मराठी प्रेम कविता चारोळ्या | Premachya Charolya In Marathi
![]() |
प्रेम कविता चारोळ्या |
💓💓MARATHI PREM KAVITA💓💓
मनात तू आणि तुझाच विचार आहे
डोळ्यात लपलेला तुझाच भाव आहे 👱
ओठांचे वागणे आता कळत नाही 👄
कारण त्यावर आता तुझेच नाव आहे 👦
वाट पाहशील तर आठवण बनून येईन, 💛
तुझ्या ओठावर गाणे बनून येईन, 🎵
एकदा मनापासून मला आठवून तर बघ,
तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन .....😃😃😃
आयुष्य हे फक्त निरागस प्रेम आणि
विश्वासावर टिकून असते💖💖
एकाने समजून घ्यायचे तर एकाने
समजावून सांगायचे असते 👦👧
सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात 👐
त्या न सांगता समजतात
ज्या गोष्टी न सांगता समजतात ❤❤
अगं वेडे त्यालाच तर प्रेम म्हणतात 💝💝
हातात हात घेशील जेव्हा
भिती तुला कशाचीच नसेल… 👫👫अंधारातला काजवाही तेव्हा
सुर्यापेक्षा प्रखर असेल… 💥💥💥
जीवनातल्या प्रत्येक
शब्दाना तुझी साथ हवी आहे, 👫
माझ्या गितांमध्ये सुर तुझे हवे आहे,
माझ्या आश्रुना तुझा बांध हवा आहे,💧
माझ्या प्रतेक शब्दांमधे तुझा गंध हवा आहे,
या जीवनात आणखी काही नको फक्त तूच हवी आहे.👦👩
हळूच माझ्या ह्रदयाला
कोणीतरी चोरून नेलंय….💗
स्वतःच ह्रदय मात्र माझ्याकडे
ठेवून गेलंय….💕
हसतेस इतकी सुंदर की,
तुझ्याकडे बघतच बसतो…😃😃
आठवणीत मग तुझे ते
गोड हसणेच पाहत असतो…😍😍
स्वप्नात रोज आजकल, येते कोणी अशी
काय सांगू ती परी दिसते तरी कशी ?👸
मोत्यांसारख्या नजरेने तिने वळून काय पाहिले
मन माझे त्याच क्षणी तिच्या प्रेमात पडले💖💖
सोबत नसतेस तरी ,
तुझा स्पर्श का जाणवतो…👦💜👩
आजही हा जीव,
तुझ्यासाठी का तळमळतो…😅😅
सांग सख्या , मी गेल्यावर
तुज माझी आठवण येईल का? 😌😌
जाता जाता माझ्यासाठी तु,
दोन अश्रु गाळशील का? 😥😥
साधं सुध असल तरी
प्रेम केलय तुझ्यावर 💓💓
चुकलो जरी कधी तरी
रागावू नको माझ्यावर 😧😧
आज काल वाटेवरचा मोगराही 🌼🌼🌼
नेहमीसारखा फुलत नाही,
कदाचित त्याला ही समजल असेल,
की तू मझाशी बोलत नाही. 😑😑 😞
माझ्या डोळ्यांची भाषा
तुझ्या डोळ्यांनी बोलशील का?👀
सावली सारखी सखे
माझ्या सोबत चालशील का?👫
हे सांगू की ते सांगू करत
तेच तर सांगायाच राहीले 👩👩
तिचे ते मुके शब्द मी
माझ्या मुक्या डोळ्यांनीच पाहिले 👀👀
हिवाळ्यातील ही गुलाबी हवा
सोबत तू ही असावी..💙💙
घट्ट मारलेल्या मिठीत
शिरण्यास थंडीसही जागा नसावी..😍😍
सांग या ह्रदयाचं
आता मी काय करू…💝
ठेवू स्वतःकडे की,
तुला देऊन जावू…💟
तू पाहता क्षणी मजला
काळजाचे ठोके चुकले💕💕
लाजेचा पडदा येता मधे
मी तुज पाहण्यास मुकले. 👦👦
ह्रदयात येऊन बघ अजून
त्याला तुझीच गरज आहे…💛💛
तू गेल्यानंतरही त्यात
तुलाच प्रेमाने जपत आहे…👩👩
भावना समजायला
प्रेमाची साथ लागते 💖💖
मन जुळून यायला
हृदयाची हाक लागते 💞
डोळ्यातील आसवे लपवत
ओठांना हसत ठेवायचे 😀😀
तुझ्यावर प्रेम करून सुदधा
तुझ्यापासून लपवायचे .💢
ह्रदयात एक जखम
आजही सळत होती…💘
आठवण तुझी, का?
मलाच छळत होती…👧👧
हात हजार मिळतात
अश्रू पुसण्यासाठी, 😓😓
डोळे दोनही मिळत नाहीत
सोबत रडण्यासाठी. 😖😖
कळत नकळत न जाणे काय झाले
कधी तू माझा नि मी तुझी झाले 💑
भानावर आले तेव्हा मला कळले
आज मी न माझी राहिले 👩👩
हातात हात घेता तुझा, ✋✋
हृदयात कंप उठले.. 💗💗
हळूच मन माझे
तुझ्यात गुरफटले…. 💑
हळूच दबक्या पावलांनी ,
तुझ्याकडे मी यायचं…😌
आणि तूला ते दरवेळी ,
आधीच कसं गं कळायचं ?😃😃
सहवासाची संगत तू 👫
चांदण्यांची गंमत तू , 🌟 🌟
रवि किरणांचा तुच तजेला 🌞🌞
जलधारांची गंमत तू . 💧💧
माझ्या मनातली ती
अल्लड ...💃💃
झुळझुळ पाण्यासारखी
अलवार कानी पडणाऱ्या
सुरेख गाण्यासारखी🎵🎶🎵
शांत संध्याकाळी समुद्रकिनारी🌅🌅
तुझी वाट बघत मी बसलो होतो👀
दूर देशावरून येणाऱ्या लाटेशी🌊🌊
एकटाच बोलत बसलो होतो…👦👦
आयुष्यभर हसवेन तुला 😇😂
पण मला कधी रडवून जाऊ नकोस, 😩
काळजी घेईन तुझी
पण मला कधी सोडून जाऊ नकोस …💞💞
स्पर्शानं लाजाळूच पान 🌿🌿
कसं अलगद मिटत
तुझ्या आठवणींच्या स्पर्शानं 💁💁
मात्र मनात रान पेटत
माझ्या आनंदाचे कारण
तू अशीच बनून राहा 👸👸
जीवनात येशील का ते माहीत नाही
आता मात्र माझे जीवन होऊन राहा 👫👫
खळाळते हास्य तिचे 😄😄😄
नम्रतेचा शृंगार 👩👩
तिच्या तेजस्वी डोळ्यात दिसे 👀
मला आयुष्याचा भागीदार 👫
हे सांगू कि ते सांगू करत😑
तेच तर सांगायचं राहील
तिचे ते मुके शब्द मी👨
माझ्या मुक्या डोळ्यांनी पहिले👀
हे आपलं अबोल प्रेम💛
असच सुंदर असू दे😍😍
पन स्वप्नात का होईना
एकदा तरी खुलू दे !!!🌹🌹
हृदयासारखं सोप्प नाही💓
काही या जगात तोडायला !!💔
मनाला गरज नसते पंखांची😇
स्वप्नांच्या आकाशी उडायला !!
हृदयाच्या रम्य मंदिरात💖
प्रेमाच्या सदर वेलीवर
भावनांच्या जलाने सदैव💙💙
सिंचन करणारे फुल म्हणजे प्रेम होय !!
हृदय काहीतरी सांगतंय तुला ,💞
वाट पहाते आहेस कुणाचीतरी ......
का लपवतेस भावना तुझ्या मनात ,
हो कुणाच्यातरी मनाची राणी ......
हे पण वाचा :
तर मित्रांनो , तुम्हाला प्रेम कविता चारोळ्या कश्या वाटल्या ते मला कंमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचे काही सजेशन असतील तर ते सुद्धा मला सांगा . अधीक मराठी पोस्ट साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .
धन्यवाद !!!!!!!!!
वाट पहाते आहेस कुणाचीतरी ......
का लपवतेस भावना तुझ्या मनात ,
हो कुणाच्यातरी मनाची राणी ......
हे पण वाचा :
- Marathi Propose Kavita
- Husband Quotes In Marathi
- Marathi Pavsachi Kavita
- Small Poem In Marathi
- Bap Kavita In Marathi
तर मित्रांनो , तुम्हाला प्रेम कविता चारोळ्या कश्या वाटल्या ते मला कंमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचे काही सजेशन असतील तर ते सुद्धा मला सांगा . अधीक मराठी पोस्ट साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .
धन्यवाद !!!!!!!!!
Post a Comment