रेट फीलिंग आहे 😍😇


    6. प्रेम काही संपत नाही

    वेळ सरते , काळ सारतो पण प्रेम काही संपत नाही
    जवळची मानस बदलतात , नव्या आठवणी तयार होतात
    पण प्रेम काही विरत नाही

    प्रेम तर आयुष्यात साखरेसारखं मुरतं
    हळू हळू बहरत वाट पाहून थकत
    पण आस काही सोडत नाही

    एक वेळ सगळं विसरता येऊ शकत
    पण मनात असणारा त्या व्यक्तीचा चेहरा
    पुसटसाही डोळ्यांसमोरून जात नाही

    प्रेम .....
    प्रेम समजून केलं तर खूप सोपं आहे
    आणि न समजता केलं
    तर त्याहून अवघड कुठे काय आहे !!!!!



    7. तुला सोडून जाताना

    जसा व्याकुळ होतो ओंडका वाहून जाताना
    तसे काही तरी होते तुला सोडून जाताना

    जरी ह्या रोजच्या भेटी तरीही मारवा ओठी
    बिचारी सांज येताना , बिचारे ऊन जाताना

    पुढे माझी अशी खरी ओळख उरत नाही
    मला भेटून घेतो मी तुला भेटून जाताना

    रित्या परडीसहि येतो फुलांचा गंध नेमाने
    तसा मी घमघमत असतो तुला वेचून जाताना

    तुझ्या कादंबरीमधले खुणेचे पान होतो मी
    तुला वाचून जाताना , तुझ्यावाचून जाताना

    जसे कि दूरचे गाणे मनाचे स्वास्थ्यही नेते
    तशी पडतेस तू कानी जागाआडून जाताना

    - वैभव जोशी



    8. अंतर्मन सांगू पाही

    अंतर्मन सांगू पाही नको धावूस
    त्या पाषाणी हृदयापाठी ❤❤
    थांबणार नाही तो वळणार नाही तो 👦
    खडतर आहे रस्ता ...... पडशील खचशील
    अन मग राहशील मागे एकटी 💁💁

    मोल तुझ्या प्रेमाचं नाही
    कळणार त्याला कधी
    आहे स्वतःच्याच तो धुंदीत
    आहे स्वतःतच तो मग्न , तुझी तळमळ
    त्याला दिसणार नाही 😕😔
    त्याला आंही गरज तुझी
    नको होऊस नुसती कामापुरती

    नको गाळुस अश्रू नाही किंमत
    त्याला तुझ्या आसवांची 😪😪
    पाहतेस वाट त्याची तरी
    तुझ्याकडे तो फिरकणार नाही
    क्षितिजापल्याड गाव त्याच
    जिथे तुला निवारा नाही⛺⛺
    शहाणा तो तू त्याच्या मागे वेडी

    नुसत्या नावाने त्याच्या होते
    तू कावरी बावरी 😯😮
    व्यापलं जग सार तुझं त्याच्या अवतीभोवती
    आणि त्याच्या तू तर आठवणीत हि नाही 😔

    वाहत्या पाण्यात तो वाहणारा
    पोहता तुला येत नाही 🌊🌊
    आवर घाल स्वतःला हाती
    तुझ्या तो लागणार नाही
    समुद्रापरी तो किनारा
    त्याला भावत नाही 🌅🌅
    विसावला जरी येऊन तुझ्यापाशी
    तरी फार काळ त्याची सोबत नाही 😪😐

    - वर्षा


    9. शब्दात नाही सांगता येणार

    ऐक ना ......👧
     शब्दात नाही सांगता येणार .....💜
    डोळ्यातून समजून घेशील ना .....👀
    अस्वस्थ होईन जेव्हा मी
    तेव्हा धीर मला देशील ना ??

    माझ्याने नकळत दुखावले तुला तर
    माफ मला करशील ना ....😟
    ओघळले माझे अश्रू तर
    अलगद टिपून घेशील ना ??😘

    आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर
    हात माझा धरशील ना ??✋
    सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा
    विश्वास माझ्यावर ठेवशील ना ??😇😊

    चुकतोय मी असे वाटले कधी
    तर हक्काने मला सांगशील ना ??
    हरवलो मी कधी कुठे तर
    सावरून मला घेशील ना ??

    कितीही भांडलो आपण तरीही😐😒
    समोर आपल्यावर विसरून जाशील ना ??
    मी आता विसरणे शक्य नाही तुला
    तू मला लक्षात ठेवशील ना ??😍😍

    जीव तयार आहे तुझ्यासाठी
    गरज पडेल तेव्हा मागून घेशील ना ??
    मला तुझी गरज आहे हे 💛💛
    न सांगता ओळखशील ना ??

    आजवर तुझ्यासाठी
    काही नाही करू शकलो 👫
    पण माझ्यासाठी एवढे
    एक करशील ना ??

    तुझ्यासाठी मी कित्येकांपैकी असलो 💓💓
    तरी माझ्यासाठी तूच एक असशील ना ??



    10.  शाळेतील प्रेम

    हो आठवतंय प्रेम शाळेतील
    मलाही थोडं थोडं 💢💢
    त्या आठवणी रंग बेरंग होऊन
    उभे राहतात डोळ्यापुढे 👀
    ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटाप्रमाणे
    शाळेतील ती मैत्री कधी प्रेमात कधी 👫
    बदलली कळलंच नव्हतं

    फक्त तिनी वळून पाहावं
    आणि मी ते प्रेम समजावं 👩
    यापलीकडे आमच्यात
    कधी काय घडलंच नव्हतं 💛💛
    ती शाळेला रेगुलर ,
    मी दांड्या मारायचो
    तिचा होम वर्क पूर्ण 📖📖
    मी छड्या खायचो ✋✋

    तीच लक्ष फळ्याकडे
    आणि माझं तिचायकडे
    याचयापलीकडे आमच्यात
    कधी काय घडलंच नव्हतं
    ती मॉनिटर ... ती लिहायची
    गोंधळ करणाऱ्या मुलांची नाव 📃📃
    तीन लिहावं आपलाही नाव 😃😆
    म्हणून मी गोंधळ करायचो
    आणि माझं नाव वगळून
    ती साऱ्यांची नाव लिहायची
    फक्त यावरूनच तिच्या
    प्रेमाच्या फुलीचा मी अंदाज घ्यावा
    का यालाच प्रेम म्हणावं

    वर्गात सरांनी मला उभं केलं कि
    अक्ख्या वर्गाची नजर तिच्यावर असायची
    मी मात्र खाली मान घालून उभा राहायचो
    आमचं अबोल प्रेम शब्दांविना अपूर्ण होत
    भावनांसाठी ते खुलं होत
    परीक्षेच्या कालावधीत ते सून होत

    नकळत शाळेचे दिवस संपून गेले
    सेंड ऑफ ला अनावर झालेले
    अश्रू डोळ्याच्या पापनीमधून
    कधी निसटून गेले कळलेच नाही
    त्या दिवशी तिचा झालेला लालबुंद चेहरा
    माझ्या मनाच्या कोपऱ्यात अजूनही तसाच आहे

    शाळा संपली आणि कॉलेजला
    ती शहरात निघून गेली
    आणि मी वेडा माझं प्रेम मी
    त्या शाळेतच शोधत बसलो
    शाळेच्या शेवटच्या दिवशी
    तीन वळून पाहिलं होत
    आणि तो चेहरा कायमचा तसाच निघून गेला ,
    पुन्हा कधी न दिसण्यासाठी ............

    - सचिन वाघमोडे



    हे पण नक्की वाचा 👇👇👇




    तर मित्रांनो , आज आपण मराठी हृदयस्पर्शी प्रेम कविता बघितल्या. तुम्हाला त्या कशा वाटल्या आणि हे वाचताना तुम्हाला पण आपल्या प्रेमाची आठवण झाली का ते मला खाली कंमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अन्य पोस्ट साठी True Marathi Lyrics  ला पुन्हा भेट नक्की द्या .

    हि पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!!!!!




    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Blogger द्वारे प्रायोजित.