Header Ads

अंगाई गीत मराठी | Angaai Geete In Marathi

नमस्कार मित्रांनो, या पोस्ट मध्ये आपण अंगाई गीत मराठी मधून बघणार आहोत. लहान मुलांना झोपवण्यासाठी अशा अंगाई गीतांचा खूप उपयोग आपल्याला होतो. चाल तर मग बघूया मराठी अंगाई गीते -

    अंगाई गीत मराठी

    🙇🙇😴😴😴😴😴😴😴😴😴😴😴🙇🙇

    1. माझं सोनुलं सोनुलं

    माझं सोनुलं सोनुलं, माझं छकूल छकूल
    बाळा स्वप्नात तुला दोन्ही डोळ्यांनी जपलं
    माझं सोनुलं सोनुलं, माझं छकूल छकूल
    माझं सोनुलं सोनुलं, माझं छकूल छकूल

    पाळण्यात निजला काळजाचा तुकडा
    पाळण्यात निजला काळजाचा तुकडा
    खुदुखुदू हसला चंद्रावणी मुखडा
    हसू गालावरच मी कस ओठांनी टिपलं

    माझं सोनुलं सोनुलं, माझं छकूल छकूल
    माझं सोनुलं सोनुलं, माझं छकूल छकूल

    दुडू दुडू धावतो शोभा आली अंगणा
    बाळकृष्ण भासतो चिमुकला पाहूणा
    दुडू दुडू धावतो शोभा आली अंगणा
    बाळकृष्ण भासतो चिमुकला पाहूणा
    घरादारात सुखाचं त्यांनी चांदणं शिंपल

    माझं सोनुलं सोनुलं, माझं छकूल छकूल
    माझं सोनुलं सोनुलं, माझं छकूल छकूल

    उद्या होशील बाळा पित्यापरी तू गुणी
    दृष्ट लागेल तुला, हेवा करेल कुणी
    उद्या होशील बाळा पित्यापरी तू गुणी
    दृष्ट लागेल तुला, हेवा करेल कुणी
    भविष्यात माझ्या काय गुपित लपलं

    माझं सोनुलं सोनुलं, माझं छकूल छकूल
    माझं सोनुलं सोनुलं, माझं छकूल छकूल

    बाळा स्वप्नात तुला दोन्ही डोळ्यांनी जपलं
    माझं सोनुलं सोनुलं, माझं छकूल छकूल

    माझं सोनुलं सोनुलं, माझं छकूल छकूल
    माझं सोनुलं सोनुलं, माझं छकूल छकूल

    —⁘—⁘—⁘—⁘—

    2. मझ्या बाळाला डोळा लागू द्या

    कृष्ण बाळाला लागू द्या डोळा
    माझ्या बाळाला लागू द्या डोळा ....
    माझ्या बाळाला लागू द्या डोळा ....

    रात्र पुनवेची गोष्ट मैनेची
    याला सांगते चिऊ काऊची...
    रात्र पुनवेची गोष्ट मैनेची
    याला सांगते चिऊ काऊची...

    परी लागेना डोळ्याला डोळा
    परी लागेना डोळ्याला डोळा

    माझ्या बाळाला लागू द्या डोळा ....
    कृष्ण बाळाला लागू द्या डोळा
    माझ्या बाळाला लागू द्या डोळा ....

    खेळ खेळुनि नाही हा दमला
    पाहतो भिर भिर वरच्या छताला
    पाहतो भिर भिर वरच्या छताला

    सखे बाई ग दृष्ट झाली ग याला
    सखे बाई ग दृष्ट झाली ग याला

    माझ्या बाळाला लागू द्या डोळा ....
    कृष्ण बाळाला लागू द्या डोळा
    माझ्या बाळाला लागू द्या डोळा ....

    नन्दा घरचा एक छकुला
    लाड करुनि भारी लाडला
    नन्दा घरचा एक छकुला
    लाड करुनि भारी लाडला
    पहा दारी बागुलबुआ आला
    पहा दारी बागुलबुआ आला

    माझ्या बाळाला लागू द्या डोळा ....
    कृष्ण बाळाला लागू द्या डोळा
    माझ्या बाळाला लागू द्या डोळा ....

    राउळी खेळे नंद अंगनी
    गाऊ मी त्याची कुठवर गाणी
    यशोदा देते झोका गोपाळा
    यशोदा देते झोका गोपाळा

    माझ्या बाळाला लागू द्या डोळा ....
    कृष्ण बाळाला लागू द्या डोळा
    माझ्या बाळाला लागू द्या डोळा ....

    —⁘—⁘—⁘—⁘—

    3. नीज माझ्या नंदलाला नंदलाला रे ...


    नीज माझ्या नंदलाला नंदलाला रे ...
    निज माझ्या नंदलाला नंदलाला रे ...

    शांत हे आभाळ सारे,
    शांत हे आभाळ सारे
    शांत तारे , शांत वारे
    या झऱ्याचा सूर आता मंद झाला
    मंद झाला रे ....

    निज मझ्या नंदलाला नंदलाला रे .....

    झोपल्या गोठ्यात गाई, साद वा पडसाद नाही
    झोपल्या गोठ्यात गाई, साद वा पडसाद नाही
    पाखरांचा गलबला हि बंद झाला
    बंद झाला रे ...

    निज मझ्या नंदलाला नंदलाला रे ....

    सावल्यांची तीट गाली
    सावल्यांची तीट गाली
    चांदण्याला निज आली
    चांदण्याला निज आली
    रातराणीच्या फुलाचा गंध आला
    गंध आला रे .....

    निज मझ्या नंदलाला नंदलाला रे ....

    निज रे अलकनंदा
    निज रे मझ्या मुकुंदा
    निज रे अलकनंदा
    निज रे मझ्या मुकुंदा
    आवाराच्या घागऱ्याच्या छंदताला
    छंदताला रे ....

    निज माझ्या नंदलाला नंदलाला रे ...
    निज माझ्या नंदलाला नंदलाला रे ...

    —⁘—⁘—⁘—⁘—

    4. साधी भोळी आई अंगाई गायी

    जो जो रे बाळा ... जोजो रे
    साधी भोळी आई ... अंगाई गाई
    साधी भोळी आई ... अंगाई गाई
    बाळा उगी राही ... जो जो रे बाळा ... जो जो रे

    जो जो रे बाळा ... जो जो रे बाळा
    जो जो रे बाळा ... जो जो रे

    साधी भोळी आई ... अंगाई गाई
    बाळा उगी राही ... जो जो रे बाळा ... जो जो रे

    स्वप्नपिसांची नाजूक शैय्या
    स्वप्नपिसांची नाजूक शैय्या
    मऊ मऊ दुलई ममता माया
    लडिवाळ कान्हा चिमुकला राणा

    बाळ माझा तान्हा
    जो जो रे बाळा ... जो जो रे
    जो जो रे बाळा ... जो जो रे
    जो जो रे बाळा ... जो जो रे

    थांबावं आता अवखळ चाळा
    थांबावं आता अवखळ चाळा
    रुणझुण वाजे घुंगुर वाळा
    सारी वनराई शान शांत होई

    बाळा झोपी जाई ....
    जो जो रे बाळा ... जो जो रे
    जो जो रे बाळा ... जो जो रे

    जाऊन कुरणे भुरभुर उडते
    जाऊन कुरणे भुरभुर उडते
    गोऱ्या गोऱ्या गाली खाली हि पडते
    झाकल्या मुठीत लपले गुपित

    बाळाच्या खुशीत जो जो रे बाळा जो जो रे
    जो जो रे बाळा ... जो जो रे

    हा ... आ आ आ ... हा हा हा आ ......

    कधी देवकी मी कधी मी यशोदा
    जोजविते वेड्या लाडक्या मुकुंदा
    कसा लळा लगे आईपणा जागे
    एकरूप दोघे जो जो रे बाळा जो जो रे ....

    साधी भोळी आई ... अंगाई गाई
    बाळा उगी राही ... जो जो रे बाळा ... जो जो रे
    जो जो रे बाळा जो जो रे

    जो जो रे बाळा ... जो जो रे

    —⁘—⁘—⁘—⁘—

    5. हलके हलके जोगवा


    हलके हलके जोगवा बाळाचा पाळणा
    पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा

    हलके हलके जोगवा बाळाचा पाळणा
    पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा

    सजली ग मऊ मखमलीचे शैय्या
    सजली ग मऊ मखमलीचे शैय्या
    निजली ग बाळाची गोरी गोरी काया
    निजली ग बाळाची गोरी गोरी काया

    बाळ रुपडे बाळाचे भुलविते लोचना
    पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा

    हो हलके हलके जोगवा बाळाचा पाळणा
    पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा
    हलके हलके जोगवा बाळाचा पाळणा
    पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा

    कुर्रर्र करा कानात हळूच भेटा ग ...
    कुर्रर्र करा कानात हळूच भेटा ग ...

    बारशाचा सोहळा घुगऱ्या वाटा ग ..
    बारशाचा सोहळा घुगऱ्या वाटा ग

    आज बाई इंद्राचा दरबार ठेंगणा
    पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा
    हो हलके हलके जोगवा बाळाचा पाळणा
    पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा

    हलके हलके जोगवा बाळाचा पाळणा
    पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा

    —⁘—⁘—⁘—⁘—

    6. इवल्याशा डोळ्यातून झाले नवलाई


    इवल्याशा डोळ्यातून झळे नवलाई
    इवल्याशा डोळ्यातून झळे नवलाई

    नीज बाळा नीज माय गाते हि अंगाई
    नीज बाळा नीज माय गाते हि अंगाई

    वळल्या मुठीत काय सपान झाकलं
    वळल्या मुठीत काय सपान झाकलं
    बोबड्या मनानं माझं आभाळ दाटलं
    हसलास खुद्कन सुखावली आई

    चिऊ काऊ झोपी गेले वासरू झोपले
    चिऊ काऊ झोपी गेले वासरू झोपले
    खालोखाल गावरान पाखरू जागल
    चिडीचूप झाली आहे अंगणात जाई

    नीज बाळा नाईज माय गाते हि अंगाई
    नीज बाळा नाईज माय गाते हि अंगाई

    आभाळात मखमली कापूस पिंजला
    आभाळात मखमली कापूस पिंजला
    उबदार चांदण्याचा प्रकाश सांडला
    मऊ ढगांवर चंद्र झोपला ग बाई

    नीज बाळा नाईज माय गाते हि अंगाई
    नीज बाळा नाईज माय गाते हि अंगाई

    इवल्याशा डोळ्यातून झळे नवलाई
    इवल्याशा डोळ्यातून झळे नवलाई
    नीज बाळा नाईज माय गाते हि अंगाई
    हम्म ह्म्म्म हम्म गाते हि अंगाई
    हे हे हे गाते हि अंगाई

    —⁘—⁘—⁘—⁘—

    7. निंबोणीच्या झाडामागे

    निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई
    निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई
    आज माझ्या पाडसाला का ग येत नाही ?
    निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई

    गाय झोपली गोठ्यात, घरट्यात चिऊ ताई
    गाय झोपली गोठ्यात, घरट्यात चिऊ ताई
    परसात वेलीवर झोपल्या ग जाई जुई
    मीट पाकळ्या डोळ्यांच्या ... ओ .. ओ..

    मीट पाकळ्या डोळ्यांच्या
    गाते तुला मी अंगाई
    आज माझ्या पाडसाला का ग येत नाही ?
    निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई

    देवकी नसे मी बाळा, भाग्य यशोदेशे भाळी
    देवकी नसे मी बाळा, भाग्य यशोदेशे भाळी
    तुझे दुःख घेण्यासाठी केली पदराची झोळी
    जगावेगळी हि ममता ... हो ओ ..
    जगावेगळी हि ममता
    जगावेगळी हि अंगाई ...

    आज माझ्या पाडसाला का ग येत नाही ?
    निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई
    निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई

    —⁘—⁘—⁘—⁘—



    हे पण जरूर वाचा 👇👇👇


    तर मित्रांनो आज आपण या पोस्ट मध्ये अंगाई गीत मराठी मध्ये बघितले. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या मला कंमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अन्य मराठी गाण्यांसंबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.

    हि पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Blogger द्वारे प्रायोजित.