Header Ads

Utha Utha Chiu Tai Lyrics | उठा उठा चिऊताई



नमस्कार मित्रांनो ,या पोस्ट मध्ये तुम्हाला Utha Utha Chiu Tai Lyrics या बाल गीताचे बोल वाचायला मिळतील.लहानपणी तुम्ही सुद्धा हे गाणं नक्की एकल असेल . चला तर मग बघूया याचे बोल -


Utha Utha Chiu Tai Lyrics | Marathi


उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडले  (*२)
डोळे तरी मिटलेले
अजूनही अजूनही   (*२)
उठा उठा चिऊताई


सोनेरी हे दूत आले
घरट्याच्या दारापाशी (*२)
डोळ्यांवर झोप कशी
अजूनही अजूनही   (*२)


उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडले
डोळे तरी मिटलेले
अजूनही अजूनही
उठा उठा चिऊताई


लगबग पाखरे ही
गात गात गोड गाणे (*२)
टिपतात बघा दाणे
चोहीकडे चोहीकडे


उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडले
डोळे तरी मिटलेले
अजूनही अजूनही
उठा उठा चिऊताई


झोपलेल्या अशा तुम्ही
आणायाचे मग कोणी (*२)
बाळासाठी चारापाणी
चिमुकल्या चिमुकल्या (*२)


बाळाचे मी घेता नाव
जागी झाली चिऊताई  (*२)
उठोनिया दूर जाई
भूर भूर भूर भूर    (*२)



You May Also Like:


मित्रांनो या पोस्ट मध्ये आपण Utha Utha Chiu Tai Lyrics बघितले. मराठी गाण्याच्या लिरिक्स साठी True Marathi Lyrics ला पुन्हा नक्की भेट द्या.

धन्यवाद !!!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.