Jhuk Jhuk Agin Gadi Lyrics | झुक झुक झुक झुक आगीनगाडी
Jhuk Jhuk Agin Gadi Lyrics | Marathi
झुक झुक झुक झुक अगीनगाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहूया
मामाच्या गावाला जाऊया…
मामाचा गाव मोठा
सोन्याचांदीच्या पेठा
शोभा पाहुन येऊया
मामाच्या गावाला जाऊया…
मामाची बायको गोरटी
म्हणेल कुठली पोरटी
भाच्यांची नावे सांगूया
मामाच्या गावाला जाऊया…
मामाची बायको सुगरण
रोज रोज पोळी शिकरण
गुलाबजामुन खाऊया
मामाच्या गावाला जाऊया…
मामा मोठा तालेवार
रेशीम घेईल हजार वार
कोट विजारी घेऊया
मामाच्या गावाला जाऊया…
§ § § § §
हे सुद्धा नक्की वाचा :
- Chiv Chiv Chimni Marathi Balgeet Lyrics
- Asava Sundar Chocolate Cha Bangla Lyrics
- Badbad Geete Marathi Lyrics
- छान छान बालगीते
- अंगाई गीत मराठी
- Nach Re Mora Ambyachya Vanat Lyrics
- Chandoba Chandoba Lyrics
मित्रांनो या पोस्ट मध्ये आपण Jhuk Jhuk Agin Gadi Lyrics बघितले. अधिक पोस्ट साठी True Marathi Lyrics ला पुन्हा नक्की भेट द्या.
धन्यवाद !!!!!
Post a Comment